आपली टीम विविध विषयांवर लेखन करत असते हे आपण जाणताच. त्यातही वायरल व्हिडियोज वरील लेख म्हणजे जणू आपली खासीयतच. त्यातही डान्सचे वायरल व्हिडियोज म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय. पण असं असलं तरीही एखादी गोष्ट सतत डोळ्यासमोर असली की थोडा बदल हा हवाहवासा वाटतोच. हीच बाब ध्यानात घेऊन आज आपली टीम एका डान्सच्या वायरल व्हिडियो विषयी तर लिहिल, पण हा डान्स वायरल व्हिडियो लग्नातील नसेल. उलट हा वायरल व्हिडियो आहे एका रस्त्यावर परफॉर्म करणाऱ्या स्ट्रीट डान्सरचा. चला तर मग याविषयी अधिक जाणून घेऊयात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला व्हिडियो च्या डाव्या बाजूने काहीशी गर्दी जमा झालेली दिसते. त्याचवेळी समोरून कानात मोठ्ठाले हेडफोन घातलेला एक तरुण डान्स करत येताना दिसतो. त्याची किरकोळ शरीरयष्टी बघून हा भाई कडक फ्लेक्सिबल असणार असं आपल्या मनात येतं.
आपला हा अंदाज अगदी बरोबर ठरतो. कारण हातांचा आणि पायांचा उत्तम वापर करत एकेक भन्नाट स्टेप्स करत हा तरुण डान्स करत असतो. सोबत गाणं वाजत असतं. Kandy – Non stop (feat. Ragga Twins ) हे ते गाणं. या गाण्याच्या प्रत्येक बिट्स पकडत हा तरुण अफलातून रित्या नाचत असतो. त्याची डान्स करताना पदलालित्य दाखवण्याची स्टाईल तर लाजवाब. व्हिडियोच्या ३२ व्या सेकंदाला तो जो काही एका बाजूला वाकत स्टेप्स करतो त्यास तोड नाही. सलाम आहे भावाला. पण त्याचं कौतुक वाटत असताना पुढच्या दीड एक मिनिटांत त्याच्या कडून झालेल्या काही स्टेप्स तर अवाक व्हायला लावतात. खासकरून १ मिनिटं आणि २१ सेकंदानंतर पायावर बसून हा तरुण अशी काही गिरकी घेतो की किती सहज वाटावं. पण असं काही नाही हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे हे कळून येतं. पुढेही या तरुणाचा डान्स चालू असतो. आजूबाजूने येणारे जाणारे प्रत्येक जण या तरुणाकडे आणि त्याच्या अजबगजब डान्सकडे बघत असतात. आपलीही उत्सुकता वाढते. असा हा अफलातून डान्स करणारा बुवा आहे तरी कोण म्हणून आपण सर्च करतो.
तर कळतं हा एक अमेरिकन पॉपिंग ऍनिमेशन डान्सर आहे. मार्कस स्कॉट (Marquese Scott) असं याचं नाव. लहानपणी स्केटिंग करत असताना त्याची डान्स विषयीची आवड त्याच्या लक्षात आली. मग हाय स्कुल मध्ये या आवडीला चालना मिळाली. या आवडीतून मग डान्स कडे ओढा वळला आणि त्याचे डान्स व्हिडियोज तो युट्युब वर अपलोड करायला लागला. हळू हळू त्याला प्रसिद्ध मिळू लागली. त्याचा एक व्हिडियो तर विशेष गाजला. त्याने युट्युब वर अपलोड केलेल्या ५० हुन अधिक व्हिडियो पैकी हा एक व्हिडियो. Pumped Up Kicks हा तो व्हिडियो. या व्हिडियो ने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. एलेन डिजेनेरस सारख्या प्रसिद्ध मुलाखकार्तीच्या कार्यक्रमात तो चक्क दोनदा जाऊन आला. तसेच अमेरिकाज गॉट टॅलेंट सारख्या जागतिक स्पर्धेत ही तो आणि त्याचा डान्स क्रू सहभागी होता. तसेच त्यांच्या या डान्स मुळे कोका कोला , फरारी सारख्या अनेक जागतिक ब्रँड्स च्या जाहिरातीतही तो दिसून आला होता. असं असलं तरी त्याचा युट्युब वरील वावर कमी झालेला नाहीये. त्याची खासियत म्हणजे विविध देशांतील विविध स्थळांवर जाऊन परफॉर्मन्स करणं. आपल्या मुंबईतही त्याने आपल्या चमकदार डान्सचा जलवा दाखवला होताच. वर उल्लेख केलेला व्हिडियो तो याच डान्सचा.
आपल्या टीमला हा व्हिडियो तर आवडला. सोबतच आज काहीसा बदल म्हणून काहीशा वेगळ्या आणि आंतरराष्ट्रीय कालाकाराबद्दल लिहिता आलं आणि त्याची माहिती आपल्या पर्यंत पोहोचवता आली याचा आपल्या टीमला अतिशय आनंद आहे. आपल्यालाही आमचा हा प्रयत्न आवडला असणार यात शंका नाही. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स द्वारे कळवायला विसरू नका. तसेच आपण आपल्या टीमचे लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करत असता. यांमुळे आपल्या टीमला नवनवीन विषयांवर लेखन करण्याचा उत्साह मिळतो. तेव्हा आपला हा पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी सदैव असू द्या ही विनंती. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :