Breaking News
Home / मनोरंजन / ह्या नवरा नवरींनी लग्न झाल्या झाल्या स्टेजवरच केला अतरंगी डान्स, बघा हा व्हिडीओ

ह्या नवरा नवरींनी लग्न झाल्या झाल्या स्टेजवरच केला अतरंगी डान्स, बघा हा व्हिडीओ

मध्यंतरी आपल्या टीमने एक व्हिडियो बघितला होता. त्यात एक नवरोबा, लग्न झाल्याच्या आनंदात चक्क ट्रॅक्टर वर चढून नाचत होता. तो भाऊ नाचला पण मस्त आणि बिनधास्तपणे. त्यामुळे त्याचा व्हिडियो ही वायरल झाला होता. आज आपल्या टीमने अशाच भन्नाटपणे नाचणाऱ्या एका नवरोबचा व्हिडियो बघितला. हा व्हिडियो जयराज आणि लास्या या तरुण जोडीच्या लग्नातील आहे. ही तरुण जोडी मूळची दक्षिण भारतातील असली तरी त्यांच्या लग्नातील डान्समुळे एव्हाना भारतभर लोकप्रिय झाली असणार हे नक्की. कारण त्यांच्या या व्हिडियोने आजतागायत जवळपास चार लाखांहून व्ह्यूज मिळवले आहेत. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. हा व्हिडियो आपल्याला जयराज यांच्या युट्युब चॅनेल वरून बघता येतो. जयराज हे उत्तम डान्सर आहेत हे त्यांच्या एका कॉलेज जीवनातील व्हिडियो वरून कळून येतंच. पण कॉलेज जीवनात ते ज्या जोशाने डान्स करायचे त्याच जोशाने लग्नातही डान्स करताना दिसतात यावरून डान्स त्यांना अतिशय प्रिय असणार हे नक्की. त्यांचा हा डान्स व्हिडियो याची साक्षच देतो जणू.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला खचाखच भरलेला लग्न मंडप दिसतो. मंडपातील मंचावर नवविवाहित जोडप्यासाठी आसनव्यवस्था असते. त्याच्या अवतीभवती अनेक चिल्लीपील्ली उभी असतात. पण मग नवरा बायको कुठे असतात. ती दोघेही डान्स करत असतात. व्हिडियोच्या सुरुवातीलाच हे दोघेही आपल्याला डान्स करताना दिसून येतात. गाणं पण अप्रतिम निवडलेलं असतं. ‘काला चष्मा’ हे गाजलेलं गाणं वाजत असतं. त्यावर जयराज यांचा तर तुफान डान्स चालू असतो. बाजूलाच लास्या वहिनी पण डान्स करत असतात. पण त्याचं लक्ष त्यांच्या आहोंच्या स्टेप्स कडे जास्त असतं. त्याच काय पण संपूर्ण मंडपातील उपस्थित जयराज यांच्या डान्सकडे बघत असतात. स्वतःच्या वेगवेगळ्या आकर्षक स्टेप्स करत असताना जयराज हे त्या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्स ही करत असतात. तसेच त्यांची एक स्टेप तर उपस्थितांना विशेष करून आवडते. त्यावर त्यांना विशेष प्रोत्साहन मिळत असल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला लास्या वहिनी डान्स करता करता जरा विसावूया म्हणून बसायला जातात.

पण जयराज भाऊ तर आज पूर्ण स्टेज वर जणू डान्समय वातावरण करून सोडण्याच्या बेतात असतात. धमाल नाचतात. लास्या वहिनींना ही नाचवतात. एवढंच काय तर त्यांची ऊर्जा एवढी जबरदस्त असते की आजूबाजूला उभी असलेली चिल्लीपिल्ली सुद्धा ओरडत, नाचत असतात. इतरांचीही तीच अवस्था असणार. कारण एक वेळ अशी येते की कॅमेऱ्यामागून एवढा आवाज यायला लागतो की गाणं कमी ऐकू येत. हा व्हिडियो तसा तीन मिनिटांच्या आसपासचा आहे. तुम्हाला मस्त मजा करत, स्वतः डान्स करत सगळ्यांना नाचायला लावणारा नवरा मुलगा बघायला नक्की आवडेल. जर आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आम्ही काय म्हणतोय हे आपल्याला कळलं असेलच. नसेल बघितला, तर एकदा तरी हा व्हिडियो बघाच. आपण स्वतः सुद्धा जयराज यांच्या ऊर्जेने प्रभावित होतो. आपल्या टीमला तर हा व्हिडिओ खूप आवडला. त्यावर लेख लिहिला तर आपल्याला आवडेल अस वाटलं म्हणून हा लेखप्रपंच.

आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते. हा लेख सुद्धा त्यातलाच एक आहे. आमच्या टीमला हे सगळं शक्य होतं ते आपल्या प्रोत्साहनामुळे. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहो ही सदिच्छा. आपल्या या प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.