Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या तरुणाने केलेला हा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

डान्स म्हंटला की स्टाईल ही आलीच. कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या स्टाईलने आणि त्यातही त्यांना स्वतःला भावणाऱ्या स्टाईलने डान्स करायला आवडतं. पण डान्स करत असताना केवळ स्टायलिश असून भागत नाही, तर स्वतः एक उत्तम डान्सर असावं लागतं. हीच बाब काहींना अगदी व्यवस्थित कळते. त्यामुळे त्यांचा डान्स बघत असताना आपल्याला डान्सची मजा तर घेता येतेच. सोबतच त्यांच्या स्टायलिश अंदाजमुळे त्यांची एक जबरदस्त छाप ही पडते.

आज हे सांगायचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो होय. हा व्हिडियो एका लग्नातील वायरल डान्सचा व्हिडियो आहे. यात एक मुलगा असा काही मस्त आणि स्टायलिश डान्स करतो की काही विचारू नका. आता म्हणाल की यात एका मुलाने डान्स केला आहे तर मग नवरा नवरी कुठे आहेत. तर या व्हिडियोत आपल्याला नवरा नवरी दिसतात. पण पाठमोरे. कारण ते मंडपातील डान्स फ्लोरच्या समोर बसलेले असतात आणि वर उल्लेख केलेल्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्सची वाट बघत असतात. बरं एक नमूद करावी अशी बाब म्हणजे हे लग्न श्रीलंकेत होत असतं. त्यामुळे सगळेच जण आणि त्यात डान्स करणारा मुलगा ही श्रीलंकेचा रहिवासी असतो. आता श्रीलंकेतलं लग्न आणि आपला काय संबंध असा तुम्हाला पडला असावा. त्याचं अस आहे की या मुलाचा डान्स खरंच जबरदस्त आहे आणि त्यातही तो भारतीय गाण्यांवर केलेला आहे.

तसेच अजून एक बाब म्हणजे हा व्हिडियो आजतागायत जवळपास ४२ लाख लोकांनी पाहिलेला आहे. यावरून त्याची लोकप्रियता लक्षात यावी. म्हंटलं चला तर अशा लोकप्रिय कलाकृती विषयी लिहुयात आणि आपल्या वाचकांना याविषयी माहिती सांगूंयात. या व्हिडियोतील मुलगा म्हणजे धनुका एम जे हे होय. धनुका हे उत्तम कोरिओग्राफी करतात आणि त्यांचे डान्स परफॉर्मन्स त्यांच्या चॅनेल वरून बघता येतात. असो. तर एका लग्नाच्या प्रसंगी धनुका जो डान्स परफॉर्मन्स देतात याचा हा व्हिडियो आहे हे आपण जाणलं असेलच. या व्हिडियोची सुरुवात होते कलंक चित्रपटातील ‘फर्स्ट क्लास’ या गाण्याने. मूळ गाण्यावर वरूण धवन यांनी केलेला डान्स आपण पहिला असेलच. आता आपण या व्हिडियोच्या मार्फत धनुका यांचा डान्स बघत असतो. स्वतः एक उत्तम कोरिओग्राफर असल्याने धनुका यांच्या प्रत्येक स्टेप्स मजा आणतात. हीच बाब त्यांच्या पुढच्या गाण्यात खासकरून अधोरेखित होते. कारण पुढचं गाणं हे सगळ्या भारतीयांच्या आवडीचं आहे. प्रभुदेवा यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तमोत्तम डान्स परफॉर्मन्स दिले आहेत. पण ‘मुकाबला’ गाण्यावर दिलेला परफॉर्मन्स आजही आपल्या मनात मनात ठसलेला दिसतो. तो तसा कदाचित धनुका यांनाही आवडला असावा. कारण त्यांचं दुसरं गाणं मुकाबला हे असतं. त्यावर तर एकदम जबरा परफॉर्मन्स देत धनुका उपस्थित आणि आपल्याला ही खुश करतात.त्यांची स्टाईल, त्यांचं पदलालित्य यांची भुरळ पडते. प्रभुदेवाजींच्या काही स्टेप्स ही आपल्याला यात दिसून येतात.

धनुका यांच्या एकूण परफॉर्मन्स पैकी हे गाणं खूप वेळ चालतं. त्यामुळे व्हिडियो संपल्यावरही या गाण्यावरचा परफॉर्मन्स लक्षात ही राहतो. पण व्हिडियो संपण्यागोदर अजून एका जबरदस्त गाण्यावर धनुका परफॉर्मन्स देतात. रणविर सिंग यांच्या गाजलेल्या ‘मेरा वाला डान्स’ गाण्यावर ते परफॉर्मन्स देतात. त्यातही पुन्हा आवडून जाईल असं पदलालित्य दिसून येतं आणि शेवटी केलेली स्टेप तर अहाहा. मस्तच. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार आहे हे नक्की. आपण जर हा व्हिडियो पहिला नसेल तर जरूर पहा आणि त्याचा आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.