Breaking News
Home / जरा हटके / ह्या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे धाडस केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल, बघा व्हिडीओ

ह्या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे धाडस केले ते पाहून तुम्हीदेखील सलाम कराल, बघा व्हिडीओ

बहादूरी ही सांगायची नसते तर ती केव्हाही कृतीत उतरवून दाखवायची असते. असेच एक जगापुढे उदाहरण ठेवणाऱ्या या मुलाला सर्वात आधी सलाम. खरोखर सरकारनं शौर्य पदकानं त्याचा सन्मान करावा, इतकी मोठी कामगिरी या मुलानं करुन दाखवलीयं. हा व्हीडीओ प्रचंड वेगाने देशभरात व्हायरल झाला. अवघ्या काही सेकंदात मृ’त्यूच्या दाढेतून दोन माणसांना ओढणाऱ्या या तरुणाचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहेत. नेमकं काय घडलंयं. त्याचं एवढं कौतूक का ते एकदा पहाच. पुण्यातील एक वृद्ध दाम्पत्य नेहमीप्रमाणे दुचाकीवरुन सैर सपाटा करण्यासाठी निघालं होतं. त्यांच्या या सगळ्यात दिवस तसा नॉर्मलच होता. पण आजोबा गाडी चालवत होते, आज्जी मागून गप्पा हाकत होती. नेहमी प्रमाणे त्यांचं सगळं काही सुरळीत चाललं होतं. पण आजोबांच्या अचानक लक्षात आलं की ब्रेक फेल गेलेयंत. पण त्यांना काय करावं सुचेना झालं होतं. त्यामुळं त्यांनी सर्वात आधी वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही उपयोग होईना बरं म्हतारीला सांगितलं तर तिला आणखी टेन्शन यायचं. म्हणून तिला काही कळायच्या आधीच त्यांनी रस्त्यावरच्या माणसांना ओरडून “गाडी ओढा… गाडी ओढा” सांगू लागले.

काही लोकांना कळेच ना की आजोबा नेमकं काय म्हणतायतं. पण म्हणतात ना देव कुठून न कुठून कोण्या न कोण्या रुपात हजर राहत असतोयं. तसंचं या आजोबांसाठी पांडूरंग धावून आला. रस्त्यावरच्या एका मुलाला आजोबांची कसरत समजून चुकली. त्यानं क्षणाचाही विलंबही न करता त्याने भरधाव वेगाने धावत असेली गाडी मागून जोरात ओढली. गाडी ओढत असताना वेग इतका प्रचंड होता की हा तरुणही त्यांच्या मागे फरफटत गेला. जरासाही नियोजन चुकल्याचा फटका बसला असता तर दोन ऐवजी तीन जीव धो’क्यात गेले असते. वेळ नव्हती, विचार करायलाही क्षणभर उसंत नव्हती. त्या सगळ्यात त्यानं ठरवलं या दोघांना वाचवायला उडी मारायची आणि यात पडायचं म्हटलं आणि तो निघाला. हे आपण ऐकायला वाचायला वेळ लावतोय. पण व्हीडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल. एका सेकंदाचा काय अर्ध्या सेकंदाचाही वेळ त्यांना नव्हता. पण त्या सगळ्यात मुलांना आज्जी आजोबांना वाचवून दाखवलं पुढे होणारा अनर्थ टाळून दाखवला. अन्यथा पुढे ही गाडी महामार्गावर भरधाव वेगानं जाणारं होती. ब्रेक फेल झाल्यामुळे या आज्जी आजोबांची बाईक भरधाव वेगानं कुठेतरी आदळणार होती.

या वयात आज्जी आजोबांना असल्या भलत्याच अपघा’ताला सामोरं जावं लागलं असतं. त्यांना जीव वाचला तरी ज’खमी अवस्थेतील विव्हळणं नशिबी आलं असतं. त्या सगळ्यात मुलांनं त्यांना वाचवलं. आणि मोठा अनर्थ टळला. काही वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार ही घटना पुण्यातील इंदापूर जंक्शन इथली असावी. या प्रकाराचे सीसीटीव्ही फूटेज देशभर व्हायरल झाले. पण त्यापेक्षाही आनंद आहे की आज्जाी आजोबा सुखरुप बचावले. अगदी देवासारखा धावून आल्याने त्या मुलाचंही कौतूक सगळीकडं केलं जातंयं. जगात देव नाही म्हणणाऱ्यांना अशा घटना एक चपराक असते. अर्थात हा मुद्दा आस्तिक नास्तिकतेचा आहे. पण आता या माणसातल्या देवालाही नाकारणाऱ्यांशी कुठे वाद घालत बसणार. देव धावून येणं म्हणजे काय दुसरं तिसरं काही नसतंंयं. अशा अडचणींच्या प्रसंगात आपल्या मुलांना वाचवण्यासाठी तो कुठेही अवतार घेतो. कुणाच्या रुपानंही वाचवतो. जेव्हा असं एखादं रुप देवाचं दिसतं त्यावेळी माणसातल्या देवाची अनुभूती येते. चराचराचा निर्माता हा याच चराचरात वसलेला आहे. तो कुठेही वैकुंठात विसावलेला जरी असला तरीही त्याचं लक्ष आपल्या मुलांकडं नेहमीच असतं.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *