Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणीने परदेशात केला अस्सल मराठमोळा डान्स, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

ह्या तरुणीने परदेशात केला अस्सल मराठमोळा डान्स, बघा हा अप्रतिम परफॉर्मन्स

भारतीय आणि त्यातही मराठी माणूस जगात कोठेही जाऊ दे, स्वतःची संस्कृती तो जपत असतो आणि वाढवत असतो. अनेक संणाच्या निमित्ताने जेव्हा परदेशी स्थित मराठी जनांशी बातचीत होते तेव्हा हे कळून येतंच. त्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका अदा केली जाते ती त्या त्या देशातील महाराष्ट्र मंडळांकडून. कारण परदेशात असताना स्वतःचं स्वत्व जपण्यास या संस्था खूप मोलाचं काम करत असतात. या संस्थांकडून अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यांचा आस्वाद आपण अनेक व्हिडियोज मधून घेत असतोच.

आज आपल्या टीमने असाच एक वायरल व्हिडियो बघितला जो स्टॉकहोम, स्वीडन येथील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा आहे. या कार्यक्रमाचं नाव नमस्ते स्टॉकहोम असं आहे. तेथिल एका मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन २०१५ साली केलं होतं. थोडी माहिती घेतली असता जवळपास दरवर्षी हा असा कार्यक्रम होतो असं लक्षात येतं. सोबतच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमात मराठी संगीत, नृत्य यांचा अंतर्भाव असलेले परफॉर्मन्स हे असतातच असतात.

यातीलच एक डान्स परफॉर्मन्स आपल्या टीमने व्हिडियाद्वारे पाहिला. हा डान्स परफॉर्मन्स ‘वाजले की बारा’ या सुपरहिट गाण्यावर आधारलेला होता. याप्रसंगी खूप मराठीजन आणि भारतीय तसेच स्थानिक मंडळी जमली होती. व्हिडियो सुरू होताच याचा प्रत्यय येतो. आपल्या समोर एका भल्या मोठ्या मंचावर एक ताई नऊवारी साडीत उभ्या असतात. समोर अफाट जनसमुदाय असतो. गाणं सुरू होतं आणि या ताईचं नृत्य सुरू होतं. लावणी नृत्य असल्याने नेहमीप्रमाणे पदर घेत डान्सची सुरुवात होते. तसेच लावणी आणि आवडतं गाणं असल्याने उपस्थित ही अगदी सुरुवातीपासूनच या परफॉर्मन्सचा आनंद लुटत असतात. लावणी सादर करणाऱ्या ताईंचा उत्साह सुद्धा अफाट असल्याने पूर्ण व्हिडियोभर आपल्याला प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण कायम असल्याचं दिसून येतं. अफाट उत्साहा सोबतच उत्तम डान्स स्टेप्स मुळे त्यांचा परफॉर्मन्स क्षणोक्षणी बहरत जातो. लावणी सादर करताना जशी चपळता महत्वाची असते तसाच ठेहाराव सुदधा महत्वाचा असतो. अन्यथा सगळ्या स्टेप्स घाई घाईत केल्या सारख्या वाटू शकतात. पण सुदैवाने इथे लावणी सादर करणाऱ्या ताई या दोघांचा उत्तम समतोल साधण्यात यशस्वी होतात.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाण्यात एका वेळ अशी येते की केवळ संगीतच आपल्या कानावर पडत असतं ती वेळ. त्यात शब्द अंतर्भूत नसल्याने या दोहोंचा ताळमेळ असणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्यात अगदी सहजपणे या ताई उत्तम नृत्य जमवून आणतात. तसेच शेवटी शेवटी तर गाणं अतिशय जास्त वेग पकडत. पण आधीच चार साडेचार मिनिटं डान्स केल्यावर पुन्हा ऊर्जेने डान्स करणं म्हणजे परीक्षाच. पण या ताई अगदी लीलया ही ऊर्जा डान्समध्ये ओततात. तसेच यावेळी मूळ डान्स (चित्रपटातील) मधील काही स्टेप्स ही बघायला मिळतात. ‘अहो अस काय करता, मागे मागे फिरता’ ओळींवर या स्टेप्स ची मजा लुटता येते. तसेच पूर्ण परफॉर्मन्स मध्ये शब्दांचा आधार घेत केलेल्या डान्स स्टेप्स ही असतातच. त्यामुळे एकंदरच हा परफॉर्मन्स खूप आवडून जातो आणि ऊर्जा देऊन जातो. आपल्या प्रमाणेच त्यावेळी तिथे उपस्थित असलेले सगळेच जण या डान्सचं मनापासून कौतुक करताना दिसून येतात.

आपणही हा व्हिडियो पाहिल्या असल्यास आपल्याला ही आवडला असेलच. जर नसेल पाहिला, तर आवर्जून पहा आणि त्याचा आनंद घ्या. तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असणार आहे हे नक्की. आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लिखाण करत असते आणि करत राहील. आपणही आम्हाला सदैव प्रोत्साहन देत असता. हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही सदिच्छा. आमची टीमही आपल्यासाठी नेहमीच उत्तमोत्तम लेखन करत राहील याची खात्री बाळगा. लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले पण आपल्या वाचनात न आलेले लेख जरुर वाचा. सगळे लेख आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत रहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.