Breaking News
Home / मराठी तडका / ह्या तरुणाने लग्नामध्ये आपल्या वहिनींसोबत केला जबरदस्त डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या तरुणाने लग्नामध्ये आपल्या वहिनींसोबत केला जबरदस्त डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

प्रत्येक कलेची स्वतःची अशी काही वैशिष्ट्य असतात. तशीच ती कलाकारां मध्ये ही असतात. तसेच ही वैशिष्ट्य त्या त्या कलेमध्ये माहीर असलेल्या कलाकारांमध्ये अगदी समान ही असतात. अर्थात हे आमचं निरीक्षण आहे. आपली मतं याबाबतीत वेगळी असू शकतात. पण, ढोबळमानाने ही वैशिष्ट्य आपल्याला कलाकारांमध्ये दिसून येतात.

जसे की एखादा लेखक म्हंटला की तो बहुधा गहन विचार करणारा असतो. तसा तो असावा हीच इच्छा ही असते. कारण विचारांती लिखाण केले तरच ते लेखकांना स्वतःला आणि वाचकांना ही आवडणार. तशीच बाब डान्स करणाऱ्या मंडळींच्या बाबतीतची ! ही मंडळी सदैव उत्साही असतात. त्यांच्यात एक नैसर्गिक असा ऊर्जास्त्रोत वाहत असतो. तसेच कधीही परफॉर्मन्स करायला तयार असण्याचा बाणा असतो. तसेच सगळ्याच कलाकारांमध्ये आढळणारी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या कलेचा विषय निघाला अथवा त्याच सादरीकरण होत असेल तर कलाकारांना शांत बसवत नाही. त्यांचे हात शिवशिवत असतात. कधी एकदा आपल्याला आवडणाऱ्या कलेचं सादरीकरण करतो असा त्यांचा कल असतो. खासकरून डान्स करणारी मंडळी तर यात अगदी आघाडीवर असतात. मुळातच ही मंडळी उत्साही असतात. त्यात संधी मिळाली असता बघायलाच नको.

आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अंकित जंगीड याचं उदाहरण घेऊ. अंकित एक उदयोन्मुख कलाकार आहे. तो युट्युबवर एक चॅनेल चालवतो. या चॅनेलच्या अथपासून ते इतिपर्यंत तुम्हा आम्हाला फक्त एकच गोष्ट दिसते ती म्हणजे डान्स, डान्स आणि डान्स होय ! या डान्सची या आपल्या मित्राला, अंकित याला भयंकर आवड आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत त्याने असंख्य व्हिडियोज पोस्ट केले आहेत. अर्थात खंडीभर कंटेंट पोस्ट नाही केलाय ही एक जमेची बाजू. पण जो काही कंटेंट आहे त्यात या मुलाने जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. मग तो सोलो डान्स असो वा ग्रुप डान्स असो. पोरगा काय नाचतो. अहाहा ! कडक ! त्याच्यात एक स्वतःचा म्हणून रिदम आहे. त्यात एखादं हरयाणवी गाणं लागलं की मग सोने पे सुहागा ! या पोरांचं या गाण्यात तुफान परफॉर्मन्स होतो. त्याच्या डान्स स्टेप्स कोणालाही आवडतील अशा असतात. बरं ठरवून करतो तर तसंही नाही. जे काही आहे ते मनापासून आणि अचानक ! पण तरीही मन जिंकून जातो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठी कोणाचा तरी हात असतो.

अंकितच्या बाबतीत हा हात त्याच्या आईस्वरूप वाहिन्यांचा आहे अस म्हंटल्यावर वावगं ठरू नये. कारण तुम्ही थोडं काळात मागे गेलात तर कळतं की अंकित डान्सचे व्हिडियोज बनवत असे. ते खूप लोकप्रिय ही होत. पण त्याने त्याच्या वाहिन्यांसोबत एका लग्नात डान्स केला. तो व्हिडियो एवढा वायरल झाला की तिथपासून ते आजपर्यंत त्याने कधीही मागे वळून बघितलं नाहीये. त्याच्या स्वतःच्या डान्स व्हिडियोजनी सुद्धा जबरदस्त कामगिरी केलीय. पण त्याच्या वहिनी सोबत असल्या की या दिर आणि वाहिन्यांच्या डान्सने धमाल येते. कारण तो जसा मनापासून नाचतो तशाच त्या सुद्धा अगदी मनापासून नाचतात. तसेच त्यांच्या लेकसमान असणाऱ्या या दिराचं त्यांना कौतुक ही आहेच. नुकताच अंकित आणि त्याच्या वाहिन्यांचा डान्स व्हिडियो पुन्हा एकदा नव्याने दाखल झाला आहे. मधल्या काळातही काही समारंभांमध्ये या दिर वाहिन्यांच्या ग्रुपने केलेले डान्स वायरल झाले होतेच. हा नवीन व्हिडियो ही यास अपवाद नसणार हे नक्की. आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि आम्हाला आवडून गेला. त्यात अंकित आपल्याला नेहमीच्या जोशात दिसतो.

तसेच त्याला उत्तम डान्स आणि अभिनयाची साथ द्यायला त्याच्या वहिन्या ही असतात. बरं त्यात नयी नवेली हे हरयाणवी गाणं ही आहे. त्यामुळे ही सगळी मंडळी उत्साहात नाचत असतात. तसेच कौतुकाची बाब ही की पूर्ण गाण्यावर या सगळ्यांनी डान्स केला आहे. नाही तर हल्ली शॉर्ट व्हिडियोजचं पेव इतकं फुटलंय की सगळे छोटे छोटे व्हिडियो असतात. पण त्यात डान्सची वा गाण्याची मजा घेता येत नाही. हा व्हिडियो मात्र त्यास अपवाद आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही जाणवलं असेलच. नसेल बघितला तर जरूर बघा. आपली टीम आपल्या वाचकांसाठी या व्हिडियोला लेखाच्या शेवटी शेअर करणार आहे. त्याचा आपण जरूर आनंद घ्या.

चला मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आजचा लेख ! आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *