Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने रस्त्यावर महिलांसोबत केला अप्रतिम डान्स, भाऊच्या स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

ह्या तरुणाने रस्त्यावर महिलांसोबत केला अप्रतिम डान्स, भाऊच्या स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

नृत्य ही कला अशी आहे की जी अतिशय मनापासून सादर केली असता सगळ्यांचं मन जिंकून जाते. त्यासाठी असावी लागते ती डान्सची मनापासून आवड आणि त्यासाठी मेहनत करण्याची वृत्ती. पण असे नसेल तर या कलेचे सादरीकरण म्हणावे तसे उत्तम होत नाही. याउलट एखाद्या व्यक्तीकडे वर उल्लेख केलेल्या गोष्टी असतील आणि नृत्यनिपुणता नसेल तरीही त्या व्यक्तीचा डान्स आपल्याला प्रेक्षक म्हणून आनंद देऊन जातो. याचं कारण अर्थातच सरळ आहे. आपण जेव्हा मनापासून नाचतो तेव्हा आपल्या देहबोलीतून ते सगळं प्रकट होतं. त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. आपला परफॉर्मन्स आपोआप उत्तम होत जातो आणि लोकप्रिय ठरत जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक उदयोन्मुख युट्युबर – अंकित जंगीड. कलासक्त वृत्ती असलेला हा तरुण उत्तम फोटोग्राफर आहे, उत्तमरीत्या स्वतःचे विचार शब्दांत मांडू शकतो आणि त्याउप्पर तो अतिशय उत्तम असा डान्सर आहे. याचे उदाहरण म्हणजे त्याच्या चॅनेल वर वायरल झालेले अनेक डान्स व्हिडियोज आपल्याला बघायला मिळतात.

त्याचा आजतागायतचा सगळ्यांत प्रसिद्ध व्हिडियो कोणता असेल तर तो आहे त्याने त्याच्या वहिन्यांसोबत केलेला डान्स. ‘बहु काले की’ या हरयाणवी गाण्यावर या तिघांनी अतिशय उत्तम डान्स केला होता. तसेच त्याच्या ८९ वर्षांच्या आजींसोबत ही त्याने केलेला डान्स वायरल झाला होता. असा हा अंकित आता पुन्हा चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या डान्स व्हिडियोमुळे. हा लेख लिहीत असताना अवघ्या सतरा दिवसात त्याच्या या डान्स व्हिडियोने साडे पाच लाख व्ह्यूजचा टप्पा पार केलेला आहे.

या व्हिडियोत अंकित आपल्याला पुन्हा एकदा धमाल डान्स करताना दिसतो. यावेळी त्याच्यासोबत असतात त्या दोन राजस्थानी डान्सर्स. पारंपरिक राजस्थानी पेहराव केलेल्या या नृत्यांगना, त्यांच्या नृत्य कलेत निपुण असतातच. त्यात त्यांना जोड लाभते ती अंकित याची. अंकितने डान्स कुठे शिकला आहे की नाही कल्पना नाही. पण भाऊ असा नाचतो ना, की ज्याचं नाव ते. एक वेळ तर अशी येते की त्याच्याबरोबर डान्स करणाऱ्या दोन मुली स्वतः थांबतात की काय असं वाटून जातं. इतक्या ऊर्जेने आणि तडफेने हा बंदा नाचत असतो.

यावेळी ही गाणं हे हरयाणवी असतं. ‘कांधे पे दुनाई लेके’ हे नरेदर भंडाना आणि पूनम गोस्वामी यांचे गाणं यावेळी वाजत असतं. या गाण्यावर सुप्रसिद्ध नृत्यांगना, सपना चौधरी यांचे डान्स खूप प्रसिद्ध झाले होते. अशा या लोकप्रिय गाण्यावर नाचत असताना अंकित तर बेभान होऊन नाचत असतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा नाचता नाचता त्याला सुरुवातीला थोडा वेळ त्या रिदम मध्ये यायला लागतो. पण काहीच सेकंदात तो रिदम मध्ये येतो. तोपर्यंत डान्स करणाऱ्या मुलींनी मस्त ठुमके लगावलेले असतात. मग येतो अंकित. असे काही ठुमके लगवतो आणि तेही अगदी वेगाने की तिथेच कळतं – भाई आज छा जाने वाला हैं. होतंही तसच. जबरदस्त नाचतो. आजूबाजूचे तर त्याचा डान्स कॅमेऱ्यात कैद करायला जात असतात. पण त्याचं लक्ष केवळ डान्स कडे असतं. त्या दोन डांसर्स मधील एक डान्सर आणि या अंकित भावाची जणू जुगलबंदी रंगलेली असते. ती ही धमाल नाचत असते. यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे दोघांनाही हे गाणं पाठ असलेलं दिसतं. त्यामुळे यात जेव्हा गोळ्या चालण्याचे आवाज येतात तेव्हा दोघांच्या स्टेप्स ही त्याला योग्य अशाच होतात.

व्हिडियो तसा अडीच मिनिटांचा आहे. त्यात पूर्ण वेळ तर अंकित का माहौल असतो. पण शेवटची २३ सेकंद विशेष महत्वाची ठरतात. कारण यात अंकित आणि ती डान्सर मुलगी असे काही नाचतात की बहार येऊन जाते. दोघांच्या गिरक्या, ठुमके, लटके झटके आणि डान्सची गती आपलं मन जिंकून जाते. ही दोघं अशी काही नाचतात की आजूबाजूला काय चालू आहे वगैरे गोष्टींचं भान आपल्यालाही नसतं. मधेच एक कोणी तरी येतो आणि अंकितवर पैसे ओवाळून जातो. त्या क्षणी थोडं लक्ष विचलित होतं. नाही तर पूर्ण वेळ आपण जो कमाल बेमीसाल डान्स चालला असतो तोच बघत असतो. एखादा कलाकार जेव्हा डान्स करत असतो आणि आपलं त्याच्यावरून लक्ष विचलित होत नाही यातच त्या कालाकारासाठी पोचपावती आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास, आपणही आमच्या या मताशी सहमत व्हाल.

या व्हिडियो सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख, आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम विषय हाती घेऊन लेख लिहीत असते. त्यात आपण ज्या सूचना करता, प्रतिक्रिया देता त्यातून आम्हाला नवनवीन गोष्टी कळत राहतात. त्यातूनही आम्ही सुधारणा करत राहतो आणि उत्तमोत्तम लेख आपल्याला वाचायला मिळतात. तेव्हा आपला वाचक म्हणून आपल्या टीमशी असलेला हा स्नेह वाढीस लागू दे हीच सदिच्छा. आपल्या प्रोत्साहनासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *