Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दोन्ही बहिणींनी वेगळ्या स्टाईलमध्ये गायलेले गाणे होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या दोन्ही बहिणींनी वेगळ्या स्टाईलमध्ये गायलेले गाणे होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

म्हणता म्हणता एप्रिल महिना सुद्धा संपला. उन्हाच्या झळांनी आणि करोनाच्या बातम्यांनी आपण पुरते पोळून निघालो या काळात. पण जेव्हा जेव्हा आपल्या मनाला कष्टातून जावं लागतं तेव्हा तेव्हा संगीत आपल्याला खराब मनस्थितीतुन बाहेर पडण्यास मदत करतं. बरं संगीताला भाषेचं बंधनही नसतं. अमर्याद असणारी ही कला माणसाने तयार केलेल्या सगळ्या सीमांच्या पलीकडे जाते.

आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे एक वायरल व्हिडियो. तुम्ही म्हणाल दुसरं काही पाहता की नाही. की दिवसभर आपले वायरल व्हिडियोज बघत असता. तर तसं नाहीये. हा व्हिडियो आपल्या टीमने खूप आधीच पाहिला होता. आम्हाला खूप आवडला ही होता. पण योग्य वेळेसाठी आपली टीम थांबली होती. ती योग्य वेळ आली म्हणून हा लेख प्रपंच.

तर हा लेख प्रपंच ज्या व्हिडियो साठी होतो आहे, तो व्हिडियो आहे नांदी सिस्टर्स चा. होय अंतरा आणि अंकिता या सुप्रसिद्ध बहिणींचा. त्यांनी गेल्या एप्रिल महिन्यात ३० तारखेला एक व्हिडियो प्रसिद्ध केला होता. दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र दिन असल्याने त्यांनी हा व्हिडियो खासकरून महाराष्ट्रातील मराठी चाहत्यांसाठी केला होता.

त्यामुळे याचा त्यांच्या चाहत्यांना अभिमान वाटला होता. आपली टीमही त्यात सामील होती. मागील वर्षी क’रोनाच्या अगम्य संकटात होरपळून निघत असताना महाराष्ट्र दिनानिमित्त आलेला हा व्हिडियो अनेक मनांवर फुंकर घालून गेला होता. यात आपल्याला अंतरा आणि अंकिता या दोन्ही बहिणी ‘रेशमाच्या रेघांनी’ हे सदाबहार गाणं सादर केलं होतं. हे सदाबहार गाणं आपल्या सगळ्यांना आदरणीय असलेल्या आशा भोसले यांनी गायलं आहे. नांदी सिस्टर्स नी सुद्धा हे गाणं अतिशय उत्तमरीतीने सादर केलं आहे.

सोबतच ही मराठमोळी लावणी सादर करताना त्यांनी मराठमोळा पेहराव केल्याने हा व्हिडियो पूर्णतः महाराष्ट्रीय वाटतो.मूळच्या असामी असलेल्या या दोन्ही बहिणी, पण त्यांचे मराठी उच्चार मात्र कौतुकास्पद असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्याला पूजनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करणारं गाणंही सादर केलं होतं. त्यातही त्यांनी उत्तम सादरीकरण केलं होतं. त्या विविध भाषांमध्ये गात असतात. पण मराठीतील त्यांची गाणी विशेष प्रसिद्ध आहेत. अशा या एका अर्थाने मराठमोळ्या उदयोन्मुख गायिकांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपल्याला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. तसेच नांदी सिस्टर्स यांचं हे गाणं आणि इतर मराठी गाणी कशी वाटली हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपली टीम दररोज आपल्या साठी नवनवीन लेख घेऊन येत असते त्यांचाही आनंद घ्या. धन्यवाद !!!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *