Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दोघांनी सर्वांसमोर केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या दोघांनी सर्वांसमोर केलेला हा अप्रतिम डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आपली टीम डान्स व्हिडियोज बद्दल लिहीत असते हे आपल्याला माहिती आहेच. अर्थात त्यासाठी अनेक डान्स व्हिडियोज बघावे लागतात हे ओघाने आलंच. यामुळे एक फायदा होतो. काही वेळा अचानक असे काही व्हिडियोज आपसूक आपल्या समोर येतात आणि चट्कन आवडून जातात. त्यांना बघताच क्षणी वाटून जातं की आपल्या वाचकांना याविषयी लेख वाचायला आनंद येईल. असंच काहीसं आज आपल्या टीमच्या बाबतीत झालं. चला तर मग जाणून घेऊयात कोणता व्हिडियो होता बरं हा !

हा व्हिडियो राहुल पगारे यांच्या युट्युब चॅनेल वरील आहे. गेली सात ते आठ वर्षे त्यांचं चॅनेल युट्युब वर असून ते अधनंमधनं त्यांच्या आयुष्यातील काही मस्त क्षण व्हिडियोबद्ध करून युट्युब वरती पोस्ट करत असतात. यात बहुतांश वेळा आपल्याला डान्स व्हिडियोज दिसून येतात. त्यामुळे आपले राहुल दादा डान्सचे दिवाने असणार असं म्हणायला हरकत नाही. तसेच त्यांच्या या युट्युब चॅनेल ची खासियत म्हणजे विविध खान्देशी डान्स आणि सण यांच्याविषयी या चॅनेल वरून कळतं.

आज आपल्या टीमने बघितलेला डान्स हे याचं उत्तम उदाहरण आहे. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक मोठा समूह गोलाकार आकारात उभा असलेला दिसतो. तीन वर्षांपूर्वीचा व्हिडियो असल्याने मास्क वगैरे नसतात. सोशल डिस्टन्सिंग ची ही गरज नसते. नकळत जुन्या आठवणी ताज्या होतात. असो. तर हे सगळे गोलाकार उभे असतात कारण त्यांनी केलेल्या रिंगणात दोन जण उभे असतात. एक असतात ते मस्त टोपी घातलेले दादा आणि दुसऱ्या बाजूला असतात ताई. या ताईंच विशेष कौतुक करायला हवं, कारण त्यांनी डोक्यावर कळशी घेतलेली असते. तुम्ही म्हणाल त्यात काय नवीन. पण ही कळशी त्यांनी उपड्या स्टील ग्लासवर धरलेली असते. त्यात त्या कळशीत असतं ते श्रीफळ. त्यामुळे या कळशीच वजन अजून वाढलेलं असणार. त्यामुळे या ताईंना तो ग्लास, त्यावरची कळशी आणि त्यातील श्रीफळ सांभाळताना किती कसरत करावी लागली असणार हे त्यांनाच माहीत. पण अस असूनही त्यांच्या चेहऱ्यावर डान्ससाठी अपेक्षित असलेला जो उत्साह असतो तो वाखाणण्याजोगा असतो. त्याच तोडीचा उत्साह आपले दादा सुद्धा दाखवत असतात.

त्यांचा हा डान्स जवळपास एक मिनीटभर चालतो. पण आपलं मनोरंजन होण्यासाठी हे एक मिनिट सुद्धा अगदी पुरत बरं का !! त्यात आपण पाहिल्यांदा जेव्हा हा व्हिडियो पाहतो तेव्हा त्या ताईंकडेच आपलं लक्ष असतं. त्यात डान्स करता करता काही तरी त्यांच्या पायाला लागतं किंवा पडतं. त्या नजरेने आणि हातवाऱ्याने तस दाखवून देतात आणि मग एक ताई ती वस्तू उचलतात. म्हणजे डान्स करताना ही त्यांचं चौफेर लक्ष असतं. तसेच या दोघांना डान्स करायला जागा कमी असली तरी उत्साह अगदी पूरेपूर भरलेला असल्याने धमाल येते. सोबतच पाठीमागे मस्त अस गाणं लागलेलं असतं. उपस्थितांना ही हा डान्स अगदी आवडून जातो. एक दादा येऊन तर पैसे ओवाळून टाकतात. त्या एक मिनीटभरात मस्त डान्सचा माहोल बनून जातो. आपल्या टीमला त्यामुळेच हा डान्स व्हिडियो खूप आवडला. याच श्रेय अर्थातच या ताई दादांना.

आपणही हा डान्स व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याही पसंतीस उतरला असेलच. जर आपण अजूनही हा व्हिडियो पाहिला नसेल तर नक्की पहा. कारण आतापर्यंत जवळपास १९ लाख लोकांनी हा व्हिडियो पाहिला आहे. तेव्हा आपणही त्यांच्या प्रमाणे या व्हिडियोचा आनंद घ्या. आणि बरं का मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख कसा वाटला हे सांगायला ही विसरू नका. त्यासाठी कमेंट्स सेक्शनचा वापर करा. कारण, आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहीत आली आहे आणि यापुढेही लिहीत राहीलच. अट फक्त एकच. आपण आता जसा प्रचंड पाठिंबा आम्हाला देत आहात, तसाच पाठींबा यापुढेही देत राहा. लेख वाचा, शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *