Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने लग्नामध्ये लग्नामध्ये केला अतरंगी डान्स, भाऊंचे चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून हसू आवरणार नाही

ह्या तरुणाने लग्नामध्ये लग्नामध्ये केला अतरंगी डान्स, भाऊंचे चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून हसू आवरणार नाही

सध्या सगळेच जण, उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नात मग्न आहेत. अनेकांची लग्न या काळात झाली आहेत, होत आहेत आणि यापुढेही होतील. मग एकदा का पावसाळा आला की हा लग्नाचा काळ ही काहीसा मागे पडेल. पण तोपर्यंत सगळी मज्जा आपण करून घेतलेली असणार. लग्न हा तसाही आनंद सोहळाच असतो. दोन व्यक्ती, त्यांची कुटुंब यांनी एकत्र येण्याचा हा सोहळा, सगळ्यांच्या साक्षीने पार पडत असतो. आता इतकी सारी मंडळी एकत्र जमली कि धमाल तर होणारच !

त्यातही एवढ्या सगळ्यांमध्ये निदान एखादी व्यक्ती तरी अतरंगी असतेच. त्यांना आयुष्यात मजा घेणं ही बाब चांगलीच जमलेली असते. किंबहुना अंगवळणी पडलेली असते म्हणा ! एका अर्थी चांगलं ही असतं ते ! कारण सतत इतरांचा विचार करत कुढत बसण्यापेक्षा, मनमोकळेपणाने जगलेलं केव्हाही बरं ! त्यात, इतरांना त्रास न होता कोणी आनंद घेत असेल तर चांगलच आहे की. त्यात अशा मंडळींना, त्यांच्यासारखीच अतरंगी मंडळी भेटली की मजा दुप्पट होणार यात शंका नसते. मग तर उपस्थितांच्या मनोरंजनाला मर्यादा नसते. कारण ही मंडळी, एकत्र येत मस्त धमाल करत असतात. याचंच एक उत्तम उदाहरण आमच्या टीमला बघायला मिळालं.

अर्थात हे काही आम्ही उपस्थित राहुन बघितलेलं उदाहरण नाहीये. तर एका वायरल व्हिडियोमुळे हे उदाहरण बघायला मिळलेलं आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला अनेक जण एकत्र आलेली दिसतात. त्यात बरीचशी मोठी माणसं असतात. काही जण कॅमेऱ्यासमोर बसलेली असतात तर काही डान्स करत असतात. पण त्यातही दोन व्यक्ती आपलं लक्ष विशेषकरून आकर्षून घेतात. एक बहुधा नवरा मुलगा असतो आणि दुसरी बहुधा त्याची बहीण वगैरे असावी. पण या दोघांचा असा काही डान्स होत असतो की विचारता सोय नाही. खरं तर डान्स पेक्षा ही, हावभावांची जुगलबंदी चालू असते. सगळ्यांत अतरंगी हावभाव कोणाचे ही चढाओढ असते. अस असलं तरी ती मुलगी कॅमेऱ्याच्या पाठ करून उभी राहिल्याने तिच्या चेहऱ्यावरील हावभाव म्हणावे तेवढा वेळ दिसत नाहीत. तरी ते अतरंगी आहेत म्हणू शकतो इतकं मात्र नक्की. पण नवरा मुलगा वाटणाऱ्या मुलाचे हावभाव मात्र आपण पूर्णवेळ पाहू शकतो. काय एकेक हावभाव हो ! जबरदस्त ! बघून हसायला आलं नाही असं होणारच नाही. त्यात हात पुढे घेऊन कोंबड्यासारखी मान हलवताना तर आपली हसून हसून आपली मुरकुंडी वळते. आपलीच काय तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांची ही तीच अवस्था असते. आणि त्यांचीच काय पण त्या मुलाची आणि त्या मुलीची सुद्धा तीच अवस्था असते. एका क्षणी दोघेही तोंडावर हात घेऊन हसत सुटतात. हा व्हिडियो तसा काही सेकंदांचा आहे. पण त्यातील मजा, गंमत खूप जबरदस्त आहे. हल्ली कमी वेळेच्या व्हिडियोच पेव फुटलंय. पण त्यातील काहीच व्हिडियो असे मनोरंजन करणारे असतात.

बाकी सगळा टाईमपास असतो. पण, म्हणूनच मनोरंजन करणाऱ्या व्हिडियोज बद्दल आमच्या वाचकांसाठी लिहायला आमच्या टीमला आवडतं. त्यात अशी मंडळी असली, जी आयुष्याचा आनंद घेत असली, की अजून मजा येते. त्यामुळे लिहिताना ही आनंद होतो. याच सगळ्यातून आजच्या सारखे लेख तयार होतात. पण म्हणून केवळ लेखावर आपली बोळवण आम्ही करू असं होणार नाही. या लेखाच्या शेवटी आम्ही सदर व्हिडियो शेअर करतो आहोत. जेणेकरून आपल्याला त्या व्हिडियोचा आनंद घेता यावा.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.