सोशल मीडियाचा आपल्या भारतात उदय होऊन आता बराच काळ लोटला आहे. या काळात या नव माध्यमाने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे, बरचसं मनोरंजन केलं आहे. यातूनच आजच्या घडीला आपण ज्यांना सेलिब्रिटी म्हणू किंवा इन्फ्लुएन्सर म्हणू अशा लोकप्रिय व्यक्ती ही पुढे येताहेत. यापुढे तर त्यांचा ओघ अजूनच वाढेल यात शंका नाही. बरं या येत्या उदयोन्मुख कलाकारांची, सेलिब्रिटीजची यादी काढायची म्हंटली तरी बरीच मोठी होईल. पण यातील काही नावं मात्र सातत्याने आपल्या समोर येताना दिसत असतात.
त्यातीलच एक नाव म्हणजे अंकित जांगीड होय. अवघ्या विशी पंचविशी चा हा तरुण. आपलं युट्युब चॅनेल सुरू करतो काय आणि म्हणता म्हणता प्रसिद्धीची एकेक शिखरं पार करत चाललाय काय. अद्भुत म्हणावी अशीच वाटचाल. पण ही वाटचाल वाटते तेवढी सोप्पी नाही. त्यापाठी आहे या तरुणाची मेहनत आणि डान्सप्रति असलेली त्याची प्रचंड आवड. याच दोन गोष्टी आपल्या सारख्या सामान्य प्रेक्षकांना आवडून जातात. तसेच त्याची यापाठी मेहनत असली तरी डान्स करताना तो इतक्या सहजपणे करन जातो की काय विचारु नका. पण त्याचा हाच सहजपणा त्याच्या चाहत्यांना आवडून जातो. ज्यात आमची टीम आणि आपल्या वाचकांमधील काही जण असतीलच. कारण त्याशिवाय का त्याचे जवळपास प्रत्येक डान्स परफॉर्मन्स हे लाखो व्ह्यूज मिळवतात.
तसेच तो असा काही नाचतो की इतरांनाही नाचायला भाग पाडतो. आता त्याच्या नवीनच आलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या. त्याआधी एक गोष्ट नमूद करायला हवी. हा व्हिडियो त्याने त्याच्या मैत्रिणीं/ बहिणींसोबत शूट केला आहे. त्यासोबतच या गाण्याच्या मूळ म्युझिक व्हिडियोतही आपल्याला अंकित याची भूमिका असलेली दिसून येते. मूळ गाणं हे अंजली राघव यांनी गायलं आहे. ‘मैं नयी नवेली आयी’ हे ते मूळ गाणं होय. त्या गाण्याला ही मस्त असा प्रतिसाद मिळाला आहेच. सोबतच अंकित यांच्या व्हिडियोला ही प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जवळपास सवा तीन लाखाहून अधिक व्ह्यूज या व्हिडियोने मिळवले आहेत. केवळ ९-१० दिवसांत ही कामगिरी उल्लेखनीय म्हणयाल हवी. अर्थात पून्हा एकदा श्रेय जातं ते अंकित याच्या डान्स परफॉर्मन्सला. कारण तो जेव्हा नाचतो तेव्हा बेभान होऊन नाचतो. बरं बेभान आणि बेशिस्त यात पुसटसा का होईना पण फरक असतो. हा फरक अंकित कधीही ओलांडताना आजपर्यंत दिसला नाहीये. त्यामुळे त्याचा डान्स बेशिस्त न वाचता बेभान पण मनोरंजक वाटतो. तसंच त्याच्या डान्स स्टेप्स म्हणजे एकापेक्षा एक जबरदस्त असतात. त्यात त्याचे ठुमके म्हणजे लाजवाब.
हे ठुमके बघून भल्या भल्यांना नाचल्याशिवाय राहवत नाही हे आपण त्याच्या आधीच्या व्हिडियोत ही पाहिलं आहेच. हा व्हिडियो ही त्यास अपवाद नाही. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही आम्ही काय म्हणतो आहोत ते कळेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. आपल्याला आवडून जाईलच. सोबतच सांगायची गोष्ट म्हणजे एका पिझ्झा पार्लर मध्ये अंकित आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या जणी मस्त डान्स परफॉर्मन्स करतात. त्यामुळे इतक्या कमी जागेतही डान्स करण्याचा त्यांचा उत्साह आणि ऊर्जा याला सलाम करावासा वाटतो. या व्हिडियो प्रमाणेच येत्या काळातही आपल्याला अंकित यांचे नवनवीन डान्स परफॉर्मन्स असलेले व्हिडियो बघायला मिळतीलच यात शंका नाही. असो. अंकित यांचा वाढदिवस नुकताच अठरा डिसेंबर रोजी होऊन गेला. या लेखाच्या निमित्ताने अंकित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष अंकित यांना सुखाचा, आनंदाचा, यशाचा आणि समृद्धीचा जावो ही सदिच्छा. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :