Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणींनी लग्नात साडीमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल

ह्या तरुणींनी लग्नात साडीमध्ये केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्ही सुद्धा कौतुक कराल

लग्न म्हंटलं म्हणजे त्यातही अनेक विधी आणि समारंभ आले. हल्ली त्यात संगीत या एका नवीन समारंभाची भर पडली आहे असं दिसून येतं. आधी केवळ बॉलिवूड आणि उंची लग्नात दिसणारा हा प्रकार आता बाकीच्यांमध्येही लोकप्रिय होताना दिसतो आहे. यानिमित्ताने आपली मित्र मंडळी मस्त मस्त असे डान्स सादर करत असतात. यात आपले नातेवाईकही अगदी आनंदाने सहभागी होत असतात. अशाच एका संगीत समारंभाचा व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. या व्हिडियोचं वैशिष्ट्य असं की यात तीन तीन मराठी गाण्यांवर डान्स होताना बघावयास मिळतो. मग काय, आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल असं जाणून आजचा हा लेख लिहीत आहोत.

हा व्हिडियो आहे सौरभ आणि भावना या नवपरिणीत जोडप्याच्या संगीत समारंभातील परफॉर्मन्सचा. हा परफॉर्मन्स दिला आहे तीन मुलींनी. या तिघीही डान्सच्या चाहत्या दिसून येतात. कारण तिघीही तेवढ्याच आवडीने डान्स करताना दिसून येतात. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा या तिघी पाठमोऱ्या उभ्या असतात.

मग जसं पहिलं गाणं सुरू होतं, तस तश्या या मुलींच्या स्टेप्स आपल्याला बघायला मिळतात. हे पहिलं गाणं असतं, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ चित्रपटातलं ‘करा हो लगीनघाई’. आधीच गाजलेलं हे गाणं आपल्या मनात या तीन मुलींच्या डान्सने अजून छान फुलतं. यात त्या तिघींनी केलेल्या हाताच्या स्टेप्स खास भाव खाऊन जातात. त्यामुळे केवळ इथून तिथे जात डान्स होत नाही, तर त्या जोडीला हस्तमुद्रा असतात ज्यांच्यामुळे रंगत भरते. मग दुसरं गाणं सुरू होतं. उर्मिला धनगर यांच्या आवाजाने नटलेलं ‘गुलाबाची कळी’ हे ते गाणं होय. खणखणीत पण तेवढाच प्रेमळ आवाज लाभलेलं हे गाणं ही या तिघी छान पद्धतीने परफॉर्म करतात. तिसरं गाणंही त्याच पद्धतीने सादर केलं जातं. आदर्श शिंदे यांच्या आवाजाने नटलेलं हे तिसरं गाणं म्हणजे ‘आली ठुमकत नार’. या आणि आधीच्या गाण्यातही या मुली छान छान स्टेप्स करताना दिसून येतात. मग कधी एकत्र येत स्टेप्स करणं असो वा वेगवेगळ्या होत डान्स करणं.

तसेच अजून एक कौतुकाची बाब म्हणजे त्यांच्यात असलेली सुसूत्रता. त्यांनी अतिशय मेहनतीने हा डान्स बसवला असणार आणि त्याच्या तालमी केल्या असणार हे कळून येतं. एकंदरच हा परफॉर्मन्स छान होता, हे नक्की. आपल्या वाचकांना हा व्हिडीयो बघितला असल्यास आवडला असेल. सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या आवडला असेल अशी अपेक्षा आहे.

आपल्या वाचकांना काय काय वाचायला आवडेल हे लक्षात घेऊन आपली टीम लिखाण करत असते. त्यानिमित्ताने अनेक विविध विषय हाताळता येतात. तसेच आपण जेव्हा जेव्हा आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता तेव्हा मन भरून पावतं. आपण करत असलेल्या मेहनतीचं कौतुक वाचकांना आहे, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. येत्या काळातही आपल्या टीमला आपला पाठिंबा मिळत राहीलच. आपला आपल्या टीमच्या प्रति असणारा लोभ आणि जिव्हाळा कायम राहू दे. आपल्या प्रेमळ पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.