Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ताईंनी स्टेजवर केलेला हा अफलातून डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या ताईंनी स्टेजवर केलेला हा अफलातून डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

एखाद्या कलाकाराला त्यांच्या मनाप्रमाणे कला सादर करून दिली की जे मस्त मनोरंजन होतं त्यास तोड नसते. सहसा कलाकारांना, स्वातंत्र्य दिलं की त्यांच्याकडून अपेक्षित आणि अनपेक्षित पण चांगले असे अनेक अनुभव आपल्याला मिळतात. अर्थात अस असलं तरी कलाकारांना त्यांची कला सादर करताना बऱ्याच गोष्टींचं भान ठेवावं लागत. खासकरून जर हे कलाकार एखाद्या मंचावरून थेट सादरीकरण करणार असतील तर उपस्थित प्रेक्षक, त्यांच्या आवडीनिवडी, उपलब्ध वेळ, स्वतःची तयारी, या आणि अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. बरं एवढं करूनही चेहऱ्यावर मात्र यातलं काहीही न दाखवता काम करावं लागतं. आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला आनंद झाला पाहिजे याच्याकडे लक्ष द्यावे लागत.

अर्थात प्रत्येकालाच हे सफाईदारपणे जमतं असं नाही. पण अनुभवाने म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे हे सगळं जमून जातं आणि मग कार्यक्रमात रंग भरत जातो. त्यामुळे एखादा कलाकार जेव्हा मंचावर त्यांची कला सफाईदारपणे सादर करून जातात तेव्हा मनाला आनंद होतो. आता सध्याच्या परिस्थितीत असे लाईव्ह मनोरंजन दुरापास्तच आहे आणि ते बरोबर ही आहे. पण त्याची उणीव अनेक जुन्या व्हिडियोजनी भरून निघते.

आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घ्या ना !हा व्हिडियो आहे एका अशा ताईंचा ज्या जबरदस्त नृत्यांगना आहेत. म्हणजे आम्ही त्यांना ओळखत नसलो तरी त्यांच्या अफलातून डान्सचा एक व्हिडियो बघण्यात आला. या व्हिडियोत अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांचाच वावर असतो आणि तो आपल्या मनात ही ठसतो. पण असं का होतं? उत्तर वर दिलं आहेच. त्यांचा अफलातून डान्स ! खरं तर व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा या ताई मंचावर लावणीचा पेहराव करून येतात. आता एखादी लावणीच बघायला मिळेल असं वाटतं. पण या व्हिडियोत वैविध्यपूर्ण असं फ्युजन नृत्य बघायला मिळतं आणि अर्थात त्यास लावणीचा तडका हा असतोच. अर्थात हे सगळं त्यांच्या परफॉर्मन्स सोबत उलगडत जातं. एकाच वेळी सगळं कळत नाही. त्यामुळे या परफॉर्मन्स विषयी असलेली उत्सुकता आणि आनंद हा टिकून राहतो. त्यात या ताई स्वतः उत्साही असल्याचं कळून येतं. कारण त्या केवळ डान्स स्टेप्स करत नसतात तर अभिनयाने उपस्थितांशी संवाद साधत असतात. आता खरं तर डान्स करत असताना संवाद साधणे तसे कठीण कामच म्हणायला हवं. कारण या नादात एखादा बिट जरी चुकला तरी पुढच्या डान्सचा बट्याबोळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या ताईंची त्यांच्या नृत्यकलेवर जबरदस्त पकड असल्याचं दिसून येतं.

खासकरून शेवटी तर त्याचा प्रत्यय येतो. व्हिडियो संपत आलेला असताना त्या थेट प्रेक्षकांच्या दिशेने चालत जातात. यांचा डान्स संपला की काय असं वाटत असताना पून्हा डान्स करू लागतात. पण यात महत्वाची बाब अशी की त्या याचवेळी गाण्यातील डायलॉग अगदी योग्य वेळी बोलतात. त्यामुळे त्यांचं चालत जाणं आणि डायलॉग बोलणं हे त्या डान्स परफॉर्मन्स मध्ये अगदी सामावून जातं. बरं त्याच्या आधीही ‘डोक्यावर टोपी आणि तोंडात पान’ या वाक्यावरील त्यांच्या स्टेप्स प्रत्येक वेळी अगदी वेळेवर होताना दिसतात. बरं एवढा वेळ डान्स करून थकवा आलाय वगैरे तर तसंही काही दिसत नाही. उलट त्यांचा उत्साह जबरदस्त असतो. त्यामुळे आपणही हा व्हिडियो शेवटपर्यंत बघतो. आपल्या टीमने तर या व्हिडियोला बघून खूप आनंद मिळवला.

त्यामुळे आपल्या वाचकांना ही याविषयी कळावं अस वाटलं आणि आजचा हा लेख लिहिला गेलेला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *