Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ताईंनी हळदीमध्ये केला जबरदस्त डान्स, स्टेप्स आणि उत्साह पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या ताईंनी हळदीमध्ये केला जबरदस्त डान्स, स्टेप्स आणि उत्साह पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

लग्न म्हंटलं की सहसा धमाल असं मनात पक्कं बसलेलं असतं. या शब्दाच्या आधी जेव्हा ‘आगरी कोळी’ हे दोन शब्द येतात तेव्हा हीच धमाल कधी कमाल बेमिसाल होऊन जाते ते कळत नाही. मुळातच आपले आगरी कोळी बांधव म्हणजे जीवाला जीव देणारे जिवलग असतात. त्यांचं मन हे त्यांच्या लाडक्या समुद्रसारखं विशाल असतं. त्यामुळे मनाने ही अगदी जिंदादिल असतात. त्यामुळे आयुष्याच्या प्रवासात कितीही लाटा येऊ दे वा वादळ येऊ देत, ही मंडळी अगदी नेटाने त्यांचा सामना करतात आणि त्यावर स्वार होतात. हे करत असताना हाच आयुष्याचा प्रवास ही अगदी मनसोक्तपणे जगतात. त्यांचं हेच जिंदादिल जगणं त्यांच्या वागण्यात नेहमीच दिसून येतं.

याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आगरी कोळी समाजातील लग्न समारंभ होय ! जगाच्या पाठीवर लग्न हा सोहळा इतक्या जल्लोषात, आनंदात आणि उत्साहात इतर कुठे क्वचितच साजरा होत असावा. या लग्नात धमाल आणि आनंद अगदी जबरदस्त असतो. म्हणजे खाणं म्हणू नका, गाणं म्हणू नका की अगदी डान्स म्हणू नका. नवरा नवरी पासून ते सगळी वऱ्हाडी मंडळी यात अगदी उत्साहाने सामील होत असतात.

बरं ही धमाल अगदी हळदी पासून सुरू होते. प्रत्येक क्षणातून आनंद घेण्याची त्यांची वृत्ती अशावेळी अगदी ठळकपणे जाणवते. त्यामुळे हळदी समारंभात गाणं लागलं असेल की मस्त असा डान्स हा होतोच. बरं आपलं आगरी कोळी संगीत पण एकदम नाचायला लावेल असच आहे. आगरी कोळी गाणी ऐकलेला माणूस स्वस्थपणे बसून राहिलाय अस कधी होत नाही. कारण या गाण्यांमध्येच एवढी ऊर्जा आणि एवढा उत्साह असतो की माणूस जागेवरून उठून नाचालाच पाहिजे. त्यामुळे लग्नात डान्स करायची वेळ आली आणि गाणं सुरू झालं की आपसूक आपले पाय थिरकायला लागतात. बरं त्यात हल्ली व्हिडियो चित्रित करणं तंत्रज्ञानामुळे अगदी सोप्पं झालंय. त्यामुळे अनेकवेळा या मस्त डान्स करतानाचे अनेक व्हिडियो चित्रित केले जातात. मग त्यातील काही व्हिडियोज हे सोशल मीडियावर ही येतात. त्यातील जे व्हिडियोज लोकप्रिय ठरतात त्यांना आपसूक प्रसिद्धी मिळते आणि ते वायरल म्हणून ओळखले जातात. असाच एक धमाल वायरल व्हिडियो बघण्याचा योग नुकताच आला.

हा व्हिडियो गेल्या काही काळापासून वायरल ठरला आहेच. हा व्हिडियो एका हळदीच्या कार्यक्रमातील असल्याचं कळतं. या व्हिडियोत आपल्याला एक ताई धमाल असा डान्स करताना दिसून येतात. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या उत्साहामुळे हा व्हिडियो कमी वेळेचा असूनही लक्षात राहतो. कारण त्या उत्साहाने छान अशा डान्स स्टेप्स करत असतात. बरं त्या स्टेप्स ही त्या गाण्याच्या बोलांना साजेल अशाच असतात. त्यामुळे गाणं आणि डान्स हे सुसंगत वाटतात. सुसंगत वाटलेली कोणतीही गोष्ट आवडून जातेच. बरं हा व्हिडियो जसा वायरल ठरला आहे तसाच या व्हिडियोत ऐकायला येणाऱ्या गाण्याचा व्हिडियो ही वायरल झाला आहे. ‘नवरा पाहिजे, गोरा गोरा’ हा तो म्युझिक व्हिडियो आहे. आता या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी हा व्हिडियो अपलोड होऊन पाच महिने होतील. पण या एवढ्या कमी काळातही या म्युझिक व्हिडियोने जवळपास १.९ कोटी व्ह्यूज कमावले आहेत. त्यामुळे या मार्चच्या शेवटपर्यंत हा आकडा दोन कोटींच्या पार नक्की जाईल असा विश्वास वाटतो. तसेच आनंद या गोष्टीचा वाटतो की एका वायरल व्हिडियोच्या निमित्ताने दुसऱ्या एका वायरल व्हिडियोची झलक आपल्याला गाण्याच्या निमित्ताने का होईना ऐकायला मिळते.

वायरल व्हिडियोजची ही एक खुबी आहे असं म्हणता येईल. की एका व्हिडियोच्या माध्यमातून दुसऱ्या ही काही चांगल्या आणि वायरल ठरलेल्या गोष्टींचा ही आनंद घेता येतो. वर उल्लेख केलेल्या ताईंच्या डान्स व्हिडियोतुन असाच दुप्पट आनंद घेता येतो. असो. एकदा आगरी कोळी गाणी आणि डान्स या विषयांवर लिहायला गेलं की लेखणी थांबत नाही. पण लेख म्हंटला की शब्दमर्यादा ही आलीच. तेव्हा सध्या इथेच थांबुयात.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.