Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने त्याच्या वहिणींसोबत केला अप्रतिम डान्स, तीन कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

ह्या तरुणाने त्याच्या वहिणींसोबत केला अप्रतिम डान्स, तीन कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडीओ

प्रत्येक नातं स्वतःची एक गंमत घेऊन जन्माला येत असतं. दिर आणि वहिनी हे नातं ही असंच आहे. दिर म्हणजे प्रत्येक वहिनी साठी एखादया सख्ख्या भावाप्रमाणे असतो. काही वेळेस जर वयातलं अंतर जास्त असेल तर तोच दिर लहान मुलाप्रमाणे वहिनीकडे वाढतो. एकंदर काय तर रक्ताचं नसलं तरी हे मायेचं नातं नक्की असतं. बरं त्यात असलेला खेळकरपणा ही सर्वश्रुत आहेच. याच खेळकर स्वभावाची चुणूक दाखवणारा एक व्हिडियो आपल्या टीमने नुकताच पाहिला. एका लग्नात दिर आणि त्याच्या दोन वहिन्या छान पैकी डान्स करताना दिसून येतात. हे लग्न उत्तर भारतात संपन्न होतं असं दिसून येतं. येथील लग्न म्हणजे सोहळाच असतो. मस्त पैकी डी.जे. वगैरे असतो या लग्नात. समोर आपल्याला हा मुलगा आणि त्याच्या दोन वहिन्या दिसून येतात.

एव्हाना गाणं ही सुरू झालेलं असतं. हरयाणवी म्युझिक म्हणजे भारतात आणि जगात प्रसिद्ध आहेच. त्यातलं ‘बहू काले की’ हे गाणं तर जबरदस्त हिट ठरलेलं गाणं आहे. याच गाण्यावर हे त्रिकूट नाचत असतं. सोबत काही छोटी मुलं ही असतात. पण नंतर मात्र ती बाजूला होतात. हे तिघे अगदी मनापासून या गाण्यावर डान्स करत असतात. एकापेक्षा एक ठुमक्यावर ठुमके लगावत यांचा डान्स सूरु असतो. मधेच हा मुलगा काही हटके स्टेप्स करत असतो. असं करता करता तिघांचा मस्त डान्स सुरू असतो. मग थोड्या वेळाने मग एक वहिनी दुसरी कडे काही कामानिमित्त निघून जातात. तर एक वहिनी आणि हा दिर छान पैकी डान्स करत राहतात आणि काही वेळाने व्हिडियो संपतो. हा व्हिडियो युट्युबवर पाहायला मिळतो आणि तो अपलोड केला आहे अंकित जागींड यांनी. या व्हिडियोत असलेला मुलगा म्हणजे अंकित आहेत. तर त्यांच्या सोबत अर्थात त्यांच्या वहिन्या आहेत. अंकित हे गेली काही वर्षे युट्युबवर कार्यरत आहेत.

त्यांच्या या कालावधीत वर उल्लेख केलेला व्हिडियो अतिशय प्रसिद्ध झाला आहे. जवळपास तीन कोटी चाळीस लक्ष लोकांनी हा व्हिडियो पाहिलेला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. या व्हिडियोबद्दल जाणून घ्यायला आपल्या वाचकांना आवडेल असं वाटून आपण आजचा हा लेख लिहिला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आणि त्यावर असलेला हा लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका. आपल्या टीमला तर दिर आणि वहिन्यांमधलं खेळकर मैत्रीपूर्ण नातं भावलं. नुकतंच अंकित यांना युट्युबचं सिल्वर बटन मिळालं आहे. यानिमित्ताने त्यांना आपल्या टिमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

तसेच आपण नेहमीप्रमाणे हा लेख शेअर करत आपल्या टीमला प्रोत्साहन देत राहाल हा विश्वास आहे. तेव्हा आपला लोभ आपल्या टीमवर कायम असू द्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *