Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ताईंनी केला सुदंर डान्स, नाचताना एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

ह्या ताईंनी केला सुदंर डान्स, नाचताना एक्सप्रेशन्स पाहून तुम्हीदेखील फॅन्स व्हाल

अनेक कलाकृती या प्रेक्षकांसमोर सादर होत असतात आणि प्रसिद्ध पावत असतात. तसेच कालानुरूप त्यांची प्रसिद्धी कमी कमी होत असते. पण यातील काही कलाकृती मात्र लोकप्रिय होतात आणि सदाबहार म्हणून आपल्या मनात घर करून राहतात. इतक्या की कित्येक वर्षांनंतर ही त्यांची मोहिनी कायम असते. येणाऱ्या नवीन कलाकारांकडून, सामान्य प्रेक्षकांकडून त्यांच्या त्यांच्या पद्ध्तीने वारंवार सादरीकरण होत असतं. अशाच एका अतिशय लोकप्रिय कलाकृतीला एका महिला रसिक प्रेक्षकांनी सादर करताना बघण्याचा योग आला. अर्थात हे शक्य झालं ते एका वायरल व्हिडियो मुळे. हा व्हिडियो बघितला आणि आमच्या टीमने ठरवलं की आपल्या वाचकांसाठी यावर लेख लिहायचा. चला तर मग वेळ न दवडता या व्हिडियो विषयी आणि त्यातील मूळ कलाकृतींविषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो जवळपास तीन ते चार वर्षांपूर्वीचा व्हिडियो असावा. या व्हिडियोत आपल्याला एक ताई एका लोकप्रिय गाण्यावर डान्स करताना दिसतात. खरं तर हे केवळ गाणंच काय, पण यावर जी बैठकीची लावणी केली गेली आहे ती ही लोकप्रिय ठरली आहे.

होय, तुम्हाला थोडासा अंदाज आला असावा. यात , ‘या रावजी तुम्ही बसा भावजी’ या गाण्यावर डान्स केलेला बघायला मिळतो. हे मूळ गाणं स्वरसाम्राज्ञी आशाजी भोसले यांच्या स्वरात स्वरबद्ध झालेलं आहे. यास जगदीशजी खेबुडकर यांचे शब्द आणि अनिल-अरुण या लोकप्रिय संगीतकार जोडीची चाल या गाण्यास लाभली आहे. तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखाताई पुणेकर यांनी या गाण्यावर जी लावणी सादर केली आहे ती किती अप्रतिम आहे हे काही वेगळं सांगायला नको. ही लावणी सादर करत असताना त्या स्वतः ती गातात आणि परफॉर्मन्स देतात. त्यांच्या या परफॉर्मन्स मधील नजाकत म्हणजे काय वर्णावी. अहाहा ! तर अशा या दोन्ही उत्तम कलाकृतींची पार्श्वभूमी लाभलेला हा व्हिडियो आहे.

या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा वर उल्लेख केलेल्या ताई या गाण्याच्या म्युझिक वर विहार केल्यासारख्या चालत असतात. अगदी डौलदारपणे चालत या गाण्याचे शब्द कानावर पडण्याची जणू त्या वाट बघत असतात. पुढच्या काही क्षणांतच या गाण्याचे शब्द कानावर पडतात आणि त्यांचा डान्स सुरू होतो. सुरुवातीलाच ‘या रावजी तुम्ही बसा भावजी’ असे शब्द असल्याने त्यांच्या डान्स स्टेप्स ही तशाच असतात. गाणं जस जसं पुढे सरकत त्याप्रमाणे त्यांच्या स्टेप्स ही बदलत जातात. त्यांच्या या परफॉर्मन्स मधील एक जमेची बाजू म्हणजे त्यांचं सदैव हसतमुख असणं. त्यामुळे या गाण्यातील प्रत्येक कडव्याचा आनंद घेत त्या डान्स करत असतात हे जाणवत राहतं.

तसेच त्यांच्या डान्समधून त्यांना गाणं आणि डान्सची आवड असावी हे सुदधा जाणवतं. कारण त्यांच्या डान्स स्टेप्स या अगदी सहज होत असतात. तसेच कोणत्याही डान्स परफॉर्मन्स मध्ये चेहऱ्यावरचे हावभाव, शब्द नसताना केवळ म्युझिक वर डान्स करणं, गाण्याच्या गतीनुसार स्टेप्स करणं हे महत्त्वाचं असतं. या ताईंच्या परफॉर्मन्स मध्ये हे सगळे मुद्दे दिसून येतात. त्यामुळे दोन मिनिटांपेक्षा ही कमी वेळ चालणारा हा व्हिडियो आपल्याला आवडून जातो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही आवडला असेलच.

सोबतच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्या पसंतीस उतरला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर उत्तमोत्तम लेख भेटीस घेऊन येत असते. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत असता आणि आम्हाला प्रोत्साहन देत असता. यापुढेही आपलं प्रोत्साहन आमच्या टीमला मिळत राहू दे ही सदिच्छा. आम्हीही आपल्यासाठी उत्तमोत्तम लेख लिहीत राहूच याची खात्री बाळगा. लवकरच नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेखही डोळ्याखालून घाला. सगळेच लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.