Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ताईंनी गृहप्रवेशावेळी घेतलेला जबरदस्त उखाणा ऐकून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत, बघा व्हिडीओ

ह्या ताईंनी गृहप्रवेशावेळी घेतलेला जबरदस्त उखाणा ऐकून तुम्हीदेखील कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत, बघा व्हिडीओ

नवरी म्हटली की इतर तयारीप्रमाणे महाराष्ट्रीयन लग्नामध्ये खास तयारी करावी लागते ती उखाण्यांची. लग्नाचे उखाणे हे नवरीसाठी नक्कीच वेगळे आणि खास असतात. पण आजकाल उखाणे तयार करण्याची पद्धतच निघून गेली आहे. नवरीचे उखाणे आता आयते सर्च करूनही मिळतात. लग्नात नाव घेणे ही पद्धत पूर्वपरंपरागत चालत आली आहे. मराठी उखाण्यात नाव घेणे ही मजा लग्नात काही औरच असते. त्यातही उखाणे नवरीचे असतील तर सर्वांचे डोळे तिच्याकडे लागलेले असतात. नवरीकरिता आता मजेशीर उखाणेही असतात. लग्नात उखाणे घेण्याची एक स्पर्धाच असते जणू! नवरीचे मराठी उखाणे हे तर लग्नातील वैशिष्ट्य. मराठी लग्नात नाव घेणे ही परंपरा आजही चालू आहे. नवरीचे उखाणे ऐकण्यासाठी खास सगळे जमलेले असतात. त्यामुळे आजकाल भारी भारी उखाणे घेऊन त्यातही मजा घेण्याचा, सर्वांना आनंद देण्याचा ट्रेंड आलेला आहे, जो सगळ्यात भारी आहे.

नाव घ्यावंच लागणार, नाव घे. असं म्हणत लग्नकार्यात किंवा कोणत्याही खास प्रसंगात उखाणा घेण्याचा आग्रह केला जातो. लग्नात उखाण्याची छोटीशी गंमत वेगळाच आनंद देऊन जाते. नवी नवरी, नवरा मुलगा कोणता उखाणा घेणार याची उत्सुकता लग्नघरातल्या प्रत्येकालाच असते. सध्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. ज्यात नवरीने किंवा नवरदेवाने भारी भारी, कधी इमोशनल तर कधी कॉमेडी उखाणे घेतल्याचे समोर आले आहे. आता असाच एक व्हायरल व्हिडीओ आमच्याकडे आला आहे, ज्यात एकदम अफलातून असा उखाणा नवरीने घेतला आहे.

लग्नसराईचा सध्या मौसम सुरू आहे. लगीनघरात लगीनघाई सुरू आहे. अशावेळी घरात एक वेगळीच लगबग पाहायला मिळते. नवरा-नवरीसाठी कपडे, दागिने खरेदी करणं, लग्नपत्रिका छापणं, पाहुणे, मंडप, बस्ता, शिदोरी आणि काय काय… यात काही मजेशीर क्षणही असतात. लग्नात वेगवेगळे विधी पार पाडले जातात. त्यातलाच एक मजेशीर क्षण म्हणजे उखाणे घेण्याचा. आजच्या या व्हिडीओत नवरी आता तिच्या हक्काच्या दुसऱ्या घरी आली आहे. ज्यात आता तिचा गृहप्रवेश होणार आहे.

या गृहप्रवेशवेळी तिने एक सुंदर उखाणा घेतला आहे, जो सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सासू,सासरे, दिर, जाव, पुतण्या आणि नवरा आशा सगळ्याचा उल्लेख तिने या उखाण्यात केला आहे. अगदी इमोशनल आणि सगळ्यांना भावेल असा उखाणा तिने तयार केला आणि न अडखळत म्हणून सुद्धा दाखवला. भारी गोष्ट म्हणजे नवरी उखाणा घेत असताना नवरदेवाच्या चेहऱ्यावर सातत्याने हसू आहे, जे आपल्याला त्या दोघांच्या नात्यांमधील प्रेम दाखवते. आणि जो उखाणा नवरीने घेतला आहे, त्या उखाण्यातुन आपल्याला नवरी तिच्या नवीन घरातील लोकांशी कशी कनेक्शन जोडणार आहे, कसे नवे नाते गुंफणार आहे, हे दाखवणार आहे. त्यामुळे तुमचं लग्न झालं असेल किंवा नसेल… तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच पहा.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *