Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने सर्वांसमोर जो डान्स केला आहे त्याला कशाचीच तोड नाही, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

ह्या तरुणाने सर्वांसमोर जो डान्स केला आहे त्याला कशाचीच तोड नाही, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय राहणार नाही

गेल्याच आठवड्यात अमृता खानविलकर आणि एका बाल कलाकाराच्या वायरल झालेल्या व्हिडियो विषयी आमच्या टीमने लिहिलं होतं. तसेच अमृता यांचा चंद्रमुखी हा सिनेमा ही पाहण्यात आला होताच. नेहमीप्रमाणे उत्तम अभिनय, उत्तम नृत्य यांचं सादरीकरण अमृता यांनी केलं होतं. त्यांची ही नवीन कालाकृती पाहताना त्यांनी आधी साकार केलेल्या कालाकृती न आठवाव्या तरच नवल. साधारण दशकभरापूर्वी आलेल्या, ‘नटरंग’ या सिनेमाच्या पाऊलखुणा आजही आपल्या मनावर कायम आहेत. त्यातील वाजले की बारा हे गाणं, त्यावरचा अमृता यांचं नृत्य हे तर कायम स्मरणात राहील असच आहे.

या नृत्याची पुन्हा एकदा आठवण झाली. तसंही अधेमधे कधी जुन्या गाण्यांची आठवण झाली की त्यात हे गाणं असतंच. पण आज ही आठवण विशेष ठरली. कारण अर्थातच चंद्रमुखी सिनेमाचं असणं आणि सोबतच एक जबरदस्त वायरल व्हिडियो बघायला मिळणं. हा वायरल व्हिडियो साधारण सहा ते सात वर्षे जुना आहे. या काळात या व्हिडियोने दोन लाखांच्या आसपास व्ह्यूज मिळवले आहेत. पण खरं पाहता या व्हिडियोला यापेक्षा कित्येक पटीने जास्त व्ह्यूज मिळावेत असा हा व्हिडियो आहे. निदान आम्हाला तरी तसं वाटतं. पण असं वाटण्यामागे कारण असायला हवं ना? आहे. जरूर आहे. कारण आहे, ते एका नृत्यनिपुण मुलाने सादर केलेली, ‘वाजले की बारा’ या गाण्यावरची लावणी होय.

 

आपल्याकडे डान्स आवडणारी मुली आणि मुलं, निदान एकदा तरी लावणी सादर करू इच्छितातच. ही लोककलाच अशी आहे की तिची भुरळ पडावी. आणि काही कलाकार इतक्या तन्मयतेने ही कला सादर करतात की प्रेक्षकांना मनापासून आनंद व्हावा. हा आनंद आपल्याला या व्हिडियोत ही दिसून येतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये बसलेले लोकं दिसून येतात. एक दादा, कानाला माईक लावून उभे असतात. ते अर्थातच, कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि सूत्रधार असतात हे काही वेगळं सांगावं लागत नाही. तसेच त्यांच्या आजूबाजूला बाकीची मंडळी बसलेली असतात आणि आपापली कामं करत असतात. तर समोरच सोसायटीमधील प्रेक्षकवृंद बसलेला असतो. पुढच्या काही क्षणातच सादर होणाऱ्या एका अप्रतिम नृत्याचे ते साक्षीदार होणार असतात. तेवढ्यात व्हिडियो सुरू होतो आणि एक मुलगा पुढे येतो. शर्ट, जीन्स आणि त्यावर स्पोर्ट्स शूज असा त्याचा पेहरव असतो. आता या पेहरावात अप्रतिम लावणी सादर होईल हे सांगूनही खरं वाटणार नाही. पण कलाकार त्याच्या कलेशी एकदा का एकरुप झाले की सादरीकरण आपोआप उत्तम होत जातं. इथेही हेच दिसून येतं. हा मुलगा नृत्य करायला लागल्यापासून पुढची जवळपास सहा मिनिटे न थकता, न थांबता डान्स करत राहतो. खरं तर एवढा वेळ डान्स करणं आणि ते ही लावणी म्हणजे दमछाक ही ठरलेली. कदाचित नंतर त्याला जाणवलं ही असेल. पण त्यावेळी मात्र तो अगदी तन्मयतेने नाचतो.

लावणीत समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक गोष्टी करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मग ती अदाकारी असेल, हातांची लयबद्ध हालचाल असेल, हावभाव असतील की चपळाई असेल. हा मुलगा लावणीतील सगळी सौंदर्यस्थळ दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. त्याचं नृत्यावर असलेलं प्रेम हे त्याच्या सादरीकरणातून दिसून येतं. आमच्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला. आपल्या वाचकांना ही हा व्हिडियो बघायला आवडेल याची खात्री वाटली. म्हणूनच हा व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर करत आहोत. आपल्याला हल्ली छोटे व्हिडियो बघायची सवय झाली आहे. पण वेळात वेळ काढून हा व्हिडियो एकदा बघाच. तुमचा वेळ सत्कारणी लागेल आणि तुम्हाला प्रचंड आनंद देऊन जाईल हे नक्की.

बरं तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *