Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाचा लग्नामधला स्वतःच्याच वेगळ्या पद्धतीचा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही

ह्या तरुणाचा लग्नामधला स्वतःच्याच वेगळ्या पद्धतीचा अतरंगी डान्स पाहून हसू आवरणार नाही

वायरल व्हिडियोज म्हणजे आपल्या मनोरंजन विश्वाचा एक अविभाज्य भाग बनून गेलेले आहेत. खासकरून आपण जर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असाल तर याची प्रचिती आपल्याला एव्हाना आलेली असेल. यातही डान्सचे वायरल व्हिडियोज तर वर्षानुवर्षे बघितले जातात. हे म्हणण्याचं कारण, म्हणजे मध्यंतरी युट्युबवर अनेकांना जुने जुने वायरल व्हिडियोज पुन्हा रिकमेंडेशन मध्ये दिसले असतील. खासकरून ९-१० वर्ष पूर्वीचे. आणि नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की आजही लोकांना हे व्हिडियोज बघणं आवडताना दिसतं. आज आपल्या टीमच्या बाबतीत ही असंच घडलं. एक दहा वर्षांपूर्वी वायरल झालेला व्हिडियो पुन्हा बघायला मिळाला आणि हसून हसून आमची पुरेवाट झाली. आता आम्ही आनंद घेतला त्या व्हिडियोचा, तेव्हा आपल्यासाठी त्याविषयी काही लिहावं असं वाटलं म्हणून हा लेख.

तर हा दशक भरापूर्वीचा व्हिडियो बहुतेक लग्नाच्या रिसेप्शन मधला असावा. यात आपल्याला भेटतात ते तीन अतरंगी डान्सर्स. यातली एक व्यक्ती या संपूर्ण व्हिडियोभर नाचत असते, तर बाकीचे दोघे मध्ये मध्ये येऊन जाऊन डान्स करत असतात. बरं त्यांच्या नाचाला डान्स म्हणावं तर ते योग्य होणार नाही. कारण मनमुराद नाचण्याची त्यांची पद्धत केवळ फ्री स्टाईल पद्ध्तीत गणली जाऊ शकते. यात वर ज्यांचा उल्लेख केलेली एक व्यक्ती जी कायमस्वरूपी डान्स मध्ये दिसून येते त्यांच्या नाचण्याने या व्हिडियोची सुरुवात होते. वेगवेगळे अंग विक्षेप करत डान्स करणं चालू असतं. ही व्यक्ती उजव्या कोपऱ्यात आणि बाकीची सहा जणं एका कोपऱ्यात नाचत असतात. मग हळू हळू त्यांतील एकेक जण कमी व्हायला सुरुवात होते. राहतात ते फक्त एक काका. आकाशी रंगाच्या शर्टातले हे काका लक्षात राहतात. एक वेळ अशी येते की डी. जे. ला लाऊड स्पीकरचा आवाज कमी करायला सांगताना ते दिसतात तर व्हिडियोच्या शेवटी त्याच लाऊड स्पीकरजवळ जाऊन नाचत असतात. आणि मधल्या वेळेत त्यांचा ही अतरंगी डान्सचं चालू असतो.

आधीच्या डान्सर सोबत ते स्वतःची गती जुळवण्याचा निष्फळ प्रयत्न करतात. कारण तो तर एकदम जोमात आलेला असतो. एकदा तर अशी कोलांटी उडी मारतो की जवळ उभ्या असलेल्या लहान मुलाच्या थोबाडीत लाथ बसता बसता वाचते. तसेच जवळचं बुफे पद्धतीने सगळं ठेवलेलं असतं. ते बघून किती मोठा अनर्थ टळला हे कळतं. पण हे बेभान भाऊ आपल्याच तंद्रीत असतात. काही वेळाने या दुकलीला अजून एक तरुण येऊन सामील होतो. त्याचाही डान्स सुरू होतो. या तिघांकडून काही ना काही व्यायाम प्रकार केले जात असतात. एकंदर काय, तर त्यांना जे हवं ते डान्स म्हणून ही मंडळी करतात. पण त्याचा ते आनंद घेत असतात. लोकं काय म्हणतात याची त्यांना पडलेली नसते. आपण व्हिडियोत बघतो की काही जण कुजबुज करताना दिसतात. पण त्यांची फिकीर न करता यांचा डान्स चालू असतो. एका अर्थाने त्यांचं वागणं म्हणजे, आ’ग लगे बस्ती मैं, हम हमारी मस्ती मैं प्रकारचं असतं. सुदैवाने कोणालाही दुखापत होत नाही, काहीही नुकसान होताना दिसत नाही.

त्यामुळे त्यांच्या या डान्सची मजा आपल्याला ही घेता येते. जेव्हा त्यांना वाटतं की आता थांबावं तेव्हा ते थांबतात. यात ज्यांनी व्हिडियोची सुरुवात केली ते त्यांचं मन भरलं की सरळ चप्पल घालून निघून जातात. त्याचवेळी व्हिडियो ही संपतो, पण आपलं हसणं काही थांबत नाही. वेळ असेल तर आपण हा व्हिडियो पुन्हा पाहतो. आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला आहे त्यांना त्यांना हा व्हिडियो विरंगुळा म्हणून नक्कीच आवडला असणार यात शंका नाही. सोबतच आपल्याला हा लेख ही आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा लेख आवडतात तेव्हा तेव्हा आपण ते शेअर करत असता. आपल्या टीमचे तर १००% लेख आपण वाचक शेअर करत असता. यांमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. यापुढेही आपलं प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो हीच सदिच्छा. लोभ कायम असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.