आपण भारतीय लोकं हे उत्सव प्रिय असतो हे सर्वश्रुत आहेच. किंबहुना आपल्या उत्सवांमधून झळकणारा आपला उत्साह हा सुद्धा अवर्णनीय असतो. यात सगळ्यांत महत्वाचा मुद्दा असा की कोणतेही सण, उत्सव अथवा आनंदाचे प्रसंग आपण आपापल्या परीने साजरे करत असतो. मग हे क्षण साजरा करणारा श्रीमंत, ग’रीब वा मध्यमवर्गीय कोणीही असो. त्यातही कुठची वरात वगैरे असेल तर विचारायलाच नको. ताल धरता येत असेल वा नसेल, पण या वरातीत नाचण्याची मजा काही औरच. अनेक जणं तर आपल्या मित्र मैत्रिणींना ‘तू लवकर लग्न कर, मला तुझ्या वरातीत नाचायचं आहे’ असं गंमतीत म्हणत असतात. तसेच या वरातीत नाचणाऱ्यांची तऱ्हा काय वर्णावी.
एका पेक्षा एक. कधी ना’गीन डान्स, तर कधी नुसतेच हातवारे करत डान्स, काहींचा व्यायाम केल्या सारखा डान्स तर काहींचा फक्त मनातल्या मनातला डान्स. एकेक उदाहरणं म्हणजे लाजवाब. मग त्यातही वयोमानानुसार आणि त्या लग्नातील जबाबदरीनुसार नाचणारे वेगवेगळे असतात. त्याविषयी पुन्हा कधी तरी. आज आमच्या टीमला एक वायरल व्हिडीओ नजरेस पडला आणि त्यावरचा लेख आपल्या भेटीस आणावा, असं वाटलं. हा व्हिडिओ आहे एका गावातला. त्या गावात चालली आहे वरात. यी कोणाची, कधी वगैरे प्रश्न गौण ठरतात जेव्हा या व्हिडिओतली दोन मुलं नाचायला सुरुवात करतात. बरं त्यांचा उत्साह काय वर्णावा. त्याहूनही काय वर्णावा तो त्यांचा डान्स. व्हिडिओत अथ पासून इति पर्यंत आपण केवळ या लहानग्यांच्या डान्स ची मजाचं घेत राहतो. त्यांची देहबोली, चेहऱ्यावरचे भाव अगदी लाजवाब. बरं आजूबाजूला ही बाकीची लहान मुलं आपल्याला दिसतात पण त्यांच्या पैकी कोणीच नाचत नाही.
त्यामुळे या दोघांच्या उत्साहाचं कौतुक वाटतं. या लहान नकळत्या वयात ते नाचण्याची घेत असलेली मजा आपल्या लहानपणीच्या आठवणी जागृत करते हे निश्चित. कारण या वयात कळतं ते फक्त आनंद घेणं आणि इतरांच्या विचारांची फारशी पर्वा न करणं. कदाचित त्याचमुळे त्या वयात निखळ आनंद घेता येतो. असो. सध्या आपण असे नाचू शकत असू की नाही माहीत नाही, पण या मुलांना पाहून आपण आतल्या आत खुश होतो हे नक्की. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पाहून घ्या. आणि व्हिडीओ पाहून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मराठी गप्पावरील वायरल व्हिडीओज विषयी लेख वाचण्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शन चा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. तुम्हाला वैविध्यपूर्ण लेख वाचायला मिळतील.
बघा व्हिडीओ :