लवकरच कॉलेजसे सुरू होतील आणि बऱ्याच काळानंतर तरुणाई खऱ्या अर्थाने कॉलेजवासी होतील. कारण गेल्या वर्षा दीड वर्षात ही तरुणाई केवळ ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होती. पण कॉलेजमध्ये जाऊन तो माहोल अनुभवणं हे काही वेगळंच असतं. त्यातही फ्रेशर्स पार्टी आणि फेअरवेल पार्टी म्हणजे हक्काचे दिवस. ज्या कॉलेजमध्ये तब्बल तीन ते पाच वर्षे घालवली ते कॉलेज सोडून जाताना मन हळवं होतच. पण सोबतच नवीन आयुष्याच्या सुरुवातीची नांदी असल्याने उत्सुकता ही असते. एकंदरच संमिश्र भावना असतात. याच भावनांना डान्स आणि गाण्याच्या मार्फत वाट करून देण्याचं अप्रत्यक्ष काम फेअरवेल पार्टी करत असते. कारण आपल्या सिनियर्स ना फेअरवेल देताना ज्युनिअर्स अगदी मस्त तयारी करतात तर आता हे क्षण पुन्हा अनुभवायला मिळणार नाहीत म्हणून सिनीयर्स ही धमाल करत असतात. हीच धमाल कॅमेऱ्यात कैद होते आणि हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात सहज वायरल होते. आता आपल्या टीमने आज पाहिलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना.
हा व्हिडियो आहे एका मुलीने केलेल्या मस्त डान्सचा. या मुलीने डान्स केला तेव्हा त्यांच्या कॉलेजचा फेअरवेल चा दिवस होता. नशीब अस की हा फेअरवेल २०१९ साली होता. २०२० साली असता तर फेअरवेलचा सगळा आनंद ओम फट् स्वाहा झाला असता. तसा तो बऱ्याच जणांच्या बाबतीत झालाच आहे. पण निदान हा व्हिडियो बघून आपल्याला त्या आनंदाची थोडी भरपाई करता येईल. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा ही मुलगी आपल्या समोर येते.
एव्हाना आपल्या कानावर गाण्याचं म्युझिक पडायला।लागलेलं असतं आणि ‘पा नी सा’ हे स्वर सुद्धा पडायला लागलेले असतात. गाणं तर आपण ओळखलेलं असतंच. ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ हे ते गाणं असतं. पण या गाण्याचं नवीन व्हर्जन आपल्याला ऐकायला मिळतं. या नवीन व्हर्जन वर मुस्तफा आणि किआरा अडवाणी यांचा डान्स गाजला होता. तर मूळ गाण्यावरही अक्षय कुमारजी आणि रविना टंडनजी यांचा डान्स गाजला होता. तसेच एक मजेशीर बाब म्हणजे दोन्ही गाण्यात उदित नारायणजींनी मेल प्लेबॅक केलेलं आहे. तर मूळ गाण्यात कविता कृष्णमूर्ती आणि नवीन व्हर्जन मध्ये नेहा कक्कर यांनी फिमेल प्ले बॅक गायलं आहे. तर अशा या मनोरंजक गाण्यावर ही मुलगी डान्स करते. अर्थात ती केवळ एखाद्या कडव्यावर डान्स करते त्यामुळे व्हिडियो ही कमी वेळेचा होतो. पण तिच्या डान्समुळे आपण मात्र आपल्या आठवणींमध्ये रमतो. तसेच तिचं ही मस्त डान्स करण्यासाठी कौतुक आहेच. तिची एन्ट्री झाल्यापासूनच सगळे जण तिला प्रोत्साहन देत असतात. सुरुवातीला पाठमोरी उभी राहत आणि मग पाठीमागे जात ती काही साध्या स्टेप्स करते. कारण तोपर्यंत फक्त ‘पा नी सा’ हेच चालू असतं. मग जसजसं म्युझिक वाजायला लागतं, तस तशी ती खुलून डान्स करू लागते.
मग जस जसं गाणं पुढे सरकतं त्याप्रमाणे तिचा डान्स बहरत जातो. थोडा वेस्टर्न प्रभाव असलेल्या डान्स स्टेप्स ही दिसून येतात. पण ‘तेरा जिसे पड गया पाला, अच्छे को गलत कर डाला’ वर केलेली स्टेप गोड वाटते. सोबतच ‘तू चीज बडी हैं मस्त मस्त’ यावर केलेल्या स्टेप्स ही आवडून जातात. यात तेथे उपस्थित असलेली मंडळी तर टाळ्या शिट्या वाजवून तिला प्रोत्साहन देत असतात. अर्थात अस असलं तरी तिचा हा परफॉर्मन्स अगदी सवा मिनिटाच्या आसपास चालतो. त्यामुळे आपण एकदम आनंदात येऊन व्हिडियो बघत असतो पण तेवढ्यात तो संपतो. असो. पण त्यामुळे गत आठवणींना उजाळा मात्र नक्की मिळतो.
त्याचमुळे आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडलाच. पण आपल्या वाचकांना याविषयी वाचायला खूप आवडेल अस मनापासून वाटलं आणि हा लेख लिहिला गेला आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता आणि यापुढेही देत राहालाच. आम्हीही आपल्यासाठी नेहमीच उत्तमोत्तम असे लेख आणत राहू याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले पण आपल्या वाचनात न आलेले लेख नक्की वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :