Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरदेवाने स्वत:च्या लग्नात केला हटके डान्स, बघा हा अतरंगी व्हिडिओ

ह्या नवरदेवाने स्वत:च्या लग्नात केला हटके डान्स, बघा हा अतरंगी व्हिडिओ

उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग ही म्हण तर आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका उतावळ्या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. पण हा नवरा बाशिंग बांधण्यासाठी नव्हे तर भलत्याच कारणासाठी उतावळा झाला आहे. लग्नाच्या विधी सोडून त्याचा उत्साह दुसऱ्याच ठिकाणी दिसत होता.

लग्नाच्या वरातीत तुम्ही पाहिलं असेल नवरदेवाचा उत्साह इतका असतो की तोसुद्धा नाचताना दिसतो. कधी मित्रांसोबत, तर कधी घोड्यावर बसल्या बसल्या नाचतो. नवरदेवापेक्षा उत्साही तर त्याचे मित्र असतात, जे त्याला खांद्यावर घेऊन नाचतात. काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी मागच्या लग्नसराईत सोशल मीडियावर लग्नाचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले, ज्यात नवरदेवाला घोड्यासकटच उचलण्यात आलं, तर कधी घोडा नवरदेवाला घेऊन पळाला. तर कधी नवरदेवाची नाचण्याच्या नादात फजिती झाली. असे नवरदेवाचे एक ना अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जबरदस्त नवरदेवाचा व्हिडीओ आमच्याकडे आला.

आता हा नवरदेव आणि त्याचे यंगराट चाळे पाहून आम्ही हसलो नाही उलट त्या नवरदेवाचे कौतुक करू लागलो. सर्वसाधारणपणे नवरदेवाची नाचता नाचता पॅन्ट फिटली, नवरदेवाची दा’रू पिल्याने फजिती झाली किंवा नवरदेव घोड्यावरून पडला, असे हास्यास्पद व्हिडीओ पाहिलेले होते. मात्र भर शुद्धीत असूनही एका नवरदेवाने असली भारी गोष्ट केली आहे, ती पाहून तुम्हीही कौतुकच कराल. तर विषय असाय की, लग्नाऐवजी भलत्याच गोष्टीसाठी उतावळे झालेले अनेक नवरदेव आपण पाहिले असले तरी या अनोख्या गोष्टीसाठी उतावळा झालेल्या या नवरदेवाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. या नवरदेवाने लग्नात अक्षरशः धिंगाणा घातला आहे. धिंगाणा म्हणजे दा’रू पिऊन वगैरे नाही हो…

तर या नवरदेवाचे हे अनोखे आणि भारी असे रूप पाहून नवरीसोबत इतर पाहुणेही शॉक झाले. नवरीने त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण नवरदेव इतका सैराट झाला होता की तो कुणाचंच काही ऐकण्याच्या तयारीत नव्हता. लग्न गेलं उडत आता मीच नाचणार, मला कोण अडवतो… असंच त्याचं वागणं होतं.

आता नेमकं या नवरदेवाने असं काय केलं आहे हे पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. एरवी लग्नाच्या दिवशी नवरा आणि नवरी दोघंही एकमेकांना पाहण्यासाठी खूप उत्सुक असतात. एकमेकांसमोर येताच जरी तोंडाने एकमेकांशी बोलत नसले तर त्यांच्या नजरा एकमेकांशी बोलत असतात. एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसणं, हळूच इशारे करणं, लाजणं असेच रोमँटिक क्षण ते यावेळी अनुभवत असतात. पण लग्नाच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत असं काहीच दिसलं नाही. नवरदेव नवरीबाईसोबत रोमँटिक होणं सोडा उलट तो लग्न सोडून डान्स करू लागला. आणि त्याने असा काही डान्स केली की सगळे कौतुक करू लागले.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.