Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने मित्राच्या लग्नात केलेला हा खतरनाक डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या तरुणाने मित्राच्या लग्नात केलेला हा खतरनाक डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

सध्या ‘आम्ही लग्नाळू’ म्हणत अनेक जोडपी विवाह बंधनात अडकताना आपण पाहतो आहोत. दर आठवड्याला निदान एका तरी ओळखीच्या व्यक्तीचं लग्न ठरल्याचं आपल्या कानावर येतच असतं. मग आपसूक व्हाट्सअपच्या स्टेटस वर लग्नाच्या पूर्वतयारीचे, लग्नातले आणि रिसेप्शनचे फोटोज झळकू लागतात. त्यामुळे आपण जर का त्या लग्नाचा भाग नसलो की थोडी जळते आपली. पण जर आपण त्या लग्न सोहळ्याचे भाग असू तर मग काय आठवणीच आठवणी तयार होतात. अर्थात आठवणीच असतात त्या. त्यामुळे त्यातील काही मनात जपल्या जातात तर काही वाहून जातात.

पण ज्या आठवणी लक्षात राहतात त्या मात्र जबरदस्त असतात हे मात्र नक्की. बरं त्या जबरदस्त असतात त्यामागची कारणं बहुतांश वेळेस माणसं आणि त्यांचं वागणं ही असतात. मग ते लग्नाच्या मानपानात असो वा मंगळाष्टकं म्हणताना असो वा अगदी डान्स फ्लोअर वर असो. होय, हल्ली लग्नं म्हंटली की नवरा नवरी, भटजीबुवा, डीजे आणि डान्स फ्लोअर असतोच असतोच. डान्स फ्लोअर आला की डान्सर्स आलेच. सोबतच डान्स न येणारे पण आयुष्यात जबरदस्त मजा घ्यायची इच्छा असणारे ही असतातच. त्यात ही दोन्ही प्रकारची मंडळी एकत्र डान्स करणार असली की टांगा पलटी घोडे फरार असाच प्रसंग असतो. जी काही धमाल येते ती काही वेळा शब्दांत वर्णन करता येत नाही, पण लक्षात जरूर राहते.

अशीच काहीशी धमाल काही महिन्यांपूर्वी एका व्हिडियोने लक्षावधी लोकांना दिली होती. हा व्हिडियो नुकताच आपल्या टीमने बघितला. एका लग्नातील डान्स फ्लोअर वर घडणाऱ्या प्रसंगांचा हा व्हिडियो आहे. यात आपल्याला लग्न मंचावर नवरा नवरी आणि वऱ्हाडी मंडळी बसलेली दिसून येतात. समोरच लाईट्स वगैरे असलेला मस्त डान्स फ्लोअर असतो. त्यावर सुरू असतो मस्त असा डान्स. एक तरुण त्याला आवडणाऱ्या विविध डान्स स्टेप्स आणि करामती करून दाखवत असतो. त्याला डान्सची खरंच आवड असावी हे त्याच्या डान्स स्टेप्स वरून कळून येतं. पण त्याचवेळी जवळच उभी असलेली अजून एक व्यक्ती लक्ष वेधून घेत असते. ही व्यक्ती म्हणजे एक काका असतात. या तरुणाने केलेला डान्स त्यांना भयंकर आवडलेला असतो. पण आवड असली तरी वयामुळे ते स्वतःला रोखून धरत असावेत असं पहिल्यांदा पाहताना वाटतं. ते या तरुणाला प्रोत्साहन देत असतात. आपणही त्याच्या डान्स मुव्ह्ज अगदी आवडीने बघत असतो. मजा येत असते. आपणच काय पण खुद्द उपस्थित लोकं ही खुश असतात. त्यांच्या वागण्यावरून ते कळत असतंच. एक दादा या तरुणाला कौतुक म्हणून पैसे द्यायला येतात. आपलं लक्ष आता या दोघांकडे जायला लागतं. पण तेवढयात आधी उभ्या असलेल्या काकांना बहुधा मोकळा डान्स फ्लोअर साद घालत असावा. काका असे काही जोशात येऊन डान्स करतात की काही विचारू नका.

ज्यांचं नाव ते. हे काका असे काही नाचतात की पैसे द्यायला आलेले दादा सुद्धा त्यांच्याचकडे पाहत या तरुणाला पैसे देतात. ही सगळी गंमत अगदी काही क्षणांत होते. पण त्यामुळे जी काही मजा येते की काय विचारू नका. किंबहुना आपण जर हा व्हिडियो याधीही पाहिला असेल तर आम्ही काय म्हणतो आहोत हे आपल्याला लक्षात आलं असेल. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला मस्त आनंद मिळेल. बरं घडल्या प्रकारानंतर ही व्हिडियो चालू असतो त्यामुळे आपलं अजून काही वेळ आपसूकच मनोरंजन होतं. पण वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट शब्दांत मांडता येत नाही. त्यांचा अनुभवच घ्यावा लागतो. त्यामुळे हा व्हिडियो बघा. डान्स जमणारी आणि न जमणारी पण आवडणाऱ्या दोन व्यक्ती एकत्र आल्या की कसं मस्त मनोरंजन होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्याचा जरूर आनंद घ्या.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *