कोणत्याही कलेचं सादरीकरण हे आपल्यासाठी आनंददायी असतंच. त्यातही जर नृत्यकलेचं सादरीकरण होत असेल तर आपल्या सगळ्यांनाच त्यात खास रुची असते. कारण हा कला प्रकार आपल्या अगदी जवळचा असतो. त्यामुळेच की काय आपण जेव्हा व्हिडियोज बघत असतो तेव्हा एखादा डान्स व्हिडियो मध्ये आल्यास त्यातील काही क्षण तर बघावेत अस वाटून जातंच. त्याचा परिणाम असा की काही वेळाने आपण बाकी सगळं सोडून डान्स व्हिडियो बघत असतो अस आपल्या लक्षात येतं. या कलेची ताकदच अशी आहे.
पण त्यातही एक मात्र खरं की डान्स करणारी व्यक्ती एकतर त्यात पारंगत हवी किंवा अतरंगी तरी हवी. कारण टाईमपास म्हणून अतरंगी डान्सचे व्हिडियोज बघणं आवडतंच आपल्याला. पण, जर डान्स व्हिडियोजची खरी मजा घ्यायची असेल आणि वेळही सत्कारणी लावायचा असेल तर मात्र एखादया पारंगत डान्सर ने डान्स केलेले डान्स बघणं हे केव्हाही चांगलं. आज हे सगळं सांगायचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. गेल्या दोन वर्षांपूर्वी हा व्हिडियो प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून आजतागायत या व्हिडियोने तब्बल 30 लाख व्ह्यूज कमावले आहेत. यावरून याची लोकप्रिय लक्षात यावी.
पण यात नमूद करावी अशी बाब म्हणजे हा व्हिडियो कुठच्याही रियालिटी शो मधला नाहीये. तसेच कुठच्याही डान्स स्टुडियो मधला ही नाहीये. त्यामुळे एरवी डान्स साठी तयार केला जाणारा माहोल यात नाही. पण या व्हिडियोत डान्स करणारी मुलगी इतकी कुशल नृत्यांगना आहे की व्हिडियोच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपलं लक्ष केवळ तिच्यावरच खिळून राहिलेलं असतं. या कुशल नृत्यांगनेचं नाव आहे मिनी सेठी. मिनी ही बेली डान्स या प्रकारातील एक उत्कृष्ठ डान्सर आहे. आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो म्हणजे तिने मूड इंडिगो २०१८ या लोकप्रिय फेस्टिवल सादर केलेल्या परफॉर्मन्सेसचं चित्रीकरण आहे. या स्पर्धेत तिने भाग घेतला होता आणि तिने दोन राउंडस मध्ये सादर केलेले डान्स आपल्या पाहायला मिळतात. कौतुकाची बाब म्हणजे मिनी ही या स्पर्धेत विजेती ही ठरली होती. पण मूड इंडिगोत जिंकण्याचं तिचं काही हे पहिलं वर्ष नव्हतं. आदल्या वर्षीही तिने नृत्य स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. फरक एवढाच की पहिल्या वर्षी तिने एका सहनृत्यांगने सोबत डुएट प्रकारात विजेतेपद पटकावलं होतं.
पुढील वर्षी तिने सोलो प्रकारात विजेतेपद पटकावलं होतं. असे हे विजेते परफॉर्मन्स बघणं म्हणजे खरंच एक उत्तम अनुभव आहे असं म्हणता येईल. कारण बेली डान्स साठी जशी शारीरिक लवचिकता हवी तशीच गाणं किंवा म्युझिक मधले बिट्स पकडणं ही जमायला हवं. मिनीने हे सगळं उत्तमरीत्या जमवून आणलं होतं. त्यामुळे या व्हिडियोतील प्रत्येक क्षण बघण्यासारखा आहे. तसेच या दोन्ही परफॉर्मन्स मध्ये मिळून तिने तीन गाणी आणि एके ठिकाणी म्युझिक वर डान्स परफॉर्मन्स दिले आहेत. त्यातही एक गाणं थोडं जुनं पण उडत्या चालींचं आहे, दुसरं काहीसं नवीन गाणं होतं तर तिसरं गाणं हे जुन्या गाण्याचं नवीन व्हर्जन होतं. त्यामुळे एकाचवेळी तीन वेगवेगळ्या गाण्यांवर आपल्याला बेली डान्स बघायला मिळतो. तसेच शेवटी बेली डान्स साठी खास म्युझिक ही असतंच.
त्यामुळे पूर्ण व्हिडियोभर आपलं लक्ष केवळ या परफॉर्मन्सवर टिकून राहतं. त्यात वर उल्लेख केल्याप्रमाणे मिनीचं बिट्स पकडणं तसेच जबरदस्त डान्स मुव्ह्ज आणि त्यातील सहजता यांमुळे हा परफॉर्मन्स आपल्या नेहमी लक्षात राहतो. या सहजतेतून तिचं डान्सवर असलेलं प्रेम तर अधोरेखित होतंच आणि तिने केलेली तयारी ही कळून येते. आपल्या टीमला तर हा परफॉर्मन्स खूप आवडला. आपणही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपणही आमच्या मतांशी सहमत असालच. जर आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून बघा. आपल्याला ही हे डान्स परफॉर्मन्स आवडतीलच हे नक्की.
तर मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला आज पाहिलेल्या एका वायरल व्हिडियो वरील लेख. हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :