Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दादांनी हातात रुमाल फिरवत स्वतःच्या वेगळ्या अंदाजात जो डान्स केला ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या दादांनी हातात रुमाल फिरवत स्वतःच्या वेगळ्या अंदाजात जो डान्स केला ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

काही समारंभ असे असतात की ज्यांच्यात काही जणांच्या सहभागाची आपण नेहमीच अपेक्षा करत असतो. खासकरून असे जण, जे त्या त्या समारंभाची शान वाढवतील. यात प्रामुख्याने जर एखादा समारंभ अगदी वाजत गाजत होणारा असेल तर आठवण येते ती भन्नाट नाचणाऱ्यांची. त्यांना गाणं ऐकायला आलं की आपसूक डान्स सुचायला लागतो. त्यांना त्यासाठी विशेष कष्ट करावे लागत नाहीत. बरं स्टेप्स वगैरे एकदम ठवरून केलेल्या किंवा साचेबद्ध असतीलच असं नाही. पण डान्स करताना ते जो आनंद घेऊन नाचतात त्यामुळे आपणही उत्साहित होतो. त्यांच्या काही स्टेप्स तर अगदी लक्षात राहतात. या सगळ्यांची या लॉक डाऊन काळात आठवणी करून देणारा एक जुना व्हिडियो आपल्या टीमने पाहिला आणि त्याविषयी लिहावं असं ठरलं. हा व्हिडियो आहे एका समारंभातला. समारंभाचे कारण आणि स्थळ कळत नाही, पण यात डी जे असणार हे लक्षात येतं. कारण व्हिडियो सुरू होत असतानाच गाण्याचं म्युझिक कानावर पडतं.

त्यात पूर्ण पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट आणि मस्त अशा करकरीत वाजणाऱ्या चपला अशा पोषाखात आपल्याला एक दादा दिसून येतात. हातात रुमाल फिरवत गाण्याच्या म्युझिकचा ते आनंद घेत असतात. सोबतच बाकीच्यांना बाजू सुदधा व्हायला सांगत असतात. एक तिर दो निशान. एकदा का मैदान मोकळं झालं की मग हे दादा पायातल्या चपला बाजूला सरकवत प्रवेश करते होतात. त्यांच्या देहबोलीतून कळून येतं, हे दादा काहीतरी खास डान्स करून दाखवणार. आपला अंदाज अगदी शंभर टक्के खरा ठरवत हे दादा पुढची दोन ते सवा दोन मिनिटं अगदी धमाल डान्स करतात. व्हिडियोच्या सुरुवातीला केवळ हात आणि पाय वापरून दादा भन्नाट नाचत असतात. त्यांच्या वेगवेगळ्या स्टेप्सनी मजा भरत असते. पण खरी मजा तर एक मिनिट पूर्ण झाल्यावर येते. कारण हे दादा पॅन्टचा वापर करतात. अरे ही कोणती स्टेप आहे असे भाव त्यांच्या पाठी उभे असलेल्यांमध्ये असते आणि आपणही विचार करत राहतो. पण ही स्टेप भाव खाऊन जाते हे मात्र नक्की.

मग अजून एक स्टेप येते. अशा एका पाठोपाठ एक लक्षात राहण्याजोग्या स्टेप करत हे दादा एकंदर समारंभात रंगत भरत असतात. एवढ्या दिलखुलासपणे नाचताना आपण खचितच काही जणांना पाहतो. त्यातले हे दादा म्हणजे एकदम झक्कास. त्यांच्या डान्स मध्ये कधी तरी बच्चन साहेबांच्या स्टेप्स डोकावतात हे अव्हेरून चालत नाही. संपूर्ण डान्स परफॉर्मन्स मध्ये ते स्वतः एकदम मजा घेत डान्स करतात त्यामुळे आपणही त्यांच्या या डान्सची मजा घेत असतो.

ज्यांनी ज्यांनी हा व्हिडियो पाहिला आहे त्यांना तो आवडतोच. या व्हिडियोसोबतच त्यावर आधारलेला हा लेखही आपल्यास आवडला असेल अशी सार्थ अपेक्षा आहे. आपल्यासाठी म्हणून विविध खास विषय निवडून, आपली मराठी गप्पा टीम त्यावर लेख लिहीत असते. आपणही हे लेख शेअर करत आम्हाला प्रोत्साहन देत असता. तेव्हा येत्या काळात ही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहील हा विश्वास आमच्या मराठी गप्पा टीमला आहे. आपला आणि आपल्या टीमचा स्नेह कायम असू द्या. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.