Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणीने ‘वाजले की बारा’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या तरुणीने ‘वाजले की बारा’ गाण्यावर केला अप्रतिम डान्स, स्टेप्स पाहून तुम्हीही कौतुक कराल

मंडळी, कलाकृतींच्या बाबतीत तुम्ही एक बाब अनुभवली असेल. ही बाब म्हणजे काही कलाकृती या कितीही काळापूर्वी घडलेल्या असु देत, त्यांचा आपल्या प्रेक्षक मनावरचा परिणाम हा पुसला जात नाही. त्यांच्यातून मिळणारा आनंद हा कायम टिकून राहतो. म्हणूनच की काय अशा कलाकृती लोकप्रियतेच्या बाबतीत नेहमी अव्वल स्थानी असतात. तसेच त्यांचं सादरीकरण पुन्हा पुन्हा अनुभवणं ही आनंददायक गोष्ट असते.

आज आपल्या टीमने एक डान्स व्हिडियो पाहिला. त्यातून आमच्या टीमने असाच पुनःप्रत्ययाचा आनंद घेता आला. म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना सांगायला हवं. चला तर मग वेळ न दवडता, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो आकांक्षा वर्मा यांचा आहे. आकांक्षा या उत्तम नृत्यांगना असून विविध कार्यक्रमांतून त्यांनी स्वतःचं नृत्यकौशल्य दाखवून दिलेलं आहे. तसेच त्यांचं स्वतःचं युट्युब चॅनेल असून त्यांच्या अनेक नृत्यांचा नजराणा इथे अनुभवता येतो. त्यातील एक म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो होय. खास गोष्ट म्हणजे हा एका मराठी गाण्यावर केलेल्या डान्सचा व्हिडियो आहे. हे गाणं म्हणजे ‘नटरंग’ सिनेमातील ‘वाजले की बारा’ हे गाणं होय.

वर म्हंटलं होतं ना, की काही कलाकृती या नेहमीच आनंद देऊन जातात. हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला आकांक्षा या पाठमोऱ्या उभ्या असलेल्या दिसून येतात. गाणं जस जसे पुढे सरकत जातं, तस तशा त्या ठुमकत ठुमकत आपल्या समोर येतात. एव्हाना केवळ म्युझिक वाजत असतं. लवकरच गाण्यातले शब्द ऐकायला येतात आणि आकांक्षा यांचं नृत्य वेग पकडतं. मूळ गाणं खरंच खूप वेगवान आहे. त्यामुळे आकांक्षा या सुदधा अगदी वेगाने आपल्या स्टेप्स करत असतात. यातून एक गोष्ट दिसून येते. ती म्हणजे त्यांनी हा डान्स कोरिओग्राफ करण्यासाठी बराच वेळ मेहनत घेतली असणार. कारण अचानकपणे एवढ्या वेगवान गाण्यावर एवढं उत्तम नृत्य करणं कठीण असतं. तसेच त्यांना नृत्य करण्याची सवय आहे हे कळून येतं हे काही वेगळं सांगायला नको. त्यांच्या या सवयीमुळे त्या प्रत्येक स्टेप अगदी सहजपणे साकार करून दाखवत असतात. त्यात काही स्टेप्स या मूळ परफॉर्मन्स नुसार असतात. तर काही या त्यांच्या स्वतःच्या असतात असं जाणवतं. त्यातही ‘असं काय करता, मागे मागे फिरता’ या कोरसच्या ओळींवर त्यांनी केलेली स्टेप अप्रतिम वाटून जाते तसेच मूळ गाण्याच्या आठवणी ही जागवून जाते.

सोबतच दोन गोष्टी त्यांच्याविषयी खासकरून आवडतात. एक म्हणजे त्यांचं हे संपूर्ण गाणं पाठ असतं. पूर्ण डान्स सादर होईपर्यंत, त्या हे गाणं म्हणत राहतात. तसेच दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा हसमुख चेहरा. पूर्ण व्हिडियोत त्यांच्या हसऱ्या व्यक्तित्वामुळे एक प्रसन्नता टिकून राहते. तसेच हा डान्स संपत येताना त्यांनी रिंगण पूर्ण करत मग पूर्ण केलेल्या गिरक्या या डान्सचा उत्तम असा शेवट करून जातात. खरं तर हा व्हिडियो तसा छोटा आहे. पण त्यातून ही आकांक्षा यांनी स्वतःच्या नृत्याची उत्तम छाप पाडली आहे. आपणही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही हे पटेल. जर नसेल पाहिला, तर जरूर पहा.

तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला आपण वाचकगण उत्तम प्रतिसाद देत असता आणि देत राहाल. आम्हीही आपल्यासमोर नवनवीन विषयांवरील उत्तम लेख सादर करत राहूच. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत मंडळी, आपल्या टीमने लिहिलेलं अन्य लेखही आवर्जून वाचा. अगदी आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *