Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणीने पुष्पा चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, स्टेप्स एकदा बघाच

ह्या तरुणीने पुष्पा चित्रपटातील ‘सामी सामी’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, स्टेप्स एकदा बघाच

हल्लीच्या काळात एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंडिंग विषयांत असणं हे प्रसिद्ध मिळण्याचं एक मापक आहे. त्यामुळे मिळालेले ते स्थान टिकवून ठेवणे हे ही तेवढेच महत्त्वाचे असते आणि बऱ्याच अंशी कठीण ही असते. मात्र सध्या हेच काम दाक्षिणात्य सिनेमे अगदी लीलया करताना दिसताहेत. अर्थात लीलया म्हणत असलो तरी त्यापाठी जबरदस्त मेहनत आहे हे नमूद करावयास हवे. या सिनेमांतील अगदी नजीकचा सिनेमा म्हणजे पुष्पा !

अल्लू अर्जुन या आपल्या लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा ! दाक्षिणात्य सिनेमांमध्ये कार्यरत असला तरी आपल्या सगळ्यांना अल्लू अर्जुन यांचे सिनेमे, त्यांची स्टाईल, जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी आवडतेच. तसेच मध्यंतरी पुष्पा सिनेमाच्या प्रमोशनवेळी ते मुंबई आले असताना आवर्जून मराठीत बोलले. तेव्हापासून तर त्यांचा मराठी चाहतावर्ग अजून वाढला असणार हे नक्की. असो. तर यांचा हा पुष्पा आला आणि बघता बघता लोकप्रियतेचं शिखर गाठून गेला आहे. जिथे बघावं तिथे पुष्पा सिनेमाची चर्चा आहे. इतकी की अनेकांनी पुष्पाचे मराठी व्हर्जन बघितले असतीलच. एवढंच नव्हे तर त्यातील गाणीही लोकप्रिय झाली आहेत. त्यावर सिनेमात केले गेलेले डान्स ही जबरदस्त गाजताहेत. बरं या सिनेमाने ही लोकप्रियता पूर्ण भारतभर ही संपादन केली आहे.

याचाच प्रत्यय आपल्या टीमला ही आला. आपली टीम जसे वायरल व्हिडियोज बघत असते तसेच उदयोन्मुख कलाकारांच्या धमाकेदार व्हिडियोज कडे ही आमचं लक्ष असतं. तर काही वेळा युट्युब अल्गोरिदम खुश होतं की काय कळत नाही, पण अनपेक्षित पण उत्तम असे व्हिडियोज बघायला मिळतात. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो हा असाच आहे. तो अचानक समोर आला आणि आवडून गेला. हा व्हिडियो आहे दीक्षा करमाकर हिचा ! दीक्षा ही नृत्यांगना असून विविध नृत्य प्रकारांत तिला रस असल्याचं दिसून येतं. तिच्या अगदी अलीकडच्या व्हिडियो मध्ये तिने पुष्पा सिनेमातील ‘सामी सामी’ या गाण्यावर डान्स केला आहे. हे गाणं हिंदीत ही उपलब्ध आहे. याच व्हर्जन वर आपल्याला दीक्षा डान्स करताना दिसते. तिने व्हिडियो अगदी कमी वेळेचा ठेवला आहे. पण त्यातही ती स्वतःची छाप पाडून जाण्यात यशस्वी होते. या यशाचं कारण म्हणजे तिने समजून उमजून केलेला डान्स होय. हे गाणं मस्त रिदम आणि बिट्स यांचं अनोखं मिश्रण आहे. त्यामुळे घाई घाई न करता पण बिट्स पकडत नाचणं महत्वाचं ठरतं. नेमकी हीच बाब हेरून, गाण्याच्या वेगाशी जुळवून घेत दीक्षा डान्स करत राहते. त्यात बिट्स पकडत राहते.

या सगळ्यांच्या जोडीला चेहऱ्यावर खेळकर भाव असतातच. त्यामुळे तिच्या या डान्स मध्ये अजून रंगत भरत जाते हे नक्की. तसेच तिला डान्सची आवड असल्याने पूर्ण डान्सभर दीक्षा हसतमुखाने परफॉर्मन्स देत राहते आणि त्यामुळे बघणाऱ्याला ही प्रसन्न वाटतं. ही प्रसन्नता आता लोकप्रियतेत ही बदलताना दिसत आहे. कारण आमच्या टीमने हा व्हिडियो दोनदा बघितला. दुसऱ्या वेळी दीक्षा यांच्या युट्यूब चॅनेल्सच्या सबस्क्रायबर्स मध्ये आणि व्ह्यूजमध्ये ही वाढ झालेली दिसून येते. आपणही कदाचित हा व्हिडियो पाहिला असण्याची शक्यता आहे. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. यातील डान्स आपल्याला आनंद देऊन जाईल हे नक्की.

आपल्या टीमला तर हा व्हिडियो जबरदस्त आवडला. तेव्हाच ठरलं की याविषयी लिहायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *