‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख. जिकडे ढोलकी तिकडे मराठी माणूस आलाच समजा… मराठी माणसाने लावणी पार देशाबाहेर नेली. ही एकमेव लोककला शेवटपर्यंत टिकून राहील, यात काहीच शंका नाही. लावणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातही विशेषतः लावणी हा कलाप्रकार मराठी माणसे जास्त बघतात… कारण लावणी ही एकमेव अशी गोष्ट आहे, ज्याकडे मराठी माणूस एकदम मनातून, हृदयातून जोडला गेलेला असतो. ही फक्त लावणीवर नाचणाऱ्या बाईची कमाल नसते तर गाणाऱ्या बाईचा आवाज, तुणतुणेच्या गुंतून ठेवणं आणि ढोलकीची थाप आपल्या कानावर आली की तरूणाई सह म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांची पावलेही जिकडे लावणीचा फड लागलेला असतो, तिकडे वळू लागतात.
लावणी करणाऱ्या कलाकार पोरी नादखुळा डान्स करून लोकांना सहज भुलवतात. काय त्या अदा, काय तो नाच, काय ती सुंदरता… सगळं एकदम ओक्केमधी… पण विषय असाय भावांनो… आता पोरीच्या लावणीपेक्षा पोरांच्या लावणीची किंमत वाढली आहे. मधल्या काळात अनेक पुरुष लावणी कलाकार समोर आले. आणि अशाच एका जबरदस्त कलाकारांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
खरं पाहिलं तर, लावणी हा फक्त स्त्रियांनी सादर करायचा प्रकार आहे, अशी आपली आतापर्यतची समजूत होती. मात्र एका अवलिया लावणी कलाकारानं तो समज चूकीचा ठरवला आहे. त्याचा लावणीवर डान्स करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे तो अवघ्या काही तासांत देशातल्या कानाकोप-यात पोहचला आहे. कुठल्याही लावणीवर नाही तर फक्त ढोलकीच्या थापेवर त्यानं केलेलं नृत्य कमालीचं सुंदर झाले आहे. सोशल मीडियावरुन त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अनेकांनी त्याला कमेंटस देऊन त्या कलाकाराचा उत्साह वाढवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असून त्यातून काही टॅलेंट समोर येताना दिसत आहे. तुम्हाला आठवत असेल नवरदेवासमोर नाच रे मोरा या गाण्यावर नृत्य करणारा मुलगा, तसेच एका आजीनं वराती दिलेर मेहंदीच्या गाण्यावर केलेला डान्स सुपरहिट झाला होता. आताही असाच एक व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. त्यातील कलाकारानं ज्याप्रकारे आपली कला सादर केली आहे ते पाहून लावणी पुरुषही चांगल्याप्रकारे करु शकतात. असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
व्हायरल झालेल्या अवघ्या काही सेकंदाच्या व्हिडिओमध्ये या लावणी कलाकाराने बेफाम होऊन भन्नाट डान्स केला आहे. त्याच्या अदा आणि हावभाव सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्याचा नाचही जबरदस्त झाला आहे. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :