Breaking News
Home / मनोरंजन / ह्या तरुणीने हळदीमध्ये केलेला डान्स होतोय जबरदस्त वायरल, पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

ह्या तरुणीने हळदीमध्ये केलेला डान्स होतोय जबरदस्त वायरल, पाहून तुम्हीसुद्धा फॅन्स व्हाल

हा लेख लिहीत असताना आजूबाजूला धुळवडीचा आनंद अगदी गगनात मावेनासा झालेला आहे. कुठे तरी लहान मुलं पिचकाऱ्या घेऊन रंगपंचमी खेळताहेत तर कुठे त्यांच्यापेक्षा मोठी मुलं गाणी म्हणत घरोघरी जाताहेत आणि वर्गणी गोळा करताहेत. तर आमच्या सारखे काही जण, दुरून डोंगर साजरे म्हणत कामात गुंतले आहेत. तर घरात मस्तपैकी खमंग असा काही बेत होतो आहे. एकूणच काय, तर वातावरणात अगदी उत्साह भरून राहिला आहे. तशी गेली दोन वर्षे सुकी सुकीच गेली म्हणा ! त्याचमुळे आजच्या दिवसांत सगळेच जण अगदी धमाल मस्ती करताना बघता येऊ शकतात.

आता या अशा उत्साही वातावरणात आपणही कोणत्या तरी मस्त विषयावर लिहावं अस वाटत होतंच. आता मस्त म्हणजे सहसा वायरल व्हिडियोज हा आपल्या वाचकांचा आणि आपल्या टीमचा ही आवडता विषय आहेच. त्यामुळे त्यावर लिहावं अस मनात येत होतं. पण त्यात थोडे काही तरी वेगळेपण असावं असंही वाटत होतं. मग काय करणार बुवा म्हणून बघायला गेलो तर काही वेळाने एक मस्त व्हिडियो सापडला जो आवडून गेला. म्हंटलं चला यावरच लिहू. हा एका हळदी समारंभातील व्हिडियो आहे.

याची खासियत अशी की हा व्हिडियो एडिट केलेला आहे. सहसा असे व्हिडियोज असतात हे आम्हाला ही माहिती आहे. पण आपली टीम सलग एकच एक चित्रीकरण असलेले व्हिडियो असतात अशा विषयांवर सहसा लिहीत असते. एडिट केलेले व्हिडियोज हा तसा आमच्याकडुन कमी हाताळला गेलेला विषय आहे. पण या व्हिडियोतील एडिटिंग आम्हाला आवडून गेली. आपल्याला ही आवडून जाईल बघा. तसेच यापेक्षा ही अजून एक गोष्ट आवडून गेली. ती गोष्ट म्हणजे या व्हिडियोत बघायला मिळणारा जबरदस्त उत्साही माहोल होय. यात आपल्याला एक तरुणी डान्स करताना दिसते. या मुलीने या समारंभात मस्त असा डान्स केला आहे. तिच्या स्टेप्स ही आपल्या सगळ्यांना आवडतील अशाच आहेत. आपल्या ही अनेक मित्र मैत्रिणी आणि काही वेळा आपणही अशा डान्स स्टेप्स करत असतोच. त्यात या तिच्या डान्स स्टेप्सना स्लो मोशन ची जोड मिळाली आहे त्यामुळे हा व्हिडियो अजून छान वाटतो. तसेच स्लो मोशन ही योग्य ठिकाणीच वापरलं आहे. त्यामुळे त्या इफेक्ट् चा अतिरेक होत नाही, पण मस्त परिणाम साधला जातो. तसेच या मुलीचं प्रसन्न व्यक्तिमत्व ही या व्हिडियोच्या केंद्रस्थानी आहे असं म्हंटलं तर वावगं ठरू नये !

वाजत असलेल्या गाण्यांची मजा मोकळेपणाने घेत डान्स करणारी तरुणी या प्रसन्न व्यक्तित्वामुळे लक्षात राहते. तसेच तिच्या आजूबाजूला असलेली इतर मंडळी ही तिच्या एवढीच उत्साही असल्याचं दिसून येतं. ही मंडळी ही अगदी जोमात नाचत असतात. त्यामुळे त्यांचा उत्साह ही या व्हिडियोतील आनंदात भर घालत असतो. वर उल्लेख केलेला जबरदस्त माहोल तयार होतो. एकूणच काय तर हा व्हिडियो म्हणजे आनंदाचा छोटासा बूस्टर डोस आहे. त्यामुळे दिवसभर रंगपंचमी खेळून आपण आनंद लुटला असेलच. आता हा व्हिडियो बघून त्या आनंदात आपल्याला भर घालता येईल. चला तर मग मंडळी, वाट कसली बघता. हा लेख संपला की खाली आम्ही वर उल्लेख केलेला व्हिडियो दिला आहे. त्यातील या तरुणीच्या डान्सचा आणि व्हिडियो एडिटिंग चा ही आपण आनंद घ्या.

आम्ही सध्या तुमचा निरोप घेतो. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.