Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणींनी केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तर तुम्हीही कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या तरुणींनी केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तर तुम्हीही कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम विषयांच्या शोधात असते. अनेक वेळेस हे विषय सोशल मीडियावरील व्हिडियोजच्या मार्फत मिळत असतात. त्यामुळे आपली टीम असंख्य व्हिडियोज बघते. यातून जे उत्तम असतील, (मग ते वायरल असोत वा नसोत) त्याविषयी मग लेख लिहिले जातात. आपणही यास उत्तम प्रतिसाद देत असता आणि त्यातून आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. आजही आपली टीम आपल्या भेटीस असाच एक लेख घेऊन आली आहे जो एका सुंदर व्हिडियो वर आधारित आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. हा एक उत्तम असा डान्स व्हिडियो आहे. त्यातील डान्स इतका छान आहे की आजतागायत केवळ पाच महिन्यात या व्हिडियोला जवळपास सव्वा लाख लोकांनी पाहिलं आहे. यावरून या व्हिडियोची वाढती लोकप्रियता लक्षात यावी. हा व्हिडियो Dance In Motion India या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेला आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका प्रसिद्ध गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी ऐकायला येतात.

‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटातील ‘नवराई माझी लाडाची गं’ हे ते सुप्रसिद्ध गाणं आपण ऐकत असतो. तसेच सुरवातीलाच या व्हिडियोत समावेश असणाऱ्या तीनही मुलींची नावं आपल्याला समोर दिसतात. त्यामुळे पूजा, निशात आणि राजश्री या तीन नृत्यांगना आपली कला सादर करतील याचा अंदाज आलेला असतोच. पहिली १८ सेकंद झाली की आपल्याला हळूहळू या तिन्ही मुली आपल्या समोर दिसायला लागतात. अगदी नेटकेपणाने नेसलेली नऊवारी, सोबत साजेसे असे दागिने आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रसन्न चेहरे यांमुळे या तिघीही सुंदर दिसत असतात. पुढे त्यांचा डान्स सूरु होतो. सुरुवातीला मराठीत काही ओळी असतात. त्यांच्यावर अगदी छान छान स्टेप्स करत या तिघीही डान्स करत असतात. त्यांचे हावभाव, देहबोली यांमुळे या स्टेप्सची नजाकत अजून वाढते. तसेच डान्स करत असताना जेव्हा हिंदीतील ओळी येतात तेव्हा मग शब्दांच्या अनुसार स्टेप्स होताना दिसतात. त्यातही तिघींच्या उभ्या राहण्याच्या जागा व्यवस्थित ठरवल्याने एकत्र डान्स करत असल्या तरी प्रत्येकीचं वेगळेपण अधोरेखित करण्यात यशस्वी होतात. प्रत्येक लोकप्रिय डान्समध्ये ही एक गोष्ट असतेच. हा व्हिडियो सुदधा याचं उत्तम उदाहरण आहे.

तसेच गाणं पुढे सकरतं आणि आपल्याला पुन्हा मराठी ओळी ऐकायला येऊ लागतात. मग पुन्हा मगासच्या धमाकेदार डान्स स्टेप्स बघायला मिळतात आणि हा डान्स संपतो. हा संपूर्ण डान्स व्हिडियो बघून झाल्यावर आपण एक उत्तम डान्स पाहिल्याची भावना आपल्या मनात असते आणि त्याच भावनेला अनुसरून आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो. खासकरून ज्यांना डान्सची आवड आहे ते तर हा व्हिडियो नक्कीच बघतील. आपणही जर का हा व्हिडियो अजून पर्यंत पाहिला नसेल तर नक्की पहा. एका उत्तम डान्स परफॉर्मन्सचा आनंद लुटा.

सोबतच आपल्याला हा लेख कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कारण आपली टीम आपल्या वाचकांना विविध विषयांवर लेख वाचायला मिळावेत म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते. आपली पाठीवरची एक थापही आम्हाला खूप प्रोत्साहन देऊन जाते. ही पाठीवरची थाप मिळते ती आपल्या सकारात्मक आणि प्रोत्साहनपर कमेंट्स मधून. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आमच्या टीमच्या पाठीशी जसं आज आहे तसेच यापुढेही राहू द्या. लवकरच नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आतापर्यंतचे लेख वाचा, शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.