‘तार बिजलीसें पतले हमारे पिया’ हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल पण आपल्या पियाला मनवण्यासाठी या ताईंनं केलेला डान्स बघाल तर थक्कच व्हाल. काय आहे ना दिवाळी सुरू होती. एकदम चकाचौंध रोषणाई…. तोरण वैगरे लावून दारं सजली. कंदीलही झळकत होते. ताशाचा सूर कसा वाऱ्याच्या वेगानं भीनला होता. मंडळी दिवाळी साजरी करत होती, कुणी फराळावर ताव मारत होती. इतक्यात एक बाई अचानक येऊन इलेक्ट्रीक शॉक लागल्यासारखं झटका आल्यासारखं करायला लागली. सुरुवातीला कुणाला काही कळेना. आम्हाला काय वाटलं की कुठंतरी कंदीलाची तार उघडी राहिली आणि ताईंचा पाय पडला की काय… म्हटलं ताईंच्या अंगातच जणू वीज संचारली की काय एवढा हायवोल्टेज ड्रामा बघितल्यावर आणखी काय होणार की हो त्यामुळं मग आम्हालाही असंचं वाटत होतं. पण निरखून पाहिला.
व्हीडिओ दोन तीन वेळा पाहिला तर कळंलं की ताईंना कसला शॉकबिक काय बी लागलेलं न्हाय. ताईंच्या अंगात एकदम डान्सचा किडा शिरलायं. एकवेळ झटका लागला की माणूस काही सेकंदात थाऱ्यावर येईल. पण इथल्या केसमध्ये तसलं काही नसतं. एकदा का हा डान्सचा झटका लागला ना की मागे वळून कोण पाहत नाही. मग या ताईतरी कशा काय पाहतील. ताई गेल्या होत्या बाजारात काहीतरी आणायला. वाटेत आला नवरोबाचा फोन… म्हणला असेल आज बोनस झालाय. चल एकत्र जाऊ शॉपिंग करायला. तुलला काय पाहिजे ते बोल आज दिवाळीला पाडव्याच्या आधीच तुला गिफ्ट दिलं. ताईचा आनंद अगदी गगनात मावेना… भाओजी एकदम गिफ्ट देणार म्हटल्यावर काय करू आणि काय नको, असं म्हणणाऱ्या ताईला एकदम सुरू असलेल्या ताशाच्या ठेक्यावर थिरकावंसं वाटलं होतं. ताई तशीच थिरकायला लागली.
आजूबाजूला काही पाहिलं नाही. बिनधास्त बेफाम आणि बेभान होऊन नाचली. ताईचा नाचण्याचा मोह सुटेना की तिला अगदी पार गिरकी घेताना तोल सुटला. खाली जाऊन पडली. पण पुन्हा उठली डान्स पुन्हा सुरू केला. डान्स पुन्हा संपविला आणि पुन्हा आपल्या घराकडं निघुनपण गेली. आपण तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं तर लक्षातही येणार नाही की याच बाईनं थोड्यावेळापूर्वी इथं आपल्या डान्सने सगळ्यांना चारशे चाळीस करंटचा झटका दिला होता. ताईंनी केलेल्या ह्या डान्सचे खूप कौतुक होत आहे. ताईंच्या ह्या जबरदस्त टॅलेंट आणि साहसाला खरंच मनापासून सलाम. आयुष्य जगावं तर असं बिनधास्तपणे. मित्रांनो व्हिडीओ पहा, तुम्हांलाही नक्की आवडले. शेअर करायला विसरू नका.
बघा व्हिडीओ :