समारंभ, मग तो कोणताही का असेना त्यात रंगत यावी लागते. ही रंगत आणण्याच काम प्रत्येक वेळी त्या समारंभातील उत्साही आणि उर्जावान मंडळी करत असतात. मग हे समारंभ अगदी महाविद्यालयात होत असले तर तेथील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांपैकी कोणी तरी ही भूमिका निभावत असतात. हीच बाब अन्य समारंभांना ही लागू होते. त्यातही लग्न समारंभ म्हणजे तसाही आनंद सोहळाच असतो. किंबहुना तो तसाच व्हावा ही सगळ्यांची इच्छा असते. कारण नवरा नवरी आणि त्यांचे कुटुंबीय अशा सगळ्यांसाठी हा सोहळा फार महत्वाचा असतो.
अर्थातच जिथे एखादी महत्वाची गोष्ट घडत असते तिथे आनंद आणि चिंता या दोन्ही वास्तव्यास असतात. लग्न सोहळा अगदी व्यवस्थित पार पडावा म्हणून दोन्ही घरच्या मंडळींना चिंता लागून राहिलेली असते. पण चेहऱ्यावर मात्र सगळं कसं आलबेल आहे हेच भाव ठेवुन वागावं लागतं. अर्थात अस असलं तरी काही जणांना मात्र हे दडपण झुगारून देऊन या सोहळ्याची मजा घेता येणे जमतं. खासकरून लग्नात आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत कार्यक्रमात याची चुणूक बघायला मिळते. कारण नाही म्हंटलं तरी सगळे जण काहीसे सैलावलेले असतात.
पण तरीही पुढे जाऊन डान्स फ्लोअर वर डान्स करू म्हंटलं तर अनेक जण पुढे येत नाहीत. पण अशावेळी ज्यांच्यात कमालीचा उत्साह आणि ऊर्जा आहे अशा लोकांना पुढे केलं की आपसूक सगळे जण डान्स फ्लोअर वर जमा व्हायला लागतात. त्यात या उत्साही जनांना डान्सची मनापासून आवड असेल तर अजूनच बहार येते. कारण त्यांना बघून आपसूक बाकीचे ही डान्सची मजा घ्यायला लागतात. वातावरणात असलेला शांतपणा आता मजा मस्तीचा माहोल घेतो. मग अर्थातच सगळ्यांच्या मनावरचं कामाचं दडपण ही निघून जातं आणि सगळे जण प्रसन्न वातावरणाची अनुभूती करतात. याचं एक उत्तम उदाहरण ठरेल असा एक व्हिडियो आजच आमच्या टीमने बघितला. अर्थातच हा एका लग्नाचा व्हिडियो आहे हे काही वेगळं सांगायला नको. या व्हिडियोत आपल्याला एक उत्साही आणि ऊर्जेने परिपूर्ण अशा ताई भेटतात. त्यांचं नाव कळत नाही. पण व्हिडियो संपला तरी त्यांचा डान्स मात्र अगदी लक्षात राहतो. व्हिडियो सुरू होतो तेव्हा डान्स फ्लोअर वर एकेक जण यायला सुरुवात झालेली असते. यात मैत्रिणींचा आणि सख्यांचा एक ग्रुप ही असतो.
गाणंही सुरू झालेल असतं आणि या सगळ्या जणी डान्स करत असतात. तेवढ्यात वर ज्यांचा उल्लेख केला त्या ताईंचं आगमन होतं. या ताई उत्तम डान्सर आहेत आणि उत्साही आहेत हे या सगळ्यांना माहीत असावं. कारण या सगळ्या जणी त्या ताईंना त्यांच्या डान्स मध्ये सामील करून घेतात. आणि त्या ताईंनी एन्ट्री घेतल्यापासून ते व्हिडियो संपेपर्यंत त्या सगळा डान्स फ्लोअर उत्साहाने भारून टाकतात. त्यातही विशेष कौतुक करावं ते त्यांनी लगावलेल्या ठुमक्यांच करावं लागेल. कारण या ठुमक्यांनीच त्या सगळ्यांना नाचावतात. बरं त्यांचा उत्साह इतका असतो की या सगळ्या व्हिडियोत त्या जवळपास तीन गाण्यांवर नाचताना दिसतात. अर्थात हा जमाना शॉर्ट व्हिडियोचा आहे. त्यामुळे या व्हिडियोत आपल्याला एकेक गाणं पूर्ण ऐकायला मिळतच नाही. उलट त्यातील काही बिट्स वर या ताई जो डान्स करतात ते बघायला मिळतं. अर्थात या कमी वेळेच्या व्हिडियोत ही ताईंचा डान्स भाव खाऊन जातो. तसेच हा भन्नाट डान्स करत असताना त्यांचे हावभाव ही अगदी गंमतीचे असतात. यांमुळे त्यांचा डान्स बघण्याचा आनंद अजून द्विगुणित होतो हे नक्की. आपणही हा डान्स बघितला असेल तर आपल्यालाही उत्तम आणि उत्साही डान्स बघायचा आनंद मिळाला असणार यात शंका नाही. पण आपण जर हा डान्स बघितला नसेल तर जरूर बघा. आपल्या वाचकांसाठी आपली टीम हा व्हिडियो या लेखानंतर शेअर करेलच.
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :