Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दोघांचा व्हिडीओ पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

ह्या दोघांचा व्हिडीओ पाहून तुमचा देखील दिवस बनून जाईल, बघा व्हिडीओ

प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांची वागणुक चांगली असावी किंवा समाजात ती संस्कारी घरातील मुलं म्हणून वावरावीत. शिवाय चांगली शिस्त लावल्यास मुलं चांगलं शिकून मोठं होतील, आई-वडिलांचं नाव मोठं करतील आणि एक चांगला माणूस म्हणून पुढे येतील. पण जसे लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसत असतात या म्हणीप्रमाणे आपला मुलगा काय करेल हे आपल्याला त्याच्या लहानपणी समजत असते. अशाच 2 मुलांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. अगदी कमी वयात या मुलांनी जी प्रार्थना म्हटली आहे, ते पाहून अनेकांना त्यांच्या निरागस मनाचा आरसा दिसला.

आपल्या घरात लहान मुले असतील तर आजवर आपण एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल ती म्हणजे, लहान मुलं ज्याप्रमाणे मोठ्यांचं अनुकरण करत असतात. जर घरात संस्कृती आणि संस्कारी वातावरण असेल तर मुलांची जडणघडण तशीच होते. घरात शिव्या-शाप सुरू असतील तर मुलेही पुढे जाऊन तशीच बनतात. आपल्या मुलांना घडवण्यात पालकांचा मोठा वाटा असतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत.

आजही आमच्याकडे अशाच 2 संस्कारी मुलांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत या दोघांनी भगवान शिव शंकराची एकदम सुंदर अशी प्रार्थना म्हटली आहे. जेवणापूर्वी प्रार्थना, अंघोळ झाल्यावर देवपूजा करताना प्रार्थना केल्याने मन प्रसन्न राहते. लहान मुले शांत नसतात. गडबड, गोंधळ त्यांच्या स्वभावात असतो. पण या व्हिडीओत दिसणारी आणि शांत चित्ताने प्रार्थना करणारी ही मुले विशेष म्हणजे या व्हिडीओमधून त्यांच्यातील संयम दिसून येत आहे.आजही अनेक घरांमध्ये जेवणापूर्वी वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ही प्रार्थना म्हटली जाते. लहान मुलांना तर ती हमखास शिकवली जाते.

प्रार्थना करण्याची सवय ही एक अशी क्रिया आहे जी आपण लहान असल्यापासून आत्मसात केली पाहिजे. मुलांमध्ये, प्रार्थना करणे शिकणे आणि ती एक सवय बनणे, त्यांच्यासाठी खूप सोपे आहे. त्यांना प्रार्थनेत शिकवण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कामही तितकेच सोपे आहे. विशेषतः त्यांच्या निरागसतेमुळे त्यांना देवाशी बोलणे खूप सोपे आहे, असे करताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही.

अगदी हेच भाव या व्हायरल व्हिडीओत असणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येतात. या मुलांचे इंटरनेटवर सगळीकडे कौतुक होत आहे. त्यांची ही प्रार्थना सगळ्यांना भावली आहे. पण दरवेळी लहान मुले अशी सुंदर आणि गोड प्रार्थना करतीलच असे नाही हा… काही दिवसांपूर्वी असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात एक चिमुकली तिच्या आईला भरपूर वैतागलेली दिसून येतोय. इतकी वैतागला आहे की थेट तिने देवाकडे प्रार्थनाच केली आहे. अभ्यासावरून आईच्या किटकिटला ही मुलगी वैतागून देवाकडे एक विशेष प्रार्थना करताना दिसून आली होती. खरं तर त्या मुलीची प्रार्थना पण छान होती. आजचा हा सुंदर प्रार्थनेचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. हा व्हायरल व्हिडीओ तुम्ही एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *