Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने सर्वांसमोर स्टेजवर केला अप्रतिम डान्स, डान्समधील एनर्जी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या तरुणाने सर्वांसमोर स्टेजवर केला अप्रतिम डान्स, डान्समधील एनर्जी पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

काळ बदलला की माणसाच्या आवडीनिवडी, सवयी बदलतात. त्या तशा बदललेल्या चांगल्या ही असतात. कारण त्यामुळे माणूस बदलत्या काळासोबत चालत राहतो. पण अस असलं तरी गतकाळातील काही बाबी मात्र आपल्या मनात कायमचं स्थान करून बसतात. त्यांचा काळ बद्दलण्यावर काही एक परिणाम होत नाही. खासकसरून जुन्या काळातील गाणी हे याच एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. याच कौतुक यासाठी की जुनी गाणी तशी जास्त वेळेची आणि आजच्या मानाने संथ वाटावीत अशी असतात.

अगदी गतकाळातील गतिमान म्हणावं अस गाणंही आजच्या मानाने हळुवार वाटतं. पण त्यातील शब्द मात्र अजूनही काळजाला भिडतात. इतकंच काय तर त्या गाण्यांवर जर एखादा डान्स परफॉर्मन्स झाला असेल तर तो ही लक्षात राहतो. त्यात डान्स करणारी कलाकार व्यक्ती जबरदस्त डान्सर असेल तर सोने पे सुहागा म्हणतात तशी अवस्था होते ! असो. सांगण्याचा मुद्दा काय तर काहीशी जुनी गाणी आपल्या मनात कायमच स्थान मिळवून असतात. याचंच एक प्रातिनिधिक उदाहरण आपल्या टीमला आज बघायला मिळालं. हे उदाहरण अर्थातच एका वायरल व्हिडियोच्या माध्यमातून बघायला मिळाले.

हा वायरल व्हिडियो जवळपास सहा ते सात वर्षांपूर्वीचा आहे. पण आजही त्यातील डान्स परफॉर्मन्स आपल्याला आवडून जातो. यातील गाणं हे तसं आपल्या सगळ्यांच्या आवडीचं आहेच. ‘हवाओं ने ये कहा’ हे ते गाणं होय. हृतिक रोशन आणि अमिषा पटेल या आपल्या ऑल टाइम फेवरीट जोडीच्या ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ या सिनेमातील हे गाणं आहे. मध्यंतरी कोणी तरी हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं होतं त्यासही जबरदस्त असा प्रतिसाद मिळाला होता. लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले होते. जवळपास वीस वर्षे उलटून गेली तरी हे गाणं आजही लोकप्रिय आहे याचीच ही झलक म्हणायला हवी. दुसरी झलक आमच्या टीमने बघितलेल्या व्हिडियोत बघायला मिळते. या व्हिडियोला आतापर्यंत जवळपास सवा दोन करोड लोकांनी बघितलं आहे. अर्थात या गाण्यासोबतच या व्हिडियोत दिसणारा डान्स ही त्यास कारणीभूत आहे हे नक्की ! या व्हिडियोत आपल्याला साहिल जग्गल हे युट्युबर डान्स करताना दिसतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात त्यांनी हा डान्स केला होता हे कळून येतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला डीजे आणि डान्स फ्लोअर समोर दिसून येतात. त्या डान्स फ्लोअरवर साहिल हे अगदी सुटबुटात असतात. तेवढ्यात वर उल्लेख केलेलं गाण सुरू होत आणि साहिल यांचा डान्स सुरू होतो.

या डान्सच्या सुरुवातीलाच त्यांचं अप्रतिम पदललित्य दिसून येतं. जे पुढे वेळोवेळी आपल्याला त्यांच्या या डान्स मधून दिसतं. सुरुवातीलाच जर दमदार डान्स स्टेप बघायला मिळाली तर सहसा आपल्या मनाला कळलेलं असतं की यापुढचा डान्स ही जबरदस्त होणार आहे. इथेही तेच होतं. साहिल यांच्या पुढच्या स्टेप्स आणि हा एकंदर डान्स जबरदस्त असणार याचा अंदाज आपण पहिल्या काही क्षणातच बांधतो. आपला हा अंदाज खरा ही ठरतो. या सगळ्या परफॉर्मन्स मध्ये सांगण्या सारख्या असंख्य बाबी आहेत. पण त्यात सगळ्यांत महत्वाची वाटणारी बाब म्हणजे साहिल यांचं डान्स प्रति असलेलं प्रेम आणि त्यांनी हे व्यक्त करण्यासाठी वापरलेली ऊर्जा होय. या उर्जेतूनच त्यांना जवळपास पाच ते सहा मिनिटं डान्स करण्यासाठी उत्साह येत असावा. अन्यथा एवढा वेळ डान्स करणं हे वाटतं तेवढं सोप्पं नाहीये. तसेच या व्हिडियो विषयी आवडून जाणारी अजून एक गोष्ट म्हणजे यातील चित्रीकरण होय. अनेकवेळा आपण एखादा व्हिडियो बघण्यात एवढे मश्गुल होऊन जातो की कॅमेरामनने केलेली कलाकारी आपल्या चट्कन लक्षात येत नाही. पण इथे उत्तम गाणं आणि डान्स सोबतच कॅमेरामन ही आपली जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडतो.

परिणामतः हा व्हिडियो एखाद्या सिनेमातील सिन सारखा भासतो. यातही नमूद करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींचा इथे उल्लेख झाला तर आपल्याला त्या बघताना स्वतःला मजा येणार नाही. तसेच व्हिडियो बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे बोलण्यासारखे ही बरेच काही आहे. पण मग त्यानंतर तो व्हिडियो बघण्यात आपल्याला मजा येणार नाही. म्हणून सध्या इथेच थांबतो. मात्र खास आपल्या वाचकांसाठी आपल्या टीमने तो व्हिडियो लेखानंतर शेअर केलेला आहे. आपण ही याचा आनंद घ्यावा ही त्यामागची सदिच्छा ! आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला तेव्हाच आवडून गेला होता. यात मस्त डान्स आणि सोबत आपल्याला आवडणारं गाणं असल्याने याविषयी लिहायला हवं असं वाटलं. आपल्या वाचकांना याविषयी कळायला हवं ही यामागची इच्छा होती. या लेखाच्या निमित्ताने आमच्या टीमने ती पूर्ण केली आहे.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. या लेखाच्या निमित्ताने साहिल यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *