Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरदेवाने लग्नात वधूसाठी असं काही स्पेशिअल केलं कि व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या नवरदेवाने लग्नात वधूसाठी असं काही स्पेशिअल केलं कि व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

गेल्या वर्षी मार्च महिन्यात अनेकांची लग्न लॉकडाऊन मुळे रखडली होती. पुढे अनलॉक सुरू झाल्यावर आणि सरकार कडून परवानगी मिळाल्यावर ही ‘पेंडिंग’ लग्न पार पडली. अनेकांची लग्न जुळली आणि पारही पडली. अभिनेत्री सई लोकूरचं लग्न म्हणजे याचं उत्तम उदाहरण. तिच्या प्रमाणेच अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी या काळात लग्नकार्य करून घेतली. इतर माध्यमांप्रमाणे आपल्या मराठी गप्पाच्या टीमने आपल्याला या बातम्यांनी सतत अपडेट ठेवलं होतं. पण एक गोष्ट जाणवली की अशी काही लग्नही आहेत जी वायरल व्हिडियोज च्या माध्यमातून लोकप्रिय झाली आहेत, पण ती आहेत सामान्य व्यक्तींची. आमच्या टीमने मग त्यांच्या वरही काही लेख लिहिता येतील का हे पाहिलं आणि त्यातल्या एका वायरल व्हिडियो वरचा हा लेख आज आपल्या समोर सादर करतो आहोत.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा लग्नमंचकावर नवरदेव हातात माईक घेऊन उभा असतो. आता नवरदेव प्रपोज करणार, गाणं म्हणणार की अजून काही असं आपल्याला वाटतं आणि दुसरी शक्यता खरी ठरते. नवरदेव आपल्या सुरेल आवाजात गाणं सुरू करतो. दिलवाले या शाह रुख खान यांच्या चित्रपटातील हे गाणं असतं. ‘कभी ना कहना अलविदा’ असे या गाण्याचे बोल. अरिजित सिंग यांनी गायलेलं हे गाणं गाता गाता तो मंचकावरन खाली उतरून नववधू कडे येतो. तिला हॉल च्या मध्ये आणतो आणि एका पायावर बसून तिला प्रपोज केल्यासारखं गाणं म्हणतो. जेव्हा गाणं संपतं तेव्हा सगळे उपस्थित, टाळ्यांच्या गडगडाटात नवरदेवाच्या कलेचं कौतुक करतात. पण एवढ्यावरच हा व्हिडियो संपत नाही. अजून एक गाणं सादर व्हायचं असतं. आधीचं गाणं अरिजित सिंग यांनी गायलेलं असतं. दुसरं गाणंही अरिजित सिंग यांचंच असतं. ‘मेरे दिल मुबारक हो’ हे या गाण्याचे बोल. यावेळी उपस्थित सगळे जण अगदी सुरुवातीपासून या गाण्यात सामील होतात, दाद देत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नवरदेवाबद्दल असलेलं कौतुक ओसंडून वाहत असतं. अनेक जण आपल्या फोन मध्ये हा परफॉर्मन्स कैद करत असतात आणि काही वेळात हा व्हिडीओ संपतो.

या व्हिडियोत असलेले नवरदेव म्हणजे पंकज सोनी आणि त्यांची नववधू म्हणजे मान्या. हा व्हिडीओ या दोघांच्या युट्युब चॅनेल वर पाहता येतो. या चॅनेल वरून पंकज यांच्या सुरेल आवाजातील इतर गाणीही ऐकता येतात. तसेच पंकज, मान्या आणि दोघांच्या लेकीबरोबर असलेले व्हिडियो ही धमाल आणतात. पंकज यांचा आवाज इतका उत्तम आहे की येत्या काळात आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या सुरेल आवाजातील गाणी ऐकायला आवडतील. पंकज यांना त्यांच्या गायक म्हणून असलेल्या कलाकारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच पंकज आणि मान्या यांना त्यांच्या पुढील एकत्र वाटचालीसाठी आणि त्यांच्या सुखी संसारासाठी मनापासून शुभेच्छा !

आपल्याला हा लेख आवडला असल्यास कमेंट्स सेक्शन मध्ये तसं लिहायला विसरू नका. तसेच नेहमीप्रमाणे हा लेख, सोशल मीडियावर शेअर ही करा. तसेच आमच्या वे’बसाई’टवर असलेले इतर लेखही आवर्जून वाचा. आपल्या वाढत्या पाठिंब्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *