Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने डिस्को बारमध्ये केला चक्क लावणी डान्स, पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

ह्या तरुणाने डिस्को बारमध्ये केला चक्क लावणी डान्स, पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

फक्त मराठी जणांमध्ये प्रसिद्ध असलेली लावणी अवघ्या देशात आणि जगभरात पसरली ती म्हणजे वाजले की बारामुळे. मराठी कलेला लोकप्रिय करण्यात लावणीचा मोठा वाटा होता. ‘टांग टांग टांग..’ असा ढोलकीचा दणकेबाज आवाज कानावर पडल्यावर गावकऱ्यांची पावले तमाशाच्या दिशेने वळतात. एखादी गोरी गोरी पान ललना जी सगळ्यांच ध्यान आकर्षित करत असते. आपल्या दिलखेचक अदांनी घायाळ करत असते. तिच्या बाजूला असणाऱ्या 4 सामान्य दिसणाऱ्या आणि नाचणाऱ्या पोरी, त्यांच्या बाजूला कसेबसे नाचणारा आणि मध्येच लुडबुड करणारा नाचा, असं एकूण चित्र तमाशाच्या फडावर असत. 2-4 इकडच्या तिकडच्या लावण्या झाल्या, लई मोठं पब्लिक गोळा झालं की मग येते मेन नाचणारी लावणीनायिका. चोपून नेसलेली भरजरी नऊवारी, उठून दिसणारा पण भडक नसणारा मेकप आणि त्यानंतर तिची जेव्हा लावणी सुरु होते तेव्हा पब्लिकच्या शिट्ट्या पडतात आणि फेटे उडतात.

अशी एखादी लावणी सुरू झाली आणि पाय थिरकले नाही असे कधीच होत नाही. त्यातही ‘आता वाजले की बारा’ सारखी झटकेबाज लावणी आहे म्हटल्यावर तर सगळा माहोल लावणीमय होऊन जातो. लावणीच्या प्रेमात एखादा मराठमोळा माणूस पडणे यात काहीच विशेष नाही. पण जेव्हा एखादा पुरुष लावणीवर नाचतो तेही कुठल्या तमाशात नाही तर चक्क डिस्को डान्स बार मध्ये…. तेव्हा अख्खा पब्लिक येड होऊन जात भाऊ…. असाच एक व्हायरल झालेला व्हिडीओ आमच्याकडे आला. आता लावणी म्हटल्यावर आम्ही पूर्ण व्हिडीओ बघणार हे नक्कीच होत. पण जेव्हा कळाल की यात चक्क एक पुरुष डान्स करणार आहे, तेव्हा आम्ही चकित झालो. आम्हाला वाटलं एखाद्या पोराने मजेमजेत डान्स केला असेल. पण आम्ही व्हिडीओ पाहायला घेतला आणि शेवटपर्यंत न पापणी लवता बघितला.

आजवर लावणीचे अनेक व्हिडीओ पाहिले, अनेक पुरुषांना लावणी करताना बघितलं. पण या भावाने अशी काही लावणी केली आहे की, थोड्या वेळासाठी असं वाटत कि, यालाच ओरिजिनल लावणीत अमृताऐवजी नाचवायला पाहिजे होतं. याची लावणी जेव्हा अमृता पण पाहिल, तेव्हा ती पण याच्या प्रेमात पडेल. लटके- झटके, अदा, डान्स स्टेप्स सगळं काही या भावाने इतकं अफलातून केलं आहे की, त्याला एखाद्या डान्स शोमध्ये न्यावं.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.