बॉलीवुडमध्ये नोरा फतेही आली आणि तिनं आपल्या दिलखेचक अदा दाखवित संपूर्ण सिनेरसिकाना घायाळ केलं. तिचा कमालीचा डान्स पाहून अनेकदा भल्या भल्यांचे फ्यूज उडालेत. नोराच्या बाबतीत सांगायचं झालं तर कंबर हलविण्याचं तिनं जे कसब शिकून घेतलंयं ना त्याला सांगून तोड नाही. कमालीचा परफॉर्म्स देत तिनं सगळ्याना गारेगार कोका कोला पाजलाय. पण या कोका कोला गाण्याचा परिणाम असा उलटा झालायं. की पन्नाशी साठीतले लोक आता नोराची कॉपी करू लागलेत. आपल्याकडं बॉलीवुड गाण्यांना पाहून कॉपी करुन रिल्स बनवणारे काही नवे नाहीत. अशांची संख्याही इंटरनेटवर काही कमी नाही, पण या काकानी जे काही डान्सच्या नावाखाली केलंयं त्याला तोड नाही. अवघ्या 17 सेकंदात आपल्या चारशे स्वेअर फूटचा कंबरेचा कमरा असा काही हलवलायं. ज्यामुळे सगळा लोणावळा खंडाळा हलून गेलायं. ते काय झालं काकांना अशी हुबकी येण्या मागे काही तरी मोठी स्टोरी आहे. दोघे काका एकमेकांचे साडू लागतायतं. त्यांच्या दोघांच्या गृहमंत्री गेल्यात माहेरला.
आता आपल्याला कार्यक्रम करता येईल. या आशेनं काकांचा हा डान्स सुरू आहे तर. काकांनी मस्त पैकी माहोल केलाय. थंडगार कोल्ड ड्रींक्स आणि घशाला कोरड पडू नये म्हणून छान सोय करून घेतलीय. दोन चार कोंबड्यांना आजच फडशा पाडण्याचं नियोजन केलंयं. काकांच्या या सगळ्या आयोजनाची तयारीही जय्यत झाल्यानं आता थांबवायला काकांना खुद्द मिसेस गृहमंत्री सरकार येणार नाहीत. याची खात्री त्याना झालीय. काही लोकांना बायको माहेरी जाण्याचा विचार जरी ऐकला तरीही खुलून येतं. त्यांना डान्स करण्यासाठी असं आतून स्फूरण येत जातंयं. डान्स करताना काकांच्या ठेक्याचं काही विचारूच नका. असते एकेएकेकाची सवयं. डान्स करण्यामागच्या या भन्नाट स्टाईलचे जबरा फॅन नेटकरी झालेत. नाचता येईना अंगण वाकडे, अशी म्हण असतेयं बघा. काकानी वाकड्या अंगणातच सगळं डान्स परफॉर्म करुन सरळ सरळ कॉमेडीचा किस्सा केलाय, त्यामुळे हसू आवरंतं नाहीये. काही लोकांना अशी डान्सची खास खाज असतेय. या वयात कमी नाचावं, उगी पाय मोडला, हाडं तुटली तर भरून कोण देणार, पण काकी माहेरी गेल्याचा आनंद आहे तो कसा काय व्यक्त करणार म्हणून त्याचा सगळा आनंद असा ओतप्रोत ओसांडून वाहत चाललेला आहे.
काकी घरी असल्या की जास्त मित्रमंडळींमध्ये बसता येत नाही परंतु आज स्वतःच स्वतःचा ठेका धरलेला पाहून मित्रमंडळींनीसुद्धा काकांना फुल्ल दाद दिलीयं. असंच बायकोला माहेरी पाठवत जा आणि धमाल करत रहा, असा जणू इशाराच केलाय. काहीही म्हणा बेली डान्सच्या या अतरंगीपणाची फॅन्स काका स्वतःच इतके झालेयत की त्यांना ह्या अतरंगी स्टेप्स केल्याशिवाय राहवलं नाही. काकांनी वाऱ्यावर कंबर हलवत अतरंगी बेली डान्स केला आहे. आणि काकांच्या ह्या अतरंगी स्टेप्स पाहून खुद्द नोरा पण ३-४ वेळा ग्रँड सॅल्यूट देईल. असो तर जैसी जिसकी सोच, असं म्हणून काकांना त्यांच्या त्यांच्या मौज मजेत जगायला मोकळं सोडून देऊ. असे किडे कुणाला नसतात. बऱ्याचदा ते आपल्याला लग्न कार्यात, हळदीला, वाढदिवसाला पार्ट्यांमध्ये बाहेर येतात. आपण एकतर असे डान्स सहन तरी करायचं, त्यांचा आनंद घ्यायचा किंवा मग अशा डान्सला एका सुंदर कॅमेऱ्यात कैद करून व्हायरल तरी करायचं. म्हणजे काका तर फेमस होतीलच. पण इतरांचंही निव्वळ मनोरंजन होईल. आणि अशा डान्स कीडे असणाऱ्यांच्या बायकांनाही आपल्या नवऱ्यांच्या करामती कळतील.
बघा व्हिडीओ :