Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरदेवाला कुणीतरी आवरा, लग्न झाल्याचा उत्साहात ट्रॅक्टरवरच केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

ह्या नवरदेवाला कुणीतरी आवरा, लग्न झाल्याचा उत्साहात ट्रॅक्टरवरच केला अतरंगी डान्स, पाहून हसू आवरणार नाही

लग्न म्हणजे एक सोहळाच असतो. प्रत्येक सोहळ्याप्रमाणे या सोहळ्यातही रंग भरण्याचं काम केलं जातं ते उत्साही व्यक्तींकडून. मग ते नवरा नवरीचं मंडपात येणं असो, वरात असो वा संगीत सोहळा. ही उत्साही मंडळी सगळ्यांत पुढे असतात आणि अगदी मजा मजा करतात. यावेळी सहसा नवरा नवरी हे उत्साही असेल तरी सगळ्या विधींमध्ये व्यस्त असतात. तसेच लग्न हा जिवनातला एक मोठा टप्पा असतो, त्याच वेगळं टेन्शन असतंच ना. पण यातही काही उत्साही नवरा नवरी असतात जी धमाल मजा मस्ती करून घेतात. आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोतून तर याची खात्रीच पटते. हा व्हिडियो आहे तीन वर्षांपूर्वीचा. पण यात जी धमाल आहे ना तिच्यामुळे आजही आपल्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर येतेच येते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा लक्षात येतं की हा एका वरातीचा व्हिडियो आहे. या वरातीत ट्रॅक्टरवर लायटिंग वगैरे ची व्यवस्था केलेली आहे.

बरं वरात म्हंटली की नाचणारे सगळे उत्साही वर्हाडी आलेच. पण या वर्हाड्यांमध्ये चक्क नवरदेवच ठाण मांडून बसला असेल तर? होय, हा अख्खा व्हिडियोच त्यावर आधारित आहे. व्हिडियो सुरु होतो तेव्हाच त्या ट्रॅक्टरच्या टपावर सुटबुटात असलेला नवरदेव आपल्याला दिसून येतो. जवळच गाणं वाजत असतं, त्यावर त्याचा डान्स चालू असतो. ‘सात समंदर पार मैं तेरे पिछे पिछे आ गई’ हे गाणं सुरू असतं. आता नवरदेवच नाचतोय म्हंटल्यावर वरात तरी पूढे कशी जाणार. त्यामुळे काही जण येऊन त्याला ट्रॅक्टर वरून खाली उतरवायचा प्रयत्न करतात. पण पठ्ठ्या ऐकेल तर शपथ. कारण माहिती नाही पण त्याच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. बरं आता तो ऐकत नसतो तेवढ्यात गाणं बदलतं. मग तर बाबा, त्याच्यातला डान्सर बाहेर येतो. तुम्ही ‘मेरे बायांका नाम’ हे सुप्रसिद्ध गाणं ऐकलं असेलच. ते गाणं ऐकून अंग न हललेला इसम विरळाच असेल. इथे तर उत्सवमूर्ती असलेला नवरदेव तर रंगातच येतो. विविध हातवारे करत, कधी बसून, तर कधी उभं राहून असं काय काय विचित्र स्टेप्स करत त्याचा डान्स चालू असतो.

पण खरं सांगायचं तर या सगळ्याची आपण मजा घेत असतो. तो नाचत असताना त्याच्या पुढ्यात बसलेली दोन मंडळी सुद्धा नाचत असतात. त्यांचा आणि नवरदेवाचा डान्स तेवढा मस्त चालू असतो. अजून एक जण येत ट्रॅक्टर वर चढून नाचायला बघत असतो. पण बाकीचे त्याला खाली उतरवतात. शेवटी जवळपास दीड मिनिटांनंतर नवरदेव स्वतः ट्रॅक्टर वरून खाली उतरतात आणि हा व्हिडियो संपतो. व्हिडियो तसा छोटा असला तरी मनोरंजक आहे. संपूर्ण व्हिडियो बघून मजा येते. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असणार हे नक्की.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *