Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणीने रस्त्यावर भर गर्दीत केला अप्रतिम डान्स, उत्साह पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या तरुणीने रस्त्यावर भर गर्दीत केला अप्रतिम डान्स, उत्साह पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ढोलकीवरची थाप, ढोलांचा गगनभेदी आवाज यांच्यात एक साम्य आहे. एकदा का हे आवाज कानावर पडले आणि अंगात उत्साह संचारला म्हणून समजा ! आबालवृद्ध सगळ्यांनाच या वाद्यांनी उत्साहाचं भरतं येतं. बेंजो, हलगी आणि इतर ही अनेक वाद्यांची हीच कथा असते. त्यामुळे ही वाद्य नुसती वाजत असली आणि एखादं गाणं वाजत जरी नसलं तरी आपल्याला आनंद देऊन जातात. अंगात संचारतच म्हणा ! अनेकवेळा रस्त्यातून एखादी मिरवणूक जात असताना एकदम अतरंगी पोरं पोरी आपण डान्स करताना बघतो ती याचमुळे !

अर्थात हे काही आपल्याला नवीन नाही. आपल्यापैकी अनेकांनी या धुंदीचा अनुभव घेतला असेलच. मग तो अनुभव एखाद्या सणानिमित्त असेल, एखाद्या समारंभानिमित्त असेल वा इतर काही कारण असेल. पण हा अनुभव जबरदस्त असतो. बरं तो अनुभव केवळ आपल्यालाच जबरदस्त वाटतो असं नाही, तर आपण जर या तालावर नाचत असू तर बघणाऱ्या व्यक्तींना ही याची मजा घेता येते. याचाच प्रत्यय आपल्या टीमला आला. म्हणजे स्वतःहून नाही, तर एका व्हिडियोच्या माध्यमातून आला.

हा व्हिडियो तामिळनाडू राज्यातील असावा असा अंदाज आहे. या राज्यात कुथु डान्स फारच लोकप्रिय आहे असं कळतं. या डान्सचे असंख्य व्हिडियोज आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. यात प्रामुख्याने आपल्याकडे जसे ढोल, वाजंत्री असतात तसेच तेथेही असतात. आणि मग माणसं त्या तालावर मस्त नाचतात. आपल्या टीमने बघितलेला व्हिडियो ही याच पठडीतील आहे. या व्हिडियोत जबरदस्त डान्स करणारी एक मुलगी भेटते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एका ठिकाणी रस्त्यावर गर्दी दिसून येते. इथे वर उल्लेख केलेली वाजंत्री आलेली असतात. व्हिडियो सुरू झाल्यापासून त्यांचं वादन हळूहळू सुरू होतं. जवळच ही मुलगी उभी असते. जसजसं त्यांचं वादन गती घेतं, ही मुलगी सुद्धा जोशात नाचायला लागते. पहिल्या काही सेकंदातच त्या मुलीचे त्या वाजणाऱ्या संगीताशी सूर जुळलेले असतात. कारण अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ही मुलगी बिट्स पकडत जबरदस्त नाचते. बरं त्यातही डान्सची गती कमी जास्त करणं हे तिच्याकडून आपसूक होतं असतं. तसेच स्टेप्स ही आपोआप कळत असतात. त्यामुळे तिचा हा डान्स बघत असताना जबरदस्त मजा येत असते.

बरं आपणच काय तर उपस्थित मंडळी ही तिच्या या मनमोकळ्या डान्सची मजा घेत असतात. शेवटी शेवटी तर बेली डान्स सारखी तिची स्टेप ती इतक्या नजाकतीने करते की ही स्टेप आवडून जाते. त्याआधीही तिचा उत्साह आपल्याला आवडलेला असतोच. आमच्या टीमला तर हा व्हिडियो बघताच क्षणी प्रचंड आवडला. तेव्हाच ठरलं की यावर लिहायला हवं. पण इतर काही लेख बाकी होते. परिणामी ते आधी केले आणि मग या व्हिडियोवर लिहायला सुरुवात केली. यात गंमत अशी की या व्हिडियो वर बरंच काही लिहावं असं वाटत होतं. पण नंतर जाणवलं की असं झालं तर हा व्हिडियो बघण्याची वाचकांची मजा निघून जाईल. कारण मग अगदीच सगळं कळलं, तर त्यातील नावीन्य निघून जातं ना. असो. म्हणूनच या व्हिडियो विषयी आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. अस असलं तरी आपण हा अफलातून डान्स या लेखाच्या शेवटी शेअर केला आहे तेथून वाचू शकता. पण तत्पूर्वी आपल्याला हा लेख संपवायला हवा.

तेव्हा मंडळी, आम्ही आता थांबतो. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.