आपल्या भारतात लग्न म्हणजे जणू उत्सवच असतो. लग्नातील प्रत्येक क्षण हे खासच असतात. साखरपुडा, मेहंदी, हळद, संगीत आणि मग लग्नाचा दिवस ह्यांना तर आता विशेष महत्व आहे. हे सर्व क्षण वधू वरांसाठी खास असतातच पण त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी हे सुद्धा खूप धम्माल करून लग्नामध्ये रंगत आणतात. आणि मग हे क्षण आपोआपच खास बनून जातात. असे खास क्षण जर कॅमेरात कैद झाले तर त्याची बातच काही और असते. त्यामुळे जो तो आता लग्नामध्ये कुणी काही करताना दिसला रे दिसला कि मोबाईलवर व्हिडीओ काढायला चालू होतो. जेणेकरून ते क्षण पुन्हा पाहिल्यावर मज्जा येईल. त्यातील मग काही व्हिडीओज सोशल मीडियावर सुद्धा येतात आणि मग ते लोकांना आवडतात, काही वायरलसुद्धा होतात. अश्या प्रकारचा एक व्हिडीओ आपल्या टीमच्या हाती लागला आहे. ज्यात एक ताई नऊवारी साडीमध्ये हळदीचा ताट घेऊन सुंदर डान्स करत आहे.
लग्नातील हळदीला तर खास मजा असते. तुम्हांला अनेकजण म्हणाले असतील कि तुझ्या हळदीत मला नाचायचं आहे. अहो ह्या वाक्यातच सर्व काही आले हो. हळद म्हटलं म्हणजे धम्माल नाचगाणं, मजामस्ती हे सर्वकाही आलं. व्हिडीओ सुरु होतो तेव्हा ताई पिवळ्या रंगाच्या सुंदर अश्या नऊवारी साडीमध्ये हळदीने भरलेला ताट घेऊन नाचायला सुरुवात करत आहेत. ताईंच्या हातात बांगड्यांचा हिरवा चुडा सुद्धा खूप शोभून दिसत आहे. ‘गुलाबाची कळी कशी हळदीने माखली’ ह्या हळदी स्पेशल गाण्यावर ताईं नाचत आहेत. त्यामुळे हळदीचा खास फील सुद्धा येत आहे. चेहऱ्यावर हास्य आणि हातात हळदीचे ताट धरून ताई वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करत आहे. मध्ये मध्ये त्या एका हातात ताट घेऊन दुसऱ्या हाताचा उपयोग डान्स स्टेप्स साठी करत आहेत. सर्वकाही व्यवस्थित जमून आलं आहे. ताईंकडे पाहून वाटत आहे कि आज त्या ठरवूनच आल्या आहे कि आज हळदीत मनसोक्त नाचायचं. आणि जेव्हा समोरचा व्यक्ती मनापासून नाचतो ना तेव्हा पाहणाऱ्यालाही मग ते पाहतच राहावं असं वाटतं. बाजूला सर्व नातेवाईक मित्रमंडळी जमलेली आहे. ते सुद्धा टाळ्या वाजवत ताईंच्या डान्सला प्रोत्साहन देत आहे.
ताई काही क्षण नाचत असतात, मग त्या बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या ताईंकडे नाचता नाचताच इशाऱ्याने इकडे येऊन हळदीचे ताट घेण्यासाठी सांगतात. त्यानंतर दुसऱ्या ताई हळदीचे ताट घेऊन नाचायला सुरुवात करतात. परंतु त्या नाचायला सुरुवात करत असतानाच व्हिडीओ संपतो आणि आपला थोडासा हिरमोस होतो. निदान काही क्षण अजून व्हिडीओ रेकॉर्ड केला असता तर असं मनाला वाटून जातं. खरंच खूप छान डान्स केला आहे ताईंनी. त्यामुळे काही क्षण का होईना नाचणाऱ्या आणि पाहणाऱ्या दोघांचेही मनोरंजन झाले. आणि असे क्षणच मग लग्नाला खास बनवून जातात. आणि हीच तर खासियत असते लग्नाची. सर्व जण एकत्र येतात. आणि एकत्र आले कि सर्व टेन्शन वैगेरे बाजूला सारून काही काळ का होईना एन्जॉय करता येतो. मित्रांनो तुम्हांलाही हा व्हिडीओ खूप आवडेल. एकदा पाहून घ्या आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
बघा व्हिडीओ :