सध्या मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला आहे. एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांची जणू रांगच लागली आहे. त्यात आता अशा एका चित्रपटाची भर पडली आहे जो हिंदी भाषेतील असला तरी त्याची जवळपास संपूर्ण टीम मराठी आहे. होय, तुम्ही बरोबर ओळखलंत तो चित्रपट म्हणजे झुंड होय. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि म्युझिकने तर सगळा माहोल ता’पवायला सुरूवात केली होती. आता अजय अतुल यांचं संगीत आणि नागराज मंजुळे यांचा सिनेमा असल्यावर अजून काय होणार आहे! अर्थातच धमाल आणि मस्ती !
अर्थात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाला प्रतिसाद देखील चांगला मिळत आहे. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘सैराट’च्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत. पुन्हा एकदा म्हणायचं कारण, या सिनेमाने आपल्या मनात अशी काही जागा तयार केली आहे की कधी ना कधी या सिनेमाची आठवण ही येतेच. यासाठी सगळ्यांत जास्त कारणीभूत ठरतात ती या सिनेमाची गाणी ! आमची टीमही या गाण्यांची चाहती आहेच. आता तर झुंड प्रदर्शित झाला आहे म्हंटल्यावर आमची टीम पुन्हा सैराट मधल्या गाण्यांकडे वळली आहे.
त्यातूनच आम्हाला आज असा एक व्हिडियो गवसला ज्याने आमचं जबरदस्त मनोरंजन केलं. आणि खऱ्या अर्थाने मनोरंजन केलं हा ! कारण या व्हिडियोत आपल्याला सैराटची गाणी जशी ऐकायला मिळतात तसाच एका नवऱ्या मुलाचा जबरदस्त डान्स ही बघायला मिळतो. खरं तर हा व्हिडियो तसा एखादं वर्ष आधीचा असावा. पण त्यात या नवरदेवाने केलेल्या डान्सने असे काही रंग भरले आहेत की विचारू नका. त्याने या व्हिडियोत, ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर डान्स केला आहे. आधीच ते गाणं जबरदस्त उर्जेचं आहे. त्यात या नवरदेवाचा उत्साह मिसळल्याने वर उल्लेख केलेलं अप्रतिम मनोरंजन होतं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला हा नवरदेव मंडपात उभा दिसून येतो. आजूबाजूला नातेवाईक, मित्रमंडळी आणि चिल्लीपील्ली असतात. गाणं सुरू होतं आणि हा नवरदेव एकेक भन्नाट स्टेप्स करायला लागतो. त्याच्या डान्सचं वैशिष्ट्य असं की गाण्यातील शब्दांनुसार त्याच्या बहुतांश स्टेप्स होत असतात. त्यात त्याचा अभिनय आपल्याला हसवून सोडतो. त्यामुळे मस्त डान्स आणि हसवणारा अभिनय यांमुळे पूर्ण व्हिडियो बघताना मजा येते. बरं डान्स करणाऱ्या व्यक्तींना सहसा इतरांना ही नाचावयाला आवडतं.
हे नवरदेव ही यात आघाडीवर असतात. प्रत्येकाला बोलवून बोलवून डान्स करतात. सरतेशेवटी तर आजूबाजूचे सगळे दादा, काका, चिल्लीपिल्ली येऊन नाचायला लागतात. इतके की काही क्षणांसाठी नवरदेव गुडूप होऊन जातात. पण बहुतेकवेळा ही सगळी मंडळी पाठीमागे राहून नवरदेवाला नाचण्याचा मान देत असतात. त्या संधीचा फायदा उचलत वर उल्लेख केल्याप्रमाणे नवरदेव ही भन्नाट स्टेप्स करत नाचत असतो. त्यातही ‘समद्या गावाला झालीया माझ्या लगनाची घाई’ या वाक्यावरची त्याची स्टेप अगदी आवडून जाते. आपणही हा डान्स बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच. त्यातील काही स्टेप्स आपल्याला ही आवडल्या असतील. पण आपण हा डान्स व्हिडियो अजून बघितला नसेल तर जरूर बघा. आपल्याला नक्की आवडून जाईल. आपल्या वाचकांच्या सुविधेसाठी आमच्या टीमकडून तो व्हिडियो खाली शेअर केला जाईलच. त्याचा जरूर आनंद घ्या.
बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :