जुगलबंदी हा भारताच्या लोककलेतील एक विशेष मनोरंजन असणारा प्रकार आहे. लोककलेनंतर हा प्रकार विविध कलेत रुजू झाला. आणि आता तर मित्राच्या लग्नात ना-गीण डान्स करतानासुद्धा आपण जुगलबंदी करतो. म्हणजे एखादा जोडीदार समोर नाचायला नसेल तर मजा येत नाही, म्हणून अनेक लोक नाचायचे टाळतात. भजनात जुगलबंदी असते, तमाशात जुगलबंदी असते एवढंच काय तर शास्त्रीय संगीतात सुध्दा जुगलबंदी असते. जुगलबंदी शिवाय कुठल्याच कार्यक्रमाला मजा नसते. आताची जुगलबंदी आणि जुनी जुगलबंदी यात फरक असतोय. म्हणजे जुने म्हातारे जेव्हा लेझीम किंवा गाण्याच्या तालावर जुगलबंदी करून नाचतात ती जुगलबंदी आजकाल विशेष बघायला भेटत नसली तरीही गावाकडे जत्रा, उरूस किंवा देवाच्या काही मोजक्या कार्यक्रमांना ही जुगलबंदी बघायला भेटतेच. एखादा वारकरी जेव्हा टाळ-मृदंगाच्या तालात तल्लीन होऊन जातो, देहभान विसरून जातो. त्याच प्रकारे गावाकडची ही जुनी म्हातारी ढोल-हलगी-डफडं आणि लेझीम याच्या तालावर एकदम तल्लीन होऊन जातात.
नृत्य कुठलंही असो गावातली जुनी खोंड म्हणजे म्हातारी म्हंजी कशाच्या तालावर नाचू शकतात. आता काहींना नवीन आलेले ही डीजे वगैरे प्रकार आवडत नसले तरी ते वाजायला लागल्यावर नाचायला हे सगळ्यात पुढे असतात. अशाच एक भन्नाट आणि कॉमेडी असणाऱ्या जुगलबंदीचा एक व्हिडिओ आमच्या हाती लागलेला आहे. साठी ओलांडलेल्या या दोन्ही म्हाताऱ्या बाबांनी असा काही डान्स केला आहे की, तो पाहून तुम्ही आधी चकित व्हाल आणि मग हसून हसून लोटपोट व्हाल. जुन्या लोकांच्या नाचण्याची अजून एक खासियत असते. ते एकदम तल्लीन हपून डान्स करतात. जसं ढोलकीचा आवाज आला की, एखादा लावणीचा फॅन असलेला माणूस बरोब्बर त्या ढोलकीच्या दिशेने जाऊ लागतो. तसेच गावाकडची ही म्हातारी जिकडून डीजेचा आवाज येतो, तिकडे जाऊ लागतात. आणि तिथं का एखादा आपला नाचणारा जोडीदार भेटला मंग झालीच जुगलबंदी सुरू…
भल्याभल्याना जे जमत नाही. ते या म्हाताऱ्यांना जमत. ते म्हणजे तल्लीन होऊन नाचणं. आता एखादी स्पर्धा असते, तेव्हा तेथील स्पर्धक मार्क्स मिळवण्यासाठी नाचत असतात. तर काही नाचणारे लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नाचत असतात आणि टाळ्या मिळवत असतात. मात्र स्वतःसाठी नाचणारी या व्हिडीओतील म्हातारी आपलं मनोरंजनही करतात आणि टाळ्याही मिळवतात.
आता या व्हिडीओत गाणं कोणतं आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येत नाही मात्र ए गाणं उडत्या चालीच आहे हे लक्षात येतं. भारी गोष्ट म्हणजे या व्हिडीओच्या सुरुवातीला साठी ओलांडलेल्या एका आजोबांनी नाचताना पायाच्या ज्या करामती दाखवल्या आहेत त्या आपल्याला तरुण वयातही जमणार नाहीत. तर हा भारी डान्स बघा आणि चालू वयातही असाच जोश मिळवण्याचा प्रयत्न करा. आता हा व्हिडीओ बघा आणि मजा घ्या, काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :