Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दोघांची डान्समधील जुगलबं’दी पाहून तुम्ही सुद्धा हसून वे’डे व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या दोघांची डान्समधील जुगलबं’दी पाहून तुम्ही सुद्धा हसून वे’डे व्हाल, बघा हा वायरल व्हिडीओ

नृत्य क्षेत्र ज्यांना आवडतं त्यांना डान्स फेस ऑफ असा प्रकार असतो हे माहिती असेलच. डान्स फेस ऑफ म्हणजे एक प्रकारे जुगलबं’दी. पण ती कधी वेळेस दोन किंवा जास्त स्पर्धकांची असते तर काही वेळेस दोन किंवा जास्त गटांची. अशी ही जुगलबं’दी आपल्याला अनेक रियालिटी शोज वर बघायला मिळते. पण आपल्याकडे वरातीत जी काही जुगलबंदी चालते ती यांच्या पलीकडे असते. हसलात ना ! कारण तुम्हाला नक्की असे एखाद दोन किस्से नक्की आठवले असणार. आम्हालाही याचीच आठवण झाली जेव्हा आपल्या टीमच्या पाहण्यात एक व्हिडियो आला. केवळ अर्धा मिनिटाच्या या व्हिडियोने काय हसवलं म्हणून सांगू. हा व्हिडियो आहे एका बेंजो पथकाच्या सरावाचा. त्यात जवळच राहणारी दोन मुलं ही समाविष्ट होताना दिसतात. दोघांकडे बघून मो’टू और पतलु म्हणावसं वाटावं. त्यांची दोस्तीही अशीच.

पण जेव्हा बेंजो वाजायला लागतो तेव्हा खरी धमाल येते. दोघेही नाचायला लागतात. जणू काय डान्स ऑफचं. पण सुरू झाल्या झाल्या त्यातला मो’टू मुलगा जमिनीवर खाली पडतो. आपल्याला वाटतं की, काय झालं की काय याला. पण आपली काळजी केवळ क्षणभर टिकते. कारण ती त्याची एक डान्स स्टेप असते. काय बोलणार असेच भाव आपल्या चेहऱ्यावर असतात. हातही नकळत कपाळाकडे गेलेला असतो. पण चेहऱ्यावर मात्र हास्य असतं. त्याची त’डफडणारी डान्स स्टेप बघून हसून हसून पुरेवाट होते. काय बोलणार या पोराला असे भाव बेंजो वाल्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असतात. पण हे दोघे मित्र मात्र डान्स फेस ऑफ मध्ये व्यस्त असतात. त्यांना काहीही फरक पडत नाही. त्यांच्या दृष्टीने एकमेकांना चिडवण आणि मस्ती करणं एवढंच महत्वाचं असतं. पण या दोघांच्या मध्ये तो मो’टू भाव खाऊन जातो हे खरं.

त्यात पतलु बिचारा मित्राची लोळून तडफडणारी स्टेप बघून गार झाल्याचं चित्र असतं. काहीही असो, पण ही जोडी धमाल करते. मध्यंतरी एका अमेरिकन विनोदी अभिनेत्याचा व्हिडियो पाहण्यात आला. त्यात तो म्हणतो की काही वेळेस आपल्या मनोरंजनासाठी आपल्यालाच काही तरी मनोरंजनात्मक तयार करावं लागतं. हा व्हिडियो कदाचित त्याचंच एक उदाहरण असावा.

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी खात्री आहे. तसेच आपली टीम आपल्यासाठी खास म्हणून विविध विषयांवर लेखन करत असते आणि दर दिवशी प्रसिद्ध ही करत असते. तेव्हा या नवनवीन लेखांचा ही आनंद घ्या. जे लेख आवडतात ते शेअर ही करा आणि आपला लोभ आमच्यावर असाच असू द्यात. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.