Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दोघांनी सर्वांसमोर केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या दोघांनी सर्वांसमोर केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपली टीम वायरल व्हिडियोज विषयी सातत्याने लिहीत आली आहे. त्यातही डान्स व्हिडियोज, लग्नाचे वायरल व्हिडियोज, लहान मुलांचे वायरल व्हिडियोज यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. पण अस असलं तरी बऱ्याच काळापासून आपल्या टीमने लग्नातील डान्समुळे वायरल झालेल्या व्हिडियोज विषयी लिखाण केलं नव्हतं. कारण मध्यंतरी असा कोणता व्हिडियो बघण्यात ही आला नव्हता. पण आज आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला आणि तो अगदी मनात बसला. त्यातील डान्स लाजवाब वाटला आणि आपल्या वाचकांना याविषयी सांगायला हवंच अस ठामपणे वाटलं. त्यातूनच हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.

हा व्हिडियो एका लग्नातील आहे हे आपण वर वाचलं असेलच. या लग्नातील एक जोडी या समारंभात आपल्याला अप्रतिम डान्स करताना बघायला मिळते. त्यांचा हा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स म्हणजे हा व्हिडियो आहे. खरं तर लग्न म्हंटलं की अनेक जोड्या डान्स करण्यात आघाडीवर असतात. पण अस असलं तरी या जोडीने जो डान्स केला आहे ना राव, त्यास तोड नाही.

आता बघा ना, व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला ही जोडी प्रथमतः दिसून येते. त्यावेळी खाकी चित्रपटातील गाण्याचे बोलही कानावर पडत असतात. ‘दिल डुबा’ हे गाणं यावेळी वाजत असतं. अक्षय कुमारजी आणि ऐश्वर्या बच्चनजी यांच्यावर चित्रपटातलं गाणं चित्रित झालेलं होतं. या दोघा कसलेल्या कलाकारांनी नेहमीप्रमाणे या परफॉर्मन्स मध्येही धमाल आणली होती. अशीच धमाल आपल्या व्हिडियो सुरू झाल्यापासून बघायला मिळते. सुरुवातीला ‘तू ये जान ले मेहबुबा’ हे शब्द ऐकू येतात. मग पुढची दहा सेकंद फक्त म्युझिक वाजत असतं. पण या सगळ्या वेळेत या जोडीने या परफॉर्मन्सचा माहोल बनवलेला असतो. याच मुख्य कारण असतं त्यांच्या डान्स स्टेप्स. एखाद्या सिनेकलाकाराला शोभाव्या अशा या स्टेप्स असतात. तसेच ही जोडी एवढया सहजतेने या स्टेप्स करत असते की जसे काही त्यांना या गाण्यावर डान्स करण्याची सवयच असावी. पुढेही त्यांचा डान्स सुरूच राहतो. यावेळी या दोघांमध्ये असलेलं ट्युनिंग ही जबरदस्त असतं हे अगदी प्रकर्षांने जाणवतं. दोघांचा डान्स अगदी साच्यात बसवल्यासारखा अगदी तंतोतंत जुळत असतो. पण अस असलं तरी त्यात तोचतोचपणा येत नाही. या दोघांच्या डान्स मुव्ह्ज ही एवढ्या सहज असतात त्यावरुन त्यांना गाणी आणि डान्स यांची मनापासून आवड असणार हे ओळखता येत. तसेच त्यांच्यातील लवचिकतेच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण हे दोघेही तसे मस्त गब्बू गब्बू दिसतात.

अस असूनही कंबर हलवत आणि पायांची लयबद्ध हालचाल करत केलेल्या स्टेप्स लाजवाब म्हणाव्या अशाच असतात. म्हणतात ना, की डान्स हा आतून म्हणजे मनापासून व्हायला हवा. या दोघांचा हा परफॉर्मन्स याच पठडीत मोडतो. तसेच हा डान्स आपल्याला विविध कॅमेरा अँगल्स मधून बघायला मिळतो. त्यामुळे त्याची मजा अजून वाढते. काही वेळेस क्लोजप तर काही वेळेस लांबून केलेलं हे डान्सचं चित्रीकरण छान वाटतं. आपल्या टीमला हा व्हिडियो खूप आवडला. आम्ही हा व्हिडियो केवळ डान्सचा आनंद घेण्यासाठी म्हणून कित्येक वेळा पाहून झाला आहे. आपण ही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपलीही तीच अवस्था झाली असणार यात शंका नाही. आणि जर का नसेल पाहिला तर जरूर पहा नाही तर एका उत्तम डान्स परफॉर्मन्सला आपण मुकाल.

मंडळी, आपण आमच्या टीमने लिहिलेल्या प्रत्येक लेखाला जो उत्तम प्रतिसाद देत असता त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपल्या पाठिंब्यामुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लेख लिहिण्याची ऊर्जा मिळते आणि टिकून राहते. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आमच्या पाठीशी ही कायम असू द्या. आपली टीम आपल्यासाठी नेहमीच उत्तम लेख लिहीत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेख वाचा. आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *