Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाचे गावरान सेमी इंग्लिश ऐकून हसू आवरणार नाही, बघा हाअतरंगी व्हिडीओ

ह्या तरुणाचे गावरान सेमी इंग्लिश ऐकून हसू आवरणार नाही, बघा हाअतरंगी व्हिडीओ

“मै इधर से घाई घाई उठया, तडतड पाऊल उचल के उसके पास गया, भागते भागते धपकन आपट्या आणि वाटीभर र’क्त सांडया” अशी असते माझ्यसारख्या सामान्य मराठी माणसाची असामान्य हिंदी. आमच्या इंग्रजी विषयी तर काय बोलूच नका ओ… आय कॅन टॉक इंग्लिश आय कॅन वॉक इंग्लिश अँड इंग्लिश इज माय फेव्हरेट लॅंग्वेज… इतकी इंग्रजी आम्हाला अमिताभ बच्चनने शिकवली. शाळेच्या इंग्रजीच्या तासाला आम्ही इंग्रजीच्या मास्तरचे चित्र काढत बसायचो. जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या आम्हा पोरांना “माय नेम, माय फादर नेम आणि माय व्हिलेज नेम” एवढ्याच प्रशांची उत्तरं इंग्लिशमधून देता येतात. एकूणच काय तर माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाची इंग्रजी पण अशी-तशीच आहे. आता सेमी-इंग्लिश सारखा पर्याय आल्याने आम्ही “ही वस्तू परवडेबल नाही” असे म्हणतो. पण परवडेबल हा शब्द धड मराठीतही सापडत नाही आणि इंग्लिशमध्ये तर असला तरी सापडणार नाही. कारण आमची इंग्रजीच अशीय हो… तर cat (कॅट) मध्ये k ऐवजी c का येतो, हे समजून घेता घेता आमच्या पिढीची दहावी झाली.

मग science (सायन्स) मध्ये मध्येच c का येतो, हे समजून घेण्यात बारावी पण झाली. पुन्हा मग इंग्रजीची आणि आमची गाठ कधी मधी पडली. ‘welcome’ ‘interval’ आणि “The end” हे शब्द बघता बघता डिग्री पण झाली. तुम्हाला माहितीय का? मराठी माणूस इंग्रजी नीट का बोलत नाही. बदला घेतोय मराठी माणूस… इंग्रजांनी आपल्या अ’त्याचार केले म्हणून आम्ही त्यांच्या भाषेवर अ’त्याचार करतो आहोत. त्यांनी आमची वाट लावली म्हणून आम्ही त्यांच्या भाषेची पार पुरेवाट केली. सध्या महाराष्ट्रातच नाही तर भारतातसुद्धा लोक इंग्रजीची आय-बहीण बोले तो मदर आणि सिस्टर एक करत असतात. यात मराठी आणि पंजाबी माणूस सगळ्यात पुढे…

अशीच इंग्रजीची वाट लावणारा एक व्हिडिओ आमच्यासमोर आला. हा व्हिडीओ पाहून इंग्रजसुद्धा म्हणतील, त्या परफेक्ट इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीला अमेरिकेत पाठवा, त्याला आम्ही हॉवर्ड विद्यापीठाचा प्रमुख इंग्रजीचा शिक्षक बनवतो. हा साताऱ्याचा भाऊ एवढी भारी इंग्रजी बोलला की नादच खुळा… आणि तसही सातारा म्हटलं की, लोकांना 2च गोष्टी आठवतात. दबंग बोलणारे आणि टशनबाज चालणारे ….

आता विषयाकडे वळूयात. को’रोना आला पहिला लॉकडाऊन लागला. सॅनिटायझर, मास्क, लॉकडाऊन, पॅनडेमिक, को’विड हे इंग्रजी आणि अवघड असणारे शब्द मराठी माणूस बोलू लागला होता. सगळीकडे नकारात्मक वातावरण होते. टीव्ही लावला तरी सगळ्या घाबरवणाऱ्या बातम्या मोबाईल उचकला तरी मनात भीती निर्माण करणारे मेसेज… अशा वातावरणात एक भयानक मनोरंजन करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि या व्हिडीओमुळे लोकांच्या मनातील इंग्रजीची आणि को’रोनाची पण भीती पळून गेली.

हा व्हिडीओ होता, आरजे सुमितचा… संध्याकाळी तो रंकाळ्यापाशी उभा राहून एक व्हिडिओ शूट करत होता. आणि नेमकं त्याला इंग्रजीत बोलायचं कंड आला. गड्याने जमेल तशी इंग्रजी हाणली. अर्धी मराठी अर्धी इंग्रजी. व्हिडीओ युट्युबवर अपलोड करताच सोशल मीडियावर दणक्यात व्हायरल झाला. या व्हिडीओने अनेकांचे मनोरंजन केले. नकारात्मक वातावरणात या व्हिडीओने सकारात्मकता आणली. त्या काळात हा व्हिडीओ खूप शेअर केला गेला. लोक हसू हसू पागल झाले. दिवसातुन एकदा का होईना पण हा व्हिडीओ लोक बघायचेच. कारण तेव्हा परिस्थिती तशीच होती. आता पुन्हा हा व्हिडीओ नव्याने आमच्यासमोर आला. हा व्हिडीओ बघून आम्ही आताही तसेच हसलो जसे पहिल्यांदा हा व्हिडीओ बघून हसलो होतो. आली रे आली… आता तुमची हसायची बारी आली…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *