Breaking News
Home / मनोरंजन / ह्या दोन महाभागांनी हळदीत केलेला हा जबराट नागीण डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हि अनोखी जु’गलबंदी

ह्या दोन महाभागांनी हळदीत केलेला हा जबराट नागीण डान्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हि अनोखी जु’गलबंदी

समजा तुम्ही भारताच्या एखाद्या राज्यात राहता, जिथे प्रादेशिक भाषा बोलली जाते. आणि तुम्ही फिरण्यासाठी एखाद्या दुसऱ्या राज्यात गेलात. तिथली भाषा तुम्हाला येत नाही. मात्र तिथली एकमेव गोष्ट तुम्हाला माहिती असेल. ती म्हणजे नागीण डान्स. तुम्ही अख्ख्या भारतात कुठेही फिरा हो… नागीण डान्स हा भारतात जन्मलेल्या आणि भारतात राहत असणाऱ्या प्रत्येकाला माहिती असतोच. बॉलिवूडमुळे गावखेड्यात पोहोचलेला हा डान्स इस देश का बच्चा बच्चा जानता है. नागीण डान्स हा घराघरात पोहोचलेला डान्स आहे. लग्न असो, गॅदरिंग असो, वरात असो वा जत्रा असो… सगळीकडे एक गाणं कायम लावलं जातं आणि एक डान्स कायम केला जातो. हा डान्स केल्याशिवाय लोकांचं मनही भरत नाही. कार्यक्रम कोणताही असो… नागीण डान्स तर झालाच पाहिजे ना भावा… आता नागीण डान्स हा प्रामुख्याने जागरण गोंधळ आणि लग्नाच्या वरातीत केला जातो. फक्त नागीण डान्स करताना एक महत्वाची अट असते. ती म्हणजे हा डान्स करणाऱ्याला आधी सोमरस प्यावा लागतो. आवडीने आणि मनसोक्तपणे सोमरस पिल्यावर मग काय नागीण डान्स करणारे मागे हटत नाहीत.

डीजे बँड सगळं बंद झालं तरी यांचा नागीण डान्स चालूच असतो. आता आमच्या हाती असाच एक नागीण डान्सचा व्हिडीओ आला आहे. असा हा भयंकर नागीण डान्स तुम्ही यापूर्वी नक्कीच कधीच पहिला नसणार. म्हणजे सर्वसाधारणपणे नागीण डान्स इतका बेकार असतो की, नवरदेवाला पण वाटतं, आपले असे मित्र आहेत हे सासरवाडीत आधी माहिती असतं तर आपलं लग्नच नसतं लागलं. पण आजच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओत चक्क नवरदेवच यांना नागीण डान्स करायला प्रवृत्त करत आहे, त्यांचा जोश वाढवत आहे. आता हे नागीण डान्स करणारे 2 जण आहेत. एकंदरीत त्यांचा डान्स तसेच वागणं बघून त्यांनी भरपूर घेतलेली आहे आणि त्यांना चढलेली आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. माती, चिखल, पाणी, लोक, पाव्हने असं काहीही न बघता या दोघांनी खतरनाक डान्स केला आहे.

एकमेकांना डसने, एकमेकांच्या अंगावरून दुसऱ्या बाजूला जाणे पाण्यात उड्या मारणे, असे एक ना अनेक अतरंगी प्रकार त्यांनी नागीण डान्समध्ये केले आहेत. आम्ही खात्रीने सांगू शकतो की, असा नागीण डान्स तुम्ही यापूर्वी कधीच आणि कुठेच पहिला नसेल. तुम्ही स्वभावाने कितीही गंभीर बसले तरी हा व्हिडीओ बघून तुम्ही हसणार, हे निश्चित आहे. सध्या व्हायरल होणारा हा नागीण डान्स व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे माहिती नसलं तरी हा व्हिडीओ तुम्हाला खळखळून हसवणारा आहे. या 2 महाभाग असणाऱ्या नागांचा हा डान्स पाहून नेटकरी हसून लोटपोट होत आहेत. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *