Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने सर्वांसमोर जो परफॉर्मन्स केला त्याला काही तोड नाही, पहा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ

ह्या तरुणाने सर्वांसमोर जो परफॉर्मन्स केला त्याला काही तोड नाही, पहा हा जबरदस्त डान्स व्हिडीओ

आयुष्यात आनंदी होण्यासाठी आपण सगळेच झटत असतो. आपली प्रत्येक कृती ही आपल्याला आनंदी करण्यासाठी असते. त्याअर्थी आपण स्वार्थी ठरतो. पण आनंद भावनेचं एक वैशिष्ट्य आहे. आपण आनंद वाटण्याचं ठरवलं की ही भावना आपोआप वाढीस लागते. किंबहुना इतरांना ही आपल्याला बघून हुरूप येतो. काही जण तर त्याही पलीकडे जाऊन आपल्या आनंदात आपल्या सोबत सामील होऊ पाहतात. अर्थात प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतात. पण आजच्या या लेखात आपण त्यांच्यावर लक्ष द्यायला नको. कारण आजचा हा लेख (आणि आमचे बहुतांश लेख) आपल्या वाचकांना केवळ आनंद देण्यासाठी आहे. असो.

स्वतः डान्सचा आनंद घेत, तो आनंद इतरांना ही देणाऱ्या एका मुलाचा डान्स व्हिडियो आमच्या टीमने नुकताच बघितला. हा व्हिडियो खरं तर सहा सात महिन्यांपूर्वी वायरल झाला होता. या एवढ्या कमी काळात या व्हिडियोने तब्बल २५ लाखांहून अधिक व्ह्यूज कमावले आहेत. यावरून हा व्हिडियो किती लोकप्रिय झाला होता याची कल्पना यावी. पण हा व्हिडियो एवढा लोकप्रिय का झाला होता? कारण यात डान्स केलेल्या मुलाच्या मस्त डान्स स्टेप्स, त्याचं बिनधास्त वागणं हे तिथे उपस्थित सगळयांना आणि आपल्याला ही आवडून जातं ! त्याचा वावर आत्मविश्वासपूर्ण असतो.

आपल्या शाळेत वा महाविद्यालयात एक मुलगा किंवा मुलगी असते बघा जी, ‘सबके आखों का तारा’ असते, म्हणजे सगळ्यांची लाडकी व्यक्ती असते. हा मुलगा ही त्याच्या या महाविद्यालयात लोकप्रिय विद्यार्थी असावा. कारण व्हिडियो सुरू झाल्यापासून या मुलाचा डान्स सुरू होतो आणि त्यावर उपस्थित मुलं मुली, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी सगळेच फिदा झालेले कळून येतं. आणि का होऊ नये. या मुलाचा अंदाज हा भारी स्मार्ट असतो. त्याची एन्ट्री होते आणि तो खिशातलं गुलाब तिथे उपस्थित असलेल्या शिक्षिकेस देतो. ते गुलाब काढतानाची त्याची डान्स स्टेप भाव खाऊन जाते. पुढच्या त्याच्या परफॉर्मन्स मध्ये त्याची जबरदस्त ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते. बरं ही ऊर्जा सुरुवातीला दिसत नाही का. तर दिसते. पण गाण्याच्या गती नुसार ती दिसते. यासाठी या मुलाचं विशेष कौतुक आहे. तसेच गाण्याच्या बोलांनूसार कोरिओग्राफी करण्याची त्याची लकब ही लक्षात येते जेव्हा तो ‘पागल हुवा, दिवाना हुवा’ या ओळींवर खाली पडून स्टेप करतो.त्यासाठी थोडा खट्याळपणा पण आवश्यक आहेच. बरं ही तर सुरुवात असते आणि हे केवळ पहिलंच गाणं असतं. अजून एक गाणं यायचं बाकी असतं.

आता आपण पहिल्यांदा हा व्हिडियो बघत असाल तर आपल्याला हे माहीत नसतं. त्यामुळे एकप्रकारे हा सुखद धक्का असतो. आणि माहिती असेल तर आपल्या अपेक्षा ही या मुलाकडून वाढतात. कौतुक असं, की तो ही त्याच्या कोरिओग्राफीमधून या अपेक्षा पूर्ण करतो. एकदम जबरदस्त ऊर्जा लावतो. धमाल आणतो. हे सगळं करत असताना त्याच्यातला गमत्या स्वभाव ही लक्षात येत राहतो. त्यामुळे हा परफॉर्मन्स अजून जास्त लोकप्रिय होतो हे नक्की. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आम्ही काय म्हणतो आहोत हे आपल्याला कळलं असेलच. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. तीन साडे तीन मिनिटांचा हा व्हिडियो आहे. पण त्यातून मिळणारा आनंद हा त्यापेक्षा जास्त आहे. म्हणूनच आपल्या टीमने सदर व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करायचं ठरवलं आहे. आपण त्याचा आनंद जरूर घ्यावा.

आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.