Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरदेवाने आपल्या होणाऱ्या बायकोसाठी केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या नवरदेवाने आपल्या होणाऱ्या बायकोसाठी केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

लग्नाचे वायरल व्हिडियोज म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता विषय. या व्हिडियोज विषयीचे लेख आपली टीम सातत्याने लिहीत असते. त्यानिमित्ताने आपण एका नवीन जोडप्याच्या आनंदात ही सहभागी होत असतो. यात एक गोष्ट आपण सगळ्यांनी बघितली असेल ती म्हणजे अनेक वेळेस वधू ही वरासाठी आणि वर हा वधुसाठी डान्स करताना दिसत असतात. आज आपल्या टीमने एक असाच व्हिडियो पाहिला आहे ज्यात स्वतः नवरदेव आपल्या होणाऱ्या वधू साठी छान डान्स करताना दिसतो.

या व्हिडियोत आपल्याला भेटतात ते हरहुन्नरी कलाकार ऋषिकेश पाटील. ऋषिकेश म्हणजे कलासक्त व्यक्तीमत्व. कविता, अभिनय, डान्स या सगळ्यांत त्यांना गती. प्रत्येक कलाकाराप्रमाणे स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम त्यांनी निवडलं. हे माध्यम म्हणजे सोशल मीडियातील युट्युब. त्यांनी स्वतःच्या चॅनेलवर अनेक उत्तमोत्तम कविता शेअर केलेल्या आहेत. तसेच त्यांच्या आयुष्यातील काही बाबी सुदधा आपल्याला बघायला मिळतात. यातील एक व्हिडियो आहे त्यांच्या हळदीचा.

या व्हिडियोत ऋषिकेश आणि नववधू यामिनी ताई यांच्या हळदीचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो. हळदीचा कार्यक्रम म्हंटला म्हणजे डान्स आलाच. त्यात ऋषिकेश यांना डान्सची आवड म्हंटल्यावर ते ही संधी दवडत नाहीत. त्यांच्या पत्नीविषयी त्यांना जे वाटतं ते या डान्स मधून ते व्यक्त करतात. कविमनाचे ऋषिकेश डान्सच्या सुरुवातीपासून छान छान स्टेप्स करतात. गाणंही उत्तम निवडलेलं असतं. ‘तेरे बिन’ हे सिंबा चित्रपटातलं गाणं. शांत, प्रेमळ आणि चट्कन ओठांवर रुळणारं. या गाण्यावर डान्सला सुरुवात करताना स्लो मोशन डान्स स्टेप्स नी सुरुवात करतात. पुढे मात्र अगदी योग्य गती पकडत त्यांचा डान्स सुरू होतो. वहिनींच्या अवतीभावती डान्स करत असतानाचा त्यांचा अंदाज अगदी शाह रुख खान सरांची आठवण करून घ्यावा असा वाटतो. त्यांच्या डान्सवर वहिनी फिदा असतात हे तर कळत असतंच. तसेच उपस्थित सगळी मंडळीसुद्धा आनंदित झालेली दिसून येतात. कॅमेऱ्याच्या पाठीमागून सतत टाळ्या शिट्या वाजत असतात. ऋषिकेश यांना प्रोत्साहन मिळत असत.

एक दादा तर आपल्याला व्हिडियोत डाव्या बाजूला उभे असलेले दिसून येतात. त्यांच्या डोळ्यात असणारे कौतुकाचे भाव न विसरता येणारे. पण अर्थात आपल्या ऋषिकेश यांचं लक्ष मात्र त्यांच्या पत्नीवर खिळलेलं असतं. त्याही अगदी कौतुकाने ऋषिकेश यांना दाद देत असतात. मधेच खुदकन हसत असतात. खासकरून ऋषिकेश गुडघ्यावर बसून एक स्टेप करतात तेव्हा हे लाजून हसणं दिसून येतं. तसेच या व्हिडियोत रंगत भरते जेव्हा दोघेही एक छोटीशी स्टेप करतात. मस्त वाटते जोडी. पुढेही काही वेळ ऋषिकेश डान्स स्टेप्स करतात आणि मग थांबतात. तेव्हा जो टाळ्यांचा ओघ येतो त्यात आपणही सामील असतो. ऋषिकेश यांचं कौतुक वाटतं. आपल्या टीमला उदयोन्मुख कलाकारांचे कौतुक नेहमीच वाटत आलेलं आहे. यात आता ऋषिकेश यांची भर पडली आहे. येत्या काळातही ऋषिकेश उत्तमोत्तम कविता, अभिनय आणि डान्स व्हिडियोज आपल्या सोबत शेअर करत राहतील हे नक्की. आपल्या टीमकडून त्यांच्या सांसारिक वाटचालीस आणि कलाक्षेत्रातील वाटचालीसाठी सुद्धा मनःपूर्वक शुभेच्छा !!

आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. उदयोन्मुख कलाकार, वायरल व्हिडियोज आणि बऱ्याच विविध विषयांवर आपली टीम लिहीत असते. आपणही वाचक म्हणून आपल्या टीमला आपल्या प्रतिक्रिया कळवत असता. लेख शेअर करत असता. प्रोत्साहन देत असता. या सगळ्यांमुळे आम्हाला ही नवनवीन विषयांवर लेखन करण्याची ऊर्जा मिळत राहते. तेव्हा येत्या काळात ही आपलं प्रेम आमच्या टीमवर कायम राहील हे नक्की. लोभ असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *