Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणाने सर्वांसमोर मुंबईच्या रस्त्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या तरुणाने सर्वांसमोर मुंबईच्या रस्त्यावर केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

सध्याच्या सोशल मीडिया फोफावलेल्या या जगात अनेक जण विविध व्हिडियोज च्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करत असतात. यातील अनेक जण नृत्य या कलाप्रकाराचा वापर करत स्वतःतील कला सादर करत असतात. बरं यासाठी एखादं विशेष ठिकाण असावं लागतं असंही नाही. रस्त्याच्या कडेला, एखाद्या पायवाटेवर किंवा अगदी एखाद्या गल्लीतही या तरुण कलाकारांचा परफॉर्मन्स बघायला मिळतो. यातील अनेक जण उत्तम परफॉर्म करत असतात. असाच एक अफलातून डान्सरचा व्हिडियो आपल्या टीमला दिसला. आपल्या टीमला यावर एक लिहिला तर नक्की आवडेल हे लक्षात आलं आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे.

हा व्हिडियो आहे मुंबईतला. एका सिग्नलजवळच्या फुटपाथवर उभा राहून एक तरुण डान्स करतानाचा हा व्हिडियो आहे. त्याच्या या तीन मिनिटाच्या डान्स ने आपण या व्हिडियोला अगदी खिळून जातो. हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. कारण, पॉपिंग आणि रोबोटिक्स या डान्सप्रकरांबाबत आपल्याला आकर्षण हे वाटतंच. त्यातही एवढा अफलातून डान्स करणारा डान्सर असेल तर क्या कहने.. वा भाई वा, मजा आ गया अशाच प्रतिक्रिया येतात.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा पहिली १० सेकंद आपल्याला हा मुलगा उभा असलेला दिसतो. पण यात आवाज येत नाही. आपल्या फोन किंवा लॅपटॉप चा आवाज वगैरे आपण तपासून पाहतो. तेवढ्यात अकराव्या सेकंदाला मंद पण ऊर्जा भरणार संगीत ऐकायला मिळतं. पुढे संपूर्ण व्हिडियोभर आपल्याला हे संगीत ऐकायला मिळतं. तसेच डान्स सुरू केल्यानंतरची जवळपास चाळीस मिनिटं ह्या तरुणाने हातांच्या हलचालीतून सादर केलेल्या स्टेप्स भाव खाऊन जातात. पण पॉपिंग मध्ये हातांसोबतच पायांच्या अफलातून स्टेप्स करणं ही अपेक्षित असतं. हा तरुण त्या पातळीवरही आपल्याला आनंद देऊन जातो. किंबहुना पुढचा संपूर्ण व्हिडियो भर त्याने केलेल्या डान्स स्टेप्स चा भर हा पदलालित्यावर असतो. तसेच मध्ये मध्ये केलेल्या काही स्टेप्स तर विशेष लक्षात राहतात. असा हा तरुण आपल्या सगळ्यांचं मन जिंकून घेण्यात यशस्वी होतो.

आपल्या एवढ्या पसंतीस उतरलेला हा मुलगा आहे तरी कोण म्हणून आपण बारकाईने सर्च करतो. तेव्हा लक्षात येतं हा तर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेला एक डान्सर आहे. त्याचं नाव ,पॉपिंन जॉन एस.बी.के. असं आहे. त्याच्या नावाला साजेसा असाच पॉपिंग डान्स करताना आपण त्याला पाहिलं आहे. लॉस एंजेलीस मध्ये वास्तव्यास असणारा हा पॉपिंन जॉन तसा जगभर फिरतो आणि परफॉर्मन्स देत असतो.

मध्यंतरी तो आपल्या लाडक्या भारतात आला होता. त्यातही मुंबईत तो आला होता. या ठिकाणी त्याने काही डान्स सादर केलेले आहेत. त्यातील वर उल्लेख केलेला व्हिडियो हा याच प्रसंगी चित्रित केलेला होता. या व्हिडियोत आपल्याला आजूबाजूने जाणारे आणि त्याच्याकडे कुतूहलाने पाहणारे अनेक जण दितात. आपल्यालाही त्यांचं कौतुक वाटत असतं. आपल्यापैकी अनेकांना पॉपिंग डान्स प्रकारातील बऱ्याच तांत्रिक बाबी कळत असतील किंवा नसतील. पण हा डान्स उत्तमच झाला हे सांगायला काही त्या बाबी माहिती असण्याची गरज नसते. त्यामुळे एक बाब लक्षात आली ती म्हणजे काम उत्तम असेल तर देश, भाषा वगैरे गोष्टींच्या पलीकडे जात यश मिळवता येतं. पॉपिंन जॉन याचं उत्तम उदाहरण आहे.

आपल्या टीमला तर हा आणि त्याचे इतर डान्स अतिशय आवडले. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्यालाही आवडला असेल. तसेच आपल्या टीमने या व्हिडियोवर लिहिलेला लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळवा. तसेच आपण आपल्या टीमने लिहिलेले लेख इतक्या मोठ्या प्रमाणात शेअर करता त्या बद्दल धन्यवाद. यामुळे आमच्या टीमला नवनवीन विषयांवर लिखाण करण्याचा उत्साह वाढतो. तेव्हा आपला हा शेअर आणि कमेंट्स रुपी पाठींबा यापुढेही हा पाठिंबा आपल्या टीमला मिळत राहील हे नक्की. आपला आमच्या टीमवर सतत लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *