Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने मॉलमध्ये सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, शेवटला तर पब्लिकमध्ये असलेल्या चाचांनी सुद्धा केली भारी स्टेप

ह्या तरुणाने मॉलमध्ये सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, शेवटला तर पब्लिकमध्ये असलेल्या चाचांनी सुद्धा केली भारी स्टेप

गाणं आणि डान्स या अशा दोन कला आहेत की आपल्या प्रत्येकाला आवडतात. पण एक मात्र खरं की आपल्यातले बरेचसे जण या दोन्ही कलांना सादर करण्याची वेळ येते तेव्हा मात्र काहीसे मागे हटतात. म्हणजे आवड मनात असते, पण आपण कसे दिसू, सगळं व्यवस्थित होईल ना आणि मुळात लोकं काय म्हणतील हे प्रश्न सगळे डोक्यात असतात. पण आपल्या पैकी काही जण मात्र याउलट असतात. त्यांना संधी मिळायची खोटी की ते आपली आवडती कला सादर करायला तयार असतात. आज हे सगळं सांगायचं कारण आपल्याला लक्षात आलं असेलच. हे कारण म्हणजे एक वायरल व्हिडियो. आपल्या टीमने हा व्हिडियो पाहिला तेव्हा त्यातील डान्स बघून आम्हाला याविषयी लिहावं अस वाटलं. चला तर मग या व्हिडियो विषयी थोडक्यात जाणून घेऊयात.

हा व्हिडियो जवळपास तीन एक वर्षांपूर्वीचा व्हिडियो आहे असं लक्षात येतं. हा व्हिडियो एखाद्या मॉल मध्ये चित्रित झाला असावा आणि त्यावेळी २०१८ चा फुटबॉल वर्ल्ड कप चालू असावा असंही लक्षात येत. असो. तर यावेळी आपल्याला एक तरुण त्या मॉल मधील टीव्ही सेक्शन समोर उभा असलेला दिसून येतो. त्याच्या अवतीभवती बरीचशी मंडळी जमलेली असतात.

एव्हाना गाणं सुरू झालेलं असतं. हे गाणं ऐकलंय अस लक्षात येत असताना त्या मुलाच्या मागील टीव्ही वर आपण या गाण्याचा व्हिडियो पाहू शकतो. तेव्हाच आठवतं हे तर सुप्रसिद्ध पंजाबी गाणं आहे – Laung Laichi. या गाण्याला युट्युबवर १०० करोडहुन अधिक लोकांनी पाहिलं आहे. यावरून या गाण्याची लोकप्रियता लक्षात यावी. अशा या लोकप्रिय गाण्यावर हा तरुण नाचायला सुरुवात करतो. त्यांच्या डान्स स्टेप्स, त्यांची चपळाई यावरून त्याला डान्सची आवड आणि सवय असावी असं वाटतं. त्याच्या पायांचा वापर करत असलेल्या स्टेप्स तर खूपच छान. हावभाव ही जबरदस्त म्हणावे असेच असतात. तसेच डान्स करताना तो गाणं गात ही असतो. प्रत्येक बिट पकडत त्याचा डान्स चालू असतो. तसेच जेव्हा शब्द नसून केवळ म्युझिक चालू असतं तेव्हाही त्याचा डान्स चालूच राहतो. उपस्थितांनी त्याचा डान्स बघितला आणि आवडला नाही असं फार क्वचित झालं असावं. कारण गाणं आणि याच्या स्टेप्स सुरू झाल्यापासून सगळेच जण त्याला प्रोत्साहन देत असतात. टाळ्या शिट्या यांची तर कमतरता नसतेच. यात भर म्हणून एक चाचा तर थेट त्याच्या सोबत डान्स करायला सुरुवात करतात. त्या काकांचा ही डान्स भाव खाऊन जावा असाच असतो.

आजूबाजूला उपस्थित असलेले सगळे जण हे क्षण कॅमेऱ्यात टिपून घेण्यासाठी सरसावलेले असतात. एका अर्थाने या काकाचं या डान्समध्ये सहभागी होणं हे या तरुणाच्या डान्सची पोचपावती म्हणायाल हवी. कारण जेव्हा एखादी कला आणि त्यातही गाणं, डान्स सादर होत असेल आणि समोरील प्रेक्षक त्यात आपसूक सहभागी होत असतील तर त्याच श्रेय त्या त्या कलाकारांना द्यायला हवं. तसेच पंजाबी गाणं म्हणजे धमाल असतेच. त्यामुळे एकंदरच काय तर माहोल जमून येतो आणि तीन वर्षांपूर्वीचा व्हिडियो असला तरी आजही तो आपल्याला आनंद देऊन जातो. आपणही हा व्हिडियो आधी बघितला असल्यास आपल्याला आवडला असेल.

सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमी विविध विषयांवर लेख घेउन येत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत आम्हाला प्रोत्साहन देत असता. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. आमची टीमही आपल्यासाठी नेहमीप्रमाणे उत्तमोत्तम लेख घेऊन येत राहीलच याची खात्री बाळगावी. लवकरच नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले अन्य लेख वाचा. प्रत्येक लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *